भारतीय इतिहासाला ज्या राजानं सुवर्णाक्षरांनी लिहिलं त्यामध्ये राजा विक्रमादित्य यांचे नाव घेतले जाते. ज्ञान, न्याय आणि उदारतेसाठी राजा विक्रमादित्य प्रसिद्ध होते. उज्जैनचे सम्राट असलेल्या विक्रमादित्य यांनी शकांना पराभूत करून विक्रम संवत सुरू केले. राजा विक्रमादित्य धाडसी आणि शूर शासक म्हणूनही परिचित होते. त्यांच्या आयुष्यावरील कथा आजही तरुणांना प्रेरित करतात. (Harsiddhi Mata Ujjain)
राजा विक्रमादित्य यांना त्यांच्या पराक्रमासाठी जसे ओळखले जाते, तसेच ते उज्जैनची कुलदेवी म्हणून तिचा उल्लेख केला जातो, त्या माता हरसिद्धीचे परमभक्त होते. माता हरसिद्धी आणि राजा विक्रमादित्य यांच्याबाबत एक गुढ कथा नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे, राजा विक्रमादित्य यांनी देवीला 11 वेळा आपले शिर अर्पण केले होते. राजाच्या या भक्तीवर खूश झालेल्या माता हरसिद्धीनं विक्रमादित्यांना पुन्हा जिवंत करत शक्तीचे वरदान दिल्याचेही सांगितले जाते. माता हरसिद्धीचे निस्सिम भक्त असलेल्या राजा विक्रमादित्य यांची ही गुढ कथा फारशी प्रचलित नाही. आज त्याच्यावरच आपण प्रकाश टाकूया. मध्यप्रदेशच्या उज्जैन नगरीची ओळख ही बाबा महाकालची नगरी म्हणून आहे. सोबतच या उज्जैन नगरीची स्थापना ज्या सम्राट विक्रमादित्यांनी केली, त्यांच्याही पराक्रमाच्या गाथा या नगरीत गायल्या जातात.
यासोबत उज्जैनची देवी म्हणून माता हरसिद्धीची पूजा येथे केली जाते. हरसिद्धी शक्तीपीठ हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. याच हरसिद्धी देवीचे राजा विक्रमादित्य परमभक्त होते. या देवीच्या चरणी राजा विक्रमादित्य यांनी आपले शिर कापून अर्पण केल्याचे सांगितले जाते. देवीच्या प्रती असलेली ही भक्ती पाहून माता हरसिद्धी स्वतः येऊन राजाला जिवंत करत असे. शिवाय देवी राजाला अधिक शक्ती देत असे. त्यामुळेच राजा विक्रमादित्य यांचा पराक्रम आणि शक्ती वाढत होती. त्यांनी अनेक युद्धात देवीच्या आशीर्वादामुळे यश संपादन केले. देवीच्या भक्तीची आणि राजा विक्रमादित्य यांच्या पराक्रमाची ही कथा गुढ असून फारशी प्रचलित नाही. मात्र देवीचे पुजारी ही कथा एक सत्यघटना असल्याचे सांगतात. (Harsiddhi Mata Ujjain)
माता हरसिद्धी माता ही राजा विक्रमादित्य यांच्या घराण्याची कुलदेवता होती. आजही या मातेची गुजरातमधील त्रिदेवी कुटुंबातील लोक कुटुंबदेवता म्हणून पूजा करतात. हे त्रिदेवी कुटुंब राजा विक्रमादित्य यांचे वंशज मानले जाते. माता हरसिद्धीचा आशीर्वाद या कुटुंबाला पूर्वापार मिळत आला आहे. हे मंदिर मुळ गुजरातला असल्याचे सांगितले जाते. मात्र राजा विक्रमादित्य हे मातेला गुजरातमधील द्वारकेमार्गे उज्जैनला घेऊन आले. राजा विक्रमादित्य नित्यनेमानं देवीची पूजा करीत असत. त्यांनी सलग 11 वर्ष स्वतःच्या हातानं आपले शिर कापून देवीच्या चरणी ठेवले होते. देवीनं त्यांना 11 वेळा जिवंत केले. मात्र 12 व्या वर्षी राजा विक्रमादित्य यांनी पून्हा देवीच्या चरणी आपले शिर कापून ठेवल्यावर देवी प्रकट झाली नाही, आणि राजा विक्रमादित्य यांचा मृत्यू झाला.
आजही देवी हरसिद्धीच्या मंदिरात शेंदूर लावलेली राजा विक्रमादित्य यांची 11 शिर बघायला मिळतात. यावरुनच देवी येथे राजा विक्रमादित्य यांच्यासाठी 11 वेळा प्रकट झाल्याचाही पुरावा मिळतो. या मंदिरात आजही राजा विक्रमादित्य ज्या प्रमाणे भव्य अशी देवीची पूजा करत असत, तशीच पूजा केली जाते. उज्जैनच्या या प्रसिद्ध मंदिराबाबत आणखीही काही गुढ कथा प्रचलित आहेत. त्यात या मंदिरात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण देवीची पूजा करण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येते. (Harsiddhi Mata Ujjain)
======================
हेही वाचा :
Ruchi Gujjar : मोदींच्या फोटोचा नेकलेस घालून कान्समध्ये एन्ट्री घेणारी रुची गुज्जर आहे तरी कोण?
Tea : चहा प्यायल्यामुळे आरोग्याला होतात ‘हे’ लाभ
======================
या मंदिरातील पुजा-यांच्या मते, भगवान श्रीकृष्ण आणि यादव कुळातली सर्वच मान्यवर माता हरसिद्धीची पूजा करायचे. त्यावेळी आईला मंगलमूर्ती देवी म्हणून ओळखले जात असे. जरासंधाचा वध करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णानं देवीची आराधना केली होती. जरासंधाचा वध झाल्यावर यादवांनी देवीचे नाव हरसिद्धी देवी असे ठेवले. तंत्र साधनेसाठी खूप प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात सायंकाळी लावण्यात येणारी दिपमाळही बघण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. रात्री हरसिद्धी मंदिराचे दरवाजे बंद केल्यानंतर गर्भगृहात पूजा केली जाते. श्रीसूक्त आणि वेदोक्त मंत्रांसह केल्या जाणाऱ्या या पूजेला तांत्रिक महत्त्व आहे. (Social News)
सई बने