भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२२ मे) रोजी राजस्थानच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी या दौऱ्यादरम्यान राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील देशनोक येथील जगप्रसिद्ध करणी माता मंदिराला भेट दिली. करणी मातेचे मंदिर त्याच्या आगळ्या वेगळ्या प्रथांसाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील देशनोक गावात हे एक आगळे वेगळे मंदिर आहे. या मंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींचा हा दौरा आणि ही भेट खूपच महत्वाची आहे, कारण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच राजस्थान दौरा आहे. (Temple)
या दौऱ्यादरम्यान मोदींनी राजस्थानमधील करणी माता मंदिराला भेट दिली. या भेटीनंतर हे मंदिर कमालीचे चर्चेत आले आहे. या मंदिराबद्दल आणि इथे असणाऱ्या हटके प्रथांबद्दल सतत सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर होताना दिसत आहे. या निमित्ताने आपणही जाणून घेऊया या करणी मातेच्या मंदिराबद्दल. भारतात अनेक अशी मंदिरं आहेत जिथे अतिशय विविध प्रकारच्या प्रथा आणि रितींना पाळले जाते. आजवर आपण अशा मंदिरांबद्दल ऐकले असेल, पण आज आपण ज्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत त्या मंदिरातील प्रथा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. (Marathi Top News)
करणी माता कोण होती?
श्रद्धेनुसार, करणी मातेला दुर्गेचा अवतार मानले जाते. त्या एक अतिशय पूजनीय आणि आदरणीय महिला संत होत्या, ज्यांनी १४ व्या शतकात आपले आयुष्य या प्रदेशात घालवले. करणी मातेचा जन्म १३८७ मध्ये झाला आणि ती सुमारे १५० वर्षे जगली. त्या दैवी शक्ती आणि चमत्कारिक कृत्यांसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याची अनेक वर्षे तपश्चर्या आणि सेवाभावामध्ये व्यतीत केले. राजस्थानमधील स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, करणी मातेचे वंशज मृत्यूनंतर उंदीर म्हणून पुनर्जन्म घेतात आणि याच मंदिरात राहतात. करणी मातेच्या मृत्युनंतर लोकांनी त्यांची मूर्ती स्थापित करून एक मंदिर बांधले ज्यालाच आज करणी माता मंदिर म्हटले जाते. हे मंदिर आज देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. संपूर्ण देशातून नव्हे जगातून या मंदिराला भेट देण्यासाठी भाविक येतात. (Marathi Latest News)
उंदरांची पूजा का केली जाते?
या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे वास करणारे उंदीर. या मंदिरामध्ये असंख्य उंदीर वास करतात. मंदिरांमध्ये उंदीर असणारे हे जगातील एकमेव मंदिर आहे. या मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी देखील हे उंदीर पूजनीय आहेत. इथे येणारे सर्वच भाविक या उंदरांना प्रसाद अर्पण करतात आणि आणि त्यांची पूजाही करतात. या उंदरांबद्दल अशी मान्यता आहे की, हे उंदीर करणी मातेची सावत्र मुलं आहेत आणि तिच्या वंशजांनी या उंदराच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे. मंदिरातील उंदरांना “काबा” असे म्हटले जाते. मुख्य म्हणजे या उंदरांना कोणही मारू शकत नाही. मंदिरात पांढरा उंदीर दिसला तर तो खूप शुभ मानला जातो. पांढरा उंदीर दिसणं देवीचा विशेष आशीर्वाद मानला जातो. बिकानेरच्या या करणी माता मंदिरात २५ हजारहून अधिक उंदीर राहतात. या मंदिरात उंदरांनाही पवित्र मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. विशेषतः पांढरा उंदीर हा शुभ मानला जातो. (Marathi Top NEws)
=========
हे देखील वाचा : Kailas Parvat : ५ वर्षांनी सुरु होणार पवित्र कैलास मानसरोवर यात्रा
=========
हे उंदीर कधीही कोणाचे नुकसान करत नाहीत. कोणी आजारी पडलं तर त्याला उंदरांनी स्पर्श केलेले पाणी दिलं जातं. हे उंदीर साधेसुधे नसून देवीचा आशीर्वाद आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. असे म्हटले जाते की या उंदरांना मारणे किंवा त्यांना इजा करणे हे घोर पाप आहे. मंदिरात उंदरांची संख्या इतकी जास्त आहे की त्यांच्या पायाखाली येऊ नये म्हणून चालताना पाय जमिनीला घासत चालावे लागते. या मंदिरात देवीला अर्पण केलेले अन्न प्रथम उंदरांना खायला दिले जाते आणि नंतर तोच उरलेला प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. भाविक हा प्रसाद मोठ्या श्रद्धेने स्वीकारतात आणि त्याला देवीचा आशीर्वाद मानतात. (Top Trending News)