पाणी म्हणजे जीवन या पाण्याशिवाय आपण अजिबातच राहू शकत नाही. एकवेळ जेवण नसले तरी चालते पण पाण्याला कोणतंही पर्याय नाही. पाण्याची तहान पाणीच मिटवू शकते. पाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला निरोगी राखण्यामध्ये पाण्याचा सर्वात मोठा वाटा असतो. दररोज भरपूर पाणी पिण्याचे अनेक चमत्कारिक फायदे देखील आहेत. अगदी वजन कमी करण्यापासून ते मोठमोठे गंभीर आजार दूर ठेवण्यापर्यंत पाणी लाभदायक ठरते. आपल्याला साधा त्रास जरी झाला, तरी डॉक्टर सर्वात आधी सांगतात भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी पिणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. (Health)
मात्र असे असले तरी तुम्ही कोणते पाणी पितात यावर देखील अनेक गोष्टी निर्भर आहेत. अर्थात अनेकांना फ्रिजचे पाणी, स्टीलच्या भांड्यातले पाणी पिण्याची सवय असते. मात्र हे पाणी पिऊन शरीराला खरंच लाभ होतात का? पाणी प्यायल्यावर मिळणाऱ्या फायद्यांसाठी तुम्ही पाणी कशात स्टोअर करतात? हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. कारण तुम्ही ज्यात पाणी भरून ठेवतात त्याचे गुणधर्म पाण्यात उतरतात आणि हे पाण्यासोबत आपल्या शरीरात जातात. त्यामुळे पाणी स्टोअर करताना आणि पितांना ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल असेच पाणी प्या. (Health Care Tips)
अनेकांनी ऐकले, वाचले, पाहिले असेल की, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. या पाण्याने आपल्या शरीराला अनेक लाभ होतात. हे लाभ पाहूनच या आधुनिक काळात तर पाण्याच्या बाटल्यांपासून वॉटर प्युरिफायरपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये तांब्याचा वापर केला जाताना दिसत आहे. मग नक्की तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या. (Marathi)
> आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. हे पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफाचे संतुलन राखण्यास मदत करते. तसंच तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत होते. मात्र डॉक्टरांच्या मते तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यापूर्वी त्याचे काही नियम जाणून घेणेही गरजेचे आहे. तसंच काही चुका झाल्यास, तुम्हाला त्रास होऊ शकतो.(Marathi News)
> तांबे हे निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. जे लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान 8 तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या.
> तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. सायन्सनुसार, तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करते. (Marathi Top News)
> तांब्यामध्ये (कॉपर) अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे कर्करोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात.
> तांब्यामध्ये मेलेनिनचा घटक असतो जो आपल्या त्वचेला अतिनीलपासून संरक्षण करतो आणि त्याचे नुकसान टाळतो. एका अभ्यासानुसार, तांबे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. शिवाय हे पाणी हिमोग्लोबिन तयार करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. (Marathi Latest News)
> हे पाणी पोटातील समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच पोटातील आतड्यांमध्ये साठलेली घाण स्वच्छ करून गॅस, जळजळ, असिडिटी अनेक समस्यांपासून सुटका देते
> पोट लिव्हर आणि मूत्रपिंडांच्या समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. तांब्यात पोट लिव्हर तसेच मूत्रपिंड या अवयवांना डिटॉक्स करण्याचे अनेक गुणधर्म आहेत याने पोटात अल्सर किंवा इन्फेक्शनची समस्या होण्याचा त्रास कमी होत असल्याचं सांगितलं जातं. (Top Trending News)
> वजन कमी करण्यासाठी अनेक जणं नानाविध उपाय केले जातात. मात्र जर तुम्हाला कमी वेळात वजन कमी करायचे असेल तर तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील खराब चरबी लवकर कमी होण्यास मदत होते.
> तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो. तसेच तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तसेच तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते. (Top Stories)
> मेंदूसाठी तांबे खूप महत्त्वाचे आहे. कारण, तांबे मेंदूमध्ये उपस्थित न्यूरोट्रांसमीटर नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्ही पार्किन्सन्स, अल्झायमरसारख्या मेंदूच्या आजारांपासून दूर राहतोच, पण स्मरणशक्तीही मजबूत होते.
=======
हे देखील वाचा : डोळ्यांखालील सुरकुत्यांवर घरगुती उपाय, तयार करा या 4 नॅच्युरल क्रिम्स
या 5 अँटी-एजिंग ड्रिंक्सचा करा डाइटमध्ये समावेश, चाळीशीतही दिसाल तरुणी
=======
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे नियम
तुम्ही दिवसभर जरी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला तरी चालते. मात्र सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हे पाणी प्यायल्याने अधिक फायदा होतो. रात्री झोपताना तांब्याचे भांडे स्वच्छ धुऊन त्यात किमान सव्वा लीटर पाणी भरावे आणि हे भांडे लाकडावर अथवा टेबलवर ठेवावे. सकाळी उठल्यानंतर हळूहळू एक एक घोट घेत पाणी प्यावे. यामुळे फायदा मिळतो. एक लक्षात ठेवा या पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा पाणी तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास ठेवले जाते. (Social News)
ज्या व्यक्तींना ऍसिडिटीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हे पाणी पिणे टाळावे. चार्ज झाल्यानंतर तांब्याच्या पाण्यात अधिक उष्णता निर्माण होते. त्यामुळे हे पाणी पिणे अशा लोकांनी टाळावे. शिवाय ज्यांना किडनीचा आजार अथवा हृदयाशी संबंधित आजार आहे अशनी तांब्यांच्या भांड्यातून पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तांब्याच्या भांड्यात पाण्याशिवाय दूध, आंबट पदार्थ कधीच ठेऊ नये. यामुळे पोटात विषबाधा होऊ शकते.
(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)