Overthink Management : ओव्हरथिंक करणे ही एक नकारात्मक सवय आहे. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडले जाते. कधीकधी तुम्ही देखील ओव्हरथिंक करत असाल. खरंतर, ही सवय व्यक्तीला हळूहळू गंभीर रुपात आपले शिकार बनवते. यामुळे मनात दररोज नकारात्मक विचार येऊ लागतात. अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.
1 मिंडफूल्लनेस आणि मेडिटेशन :
ओव्हर्थिंकींगला थांबण्यासाठी मनाला शांत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. नियमितपणे ध्यान आणि मिंडफूलनेसचा अभ्यास करा, ज्यामुळे मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.
2 सकारात्मक विचारांचे महत्व :
दररोज मनात नकारात्मक विचार येत असल्यास याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते. यामुळे सकारात्मक विचार करा. यासाठी मित्रपरिवाराशी संवाद साधा. तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.
3 जास्त विचार करू नका :
एखाद्या गोष्टीवर अधिक विचार करू नका. ठरवा की, तुम्ही यावर काही मिनिट विचार कराल आणि नंतर ते विचार करणे थांबवा. अतिविचार केल्याने मानसिक आरोग्य बिघडून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता.
=======================================================================================================
हेही वाचा :
डोळ्यांखालील सुरकुत्यांवर घरगुती उपाय, तयार करा या 4 नॅच्युरल क्रिम्स
नव्या व्यक्तींना भेटण्यासाठी घाबरता? अशाप्रकारे करा संवादाला सुरुवात
=======================================================================================================
4 स्वतःला समजून घ्या :
ओव्हरथिंकींचे मुख्य कारण म्हणजे स्वत:वरील आत्मविश्वास ढासळणे आणि भीती वाटणे. या स्थितीत स्वत:साठी वेळ काढून तुम्हाला काय हवंय याचा विचार करा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.(Overthink Management)
5 फिजिकल अॅक्टिविटी करा :
व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्याने मेंदूला आराम मिळतो आणि मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक विचार येण्यास मदत होऊ शकते. या पद्धतींचा वापर करुन ओव्हरथिंकच्या समस्येवर तोडगा काढू शकता.