सध्या मनोरंजनविश्वात कान्स फिल्म फेस्टिव्हलची धूम आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटींनी या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या फेस्टिवलमध्ये मराठी कलाकारांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. कान चित्रपट फेस्टिवल हा दरवर्षी फ्रान्समधील कान्स या शहरामध्ये भरवला जातो. संपूर्ण जगातील मनोरंजनविश्वातील कलाकारांसाठी हा अतिशय मोठा, महत्वाचा आणि प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे. (Ruchi Gujjar)
१९३९ साली या फेस्टिव्हलची सुरुवात झाली. या फेस्टिवलमध्ये संपूर्ण जगातील मोजके आणि सुंदर सिनेमे दाखवले जातात. शिवाय Palme d’Or हा अतिशय मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात येतो. या फिल्म फेस्टिवलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आमंत्रित असलेल्या कलाकारांचे पोशाख. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कलाकारांच्या लुकला कमालीचे लाइमलाइट मिळते. त्यामुळे प्रत्येक कलाकार हा आपला लूक अधिकाधिक आकर्षक आणि हटके कसा करता येईल याकडे प्रकर्षाने लक्ष देतो. (Marathi News)
असा हा कान्स फेस्टिवल सध्या जल्लोषामध्ये सुरु आहे. याच फेस्टिवलमध्ये एका भारतीय अभिनेत्रीने संपूर्ण जगातील मीडियाचे आपल्या लूकने लक्ष वेधून घेतले असून, सध्या जगात आणि सोशल मीडियावर याच अभिनेत्रीची आणि तिच्या लूकची खासकरून तिच्या नेकलेसचीच चर्चा पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे रुची गुज्जर. रुची अचानक प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूक.

रुची गुज्जर ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने नुकतीच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली. रुची गुज्जर हिने कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच ती चर्चेचा विषय बनली आहे. कपडे निर्मितीमध्ये भारताची वैविध्यता आणि सुंदरता दर्शवण्यासाठी रुचीने लेहंगा परिधान केला होता. कॅरोलिन युनिव्हर्स डिनरसाठीच्या रेड कार्पेटवर रुची जेव्हा आली, तेव्हा तिच्या गळ्यातील नेकलेसवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. तिने जो नेकलेस घातला होता त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो लावलेले होते. (Marathi Trending News)
रुचीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन कलरचा डिझायनर राजस्थानी लेहेंगा परिधान केला होता. लेहेंग्यातील लूकवर रुचीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंचा नेकलेस गळ्यात परिधान केला होता. रुचीने परिधान केलेला राजस्थानी लेहेंगा हा रूप शर्माने डिझाईन केला आहे. तिच्या एकूण लुकबद्दल सांगायचे झाले तर, रुचीने राम ऑफ जरीबारीने डिझाइन केलेला हॅन्ड मेड बांधणी दुपट्टा डोक्यावर घेतला होता. तिच्या जरीच्या या भरजरी दुपट्ट्याने राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. तिच्या या लेहेंग्यात गोटापट्टी आणि आरशाचे कामही करण्यात आले होते. (Marathi Latest News)
रुचीने हातावर अल्ता लावलेला दिसला. तिने गळ्यात घातलेला हार हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. तिने गळ्यात कुंदनाचा हार घातला होता, ज्यामध्ये लाल कमळ होते, या नेकलेसची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावले होते. रुचीने तिच्या नेकलेससह मॅचिंग होणारे कानातले, मांग टिक्का आणि पारंपारिक बांगड्या घातल्या होत्या. रुची गुज्जरचा हा लुक आणि नेकलेस आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचे या लूकमधील फोटो देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, सध्या तिचीच सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Social News)

मग नक्की ही रुची गुज्जर आहे तरी कोण?
रुची गुज्जरने २०२३ मिस हरियाणा हा किताब जिंकला आहे. रुची गुजर ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. रुची गुज्जर सध्या भारतीय मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण करत आहे. रुची गुज्जरचा जन्म मेहरा गुजरवास खेडी गावात झाला. ती मुळची राजस्थानची आहे. तिने जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. पदवीधर झाल्यानंतर, ती अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत आली. रुची ही एका लष्करी कुटुंबातील आहे. तिचे वडील सशस्त्र दलात कार्यरत आहेत. ती ‘जब तू मेरी ना राही’, ‘हेली में चोर’ आणि ‘एक लडकी’ सारख्या म्युझिक व्हिडिओंसाठी दिसली होती. (Marathi Top Stories)
========
हे देखील वाचा : Chanakyaniti : अपयशामुळे खचलात….? मग चाणक्य नीतीच्या ‘या’ गोष्टी ठेवा कायम स्मरणात
========
रुचीने तिच्या नेकलेसबद्दल बोलताना सांगितले, “हा नेकलेस कुठल्याही दागिन्याहून मोलाचा आहे. हा नेकलेस म्हणजे जागतिक स्तरावरील भारताच्या सामर्थ्याचं, दूरदृष्टीचं आणि विकासाचं प्रतीक आहे. कान्समध्ये हा नेकलेस परिधान करून, मला नेतृत्व करुन भारताला नव्या उंचीवर नेणाऱ्या आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता.” पुढे ती तिच्या करियरबद्दल म्हणाली, “‘मला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायचे आहे कारण प्रेक्षकांना ते आवडतात.” रुची गुज्जरची सोशल मीडियावर मोठी चाहती आहे. इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक लोकं तिला फॉलो करतात. (Top Stories)
