Dementia – Symptoms and causes : व्यक्तीमध्ये वाढता तणाव आणि कामाचा बोझ्या काही प्रकारच्या कारणांमुळे मानसिक समस्या वाढल्या जातात. एवढेच नव्हे घराची जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळेही व्यक्ती काही गोष्टी विसरू लागतो. अशाप्रकारची लक्षणे डिमेंशियाची असू शकतात. या स्थितीमध्ये व्यक्ती आपल्या गोष्टी लक्षात ठेवणे विसरु लागतो. डिमेंशिया एक सामान्य शब्द असून याचा वापर वेगवेगळे आजार दर्शवण्यासाठी केला जातो, ज्या स्मरणशक्तीच्यासंदर्भाती असू शकतात. काहीवेळेस डिमेंशियाची स्थिती एवढी गंभीर होऊ शकते की, व्यक्तीच्या ब्रेन सेल्स एकमेकांशी कम्युनिकेट करू शकत नाहीत. यामुळे व्यक्तीच्या बोलण्यात किंवा वागण्यात फार मोठा बदल दिसून येऊ शकतो.डिमेंशियामागे काही कारणे असू शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
डिमेंशिया अनुवांशिक असतो का?
डिमेंशिया हा आजार नसून काही लक्षणांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. याचा सामान्य प्रकार म्हणजे अल्जाइमर आहे. जो डिमेंशियाच्या स्थितीत 60-70 टक्यांपर्यंत दिसतो. डिमेंशियामागे काही कारणे असू शकतात. त्यामध्ये अनुवांशिक हे देखील कारण असू शकते. डिमेंशियाच्या काही प्रकारांमध्ये जेनेटिक फॅक्टरची भूमिका असते. पण याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक परिवाराच्या हिस्ट्रीमध्ये ही स्थिती असू शकते. डिमेंशियाच्या स्थितीत व्यक्तीला वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

Dementia – Symptoms and causes
-स्मरणशक्ती कमजोर होणे
-वेळ आणि ठिकाणाबद्दल गोंधळ होणे
-बोलणे किंवा समजून घेण्यास समस्या
-निर्णय घेण्याच्या क्षमतेत कमतरता
-व्यवहार किंवा स्वभावात बदल
=======================================================================================================
हेही वाचा :
Multani Mati : मुलतान मातीचे सौंदर्यवर्धक फायदे
Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ
=======================================================================================================
डिमेंशियाचे प्रकार आणि अनुवांशिकतेमधील संबंध
अल्जाइमर डिजीज
एखाद्याच्या आई-वडिलांना किंवा भाऊ-बहिणीला अल्जाइमर असल्यास त्याला अल्जाइमर होण्याचा धोका अधिक वाढला जाऊ शकतो. असे मानले जाते की, काही विशेष प्रकारचे जीन अल्जाइमरची जोखिम वाढवू शकतात.
फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया (FTD)
फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया हा एक दुर्मिळ आणि आनुवांशिक प्रकार आहे. यामध्ये कुटुंबातील एखाद्याला FTD असल्यास तर पुढच्या पिढीला याचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी काही प्रकारचे जीन म्युटेशन जबाबदार ठरू शकतात.
वॅस्कुलर डिमेंशिया आणि लुई बॉडी डिमेंशिया
वॅस्कुलर डिमेंशिया आणि लुई बॉडी डिमेंशियाच्या प्रकारामध्ये अनुवांशिक कारण कमी असते. पण उच्च रक्तदाब, मधुमेह आणि स्ट्रोकसारख्या स्थितीतून परिवारातील एखादा व्यक्ती जात असल्यास जोखिम वाढली जाऊ शकते. (Dementia – Symptoms and causes)
उपाय काय?
-ब्रेन एक्सरसाइज करा
-शारीरिक रुपात सक्रिय रहा
-हेल्दी अन्नपदार्थांचे सेवन करा
-दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या
-ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा
-तणाव दूर करण्यासाठी योगा, मेडिटेशन करा