Home » India : भारतीय लष्कराचे DGMO कोण आहेत? या पदाच्या जबाबदाऱ्या कोणत्या?

India : भारतीय लष्कराचे DGMO कोण आहेत? या पदाच्या जबाबदाऱ्या कोणत्या?

by Jyotsna Kulkarni
0 comment
India
Share

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला आणि यात २६ लोकांचा मृत्यू झाला. यानंतर सतत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत होती. अशातच भारताने पाकिस्तानमध्ये एयर स्ट्राइक करत पाकमधील अनेक दहशतवादी भागांना उध्वस्त केले. यानंतर पाकने भारतावर हल्ला करायला सुरुवात केली विविध क्षेपणास्त्र, ड्रोन, गोळीबार करत भारतावर आक्रमण केले. (India)

या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानला नाकी नऊ आणले. अशातच १० मे रोजी या संघर्षाला पूर्णविराम लागला आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. भारतीय लष्कराचे DGMO आणि पाकिस्तानी लष्कराचे DGMO यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात आला. हा निर्णय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सच्या चर्चेनंतर झाल्याचं सांगितलं गेलं. (DGMO)

एवढा मोठा युद्धबंदीचा निर्णय घेण्याच्या अधिकार भारतीय लष्कराचे DGMO आहे. अशातच जेव्हा पाकसोबतचे हे युद्ध थांबले तेव्हा भारतीय लष्कराचे DGMO हे खूपच चर्चेत आले. लष्करातले DGMO हे पद नक्की कोणते आहे? भारतीय लष्कराचे DGMO कोण आहेत? हे पण किती महत्वाचे आणि जबाबदारीचे आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. चला आपण या भारतीय लष्करातील DGMO पदाबद्दल जाणून घेऊया.(Who is DGMO)

India

DGMO म्हणजे काय?
DGMO म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स. हा आपल्या लष्करातील एक वरिष्ठ लष्करी अधिकारी असतो जो लष्करी कारवायांवर लक्ष ठेवण्याचे काम करतो आणि नियंत्रण ठेवतो. हे अधिकारी थेट भारतीय लष्करप्रमुखांना अहवाल देतात आणि युद्ध, शांती किंवा तणावाच्या परिस्थितीत रणनीतिक निर्णय घेतात. (Marathi Trending News)

भारताचे सध्याचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे आहेत. सर्व लष्करी कारवाया DGMO ची जबाबदारी असते. कोणत्याही लष्करी कारवाईची जबाबदारी, त्याचे मार्गदर्शन करणे, सूचना देणे आणि इतर सर्व कामे घेणे ही DGMO ची असतात. युद्ध किंवा संघर्षादरम्यान, लष्करी कारवायांशी संबंधित प्रत्येक निर्णय DGMO घेतो. DGMO चे काम युद्ध किंवा दहशतवादविरोधी कारवाया आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांसाठी रणनीती तयार करणे आहे. (Top Marathi News)

India

DGMO हे सैन्याच्या तिन्ही शाखा आणि विविध एजन्सींमध्ये मध्यस्ती म्हणून देखील काम करतात. युद्ध किंवा लष्करी कारवायांशी संबंधित सर्व माहिती DGMO कडे पाठवली जाते, त्यांनतर DGMO रणनीती तयार करतात आणि त्यानुसार कारवाया करतात. DGMO यांना यासाठी कायम गुप्तचर संस्थांशी समन्वय साधावा लागतो आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती पुरवणे एजन्सींना बंधनकारक असते. DGMO यांना सीमावर्ती तणाव नियंत्रणात ठेवणे आणि युद्धविराम व्यवस्थापन करावे लागते. सीमांवर तणाव वाढल्यास लष्करी मोर्चावर त्वरित संवाद साधणे DGMO आले पाहिजे. इतर संरक्षण शाखा आणि मंत्रालयांसोबत समन्वय ठेवण्याचे महत्वाचे काम DGMO करतात. (Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा :  India : भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी, जाणून घ्या शस्त्रसंधी म्हणजे काय?

=======

DGMO हे सैन्यातील एक महत्त्वाचे पद आहे. भारताचे DGMO लेफ्टनंट राजीव घई आहेत. लेफ्टनंट जनरल राजीव घई ऑक्टोबर २०२४ मध्ये DGMO म्हणून रुजू झाले. ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी जीओसी चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग पद भूषवले आहे. भारतीय सैन्यात, डीजीएमओची निवड लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्रालय संयुक्तपणे करतात. ७ व्या वेतन आयोगानुसार, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचा मूळ पगार दरमहा ₹१,८२,२०० ते ₹२,२४,१०० पर्यंत असू शकतो. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.