Home » Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ

Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ice Apple
Share

उन्हाळा लागला की, सगळ्यांची पाऊले आपोआपच थंड वस्तू खाण्याकडे वळतात. उष्ण वातावरणामध्ये आपल्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून थंड पदार्थ, विविध प्रकारचे ज्यूस, थंड फळं खातात. मात्र यातही काही फळं जसे की आंबा, टरबूज, खरबूज आदी उन्हाळ्यातच मिळतात. ही फळं खाणे नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. या चविष्ट फळांसाठीच सर्वच लोकं त्रासदायक ठरणाऱ्या उन्हाळ्याची वाट बघत असतात. याच फळांमध्ये अजून एक फळ म्हणजे ताडगोळा. (Ice Apple)

अनेकदा पण रस्त्याच्या कडेला गाड्यावर काही माणसांना ताडगोळा विकताना पाहिले असेल. जरा नारळासारखे दिसणारे हे फळ हिरवट, काळपट सालींमधे असलेले हे रसाळ, थंडगार, गोड गोड ताडगोळे बऱ्याच लोकांनी खाल्ले असतील. मात्र काहींनी अजूनही याची चव पाहिली नसेल. पण उन्हाळा संपायच्या आधी नक्की तुम्ही हे ताडगोळे खा. Ice Apple Fruit नावाने ओळखले जाणारे हे फळ उन्हाळ्यात खूपच जास्त प्रमाणात बाजारात दिसून येते.  (Health News)

आइस अ‍ॅपल हे ताडाच्या झाडाचे फळ आहे. जेव्हा हे फळ कच्चे असते तेव्हा त्यावर एक पारदर्शक, जेलीसारखा थर असतो जो चवीला थोडा गोड आणि अत्यंत थंड असतो. याचे सेवन केल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो आणि तहान भागते. हे फळ प्रामुख्याने एप्रिल ते जून दरम्यान बाजारात सहज उपलब्ध होते.(Marathi News)

Ice Apple

गोड शहाळ्यासारखं पाणी आणि बाहेरून जेलीप्रमाणे लिबलिबित असणारे पण चवीला अतिशय उत्तम असते. याची चव ही शहाळ्यातील पाण्यासारखीच असते पण दिसायला हे फळ लिचीसारखे दिसते. केवळ जिभेच्या चवीसाठी नाही तर उन्हाळ्यातील आरोग्य राखण्यासाठी हे ताडगोळे खाणे आवश्यक असते. ताडगोळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी हे चांगलं आहे. ताडगोळे खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. जाणून घेऊया या फायद्यांबद्दल. (Marathi Latest News)

– ​ताडगोळा हे अत्यंत कमी कॅलरी असणारे फळ आहे. यामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी सह लोह, जिंक, कॅल्शियम, फॉस्फोरस, थियामाईन आणि रिबोफ्लेविनसारखे विटामिन्स असतात. हे सर्व मिनरल्स प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. या कारणामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी गुणकारी ठरते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. (Marathi Trending News)

– ​उलटी होत असल्यास, तुम्ही घरगुती उपाय शोधत असलात ताडगोळा हा उत्तम पर्याय आहे. तसंच पोटात जंत झाले असतील तर त्यावरही तुम्ही ताडगोळा खाऊ शकता. यामध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात असल्यामुळे लिव्हर टॉनिकप्रमाणे याचा उपयोग होतो.

– ताडगोळ्यात कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळ खूपच लाभदायक आहे. यात अ, ब, क जीवनसत्त्वे, लोह, पोटॅशियम, आहारातील फायबर, नैसर्गिक साखर, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. या फळाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते.  (Marathi Top Stories)

Ice Apple

– उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातून पाणी आणि खनिजे बाहेर टाकली जातात. ताडगोळ्यात असलेले पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला त्वरित पाणी पुरवण्याचे काम करतात. हे फळ नैसर्गिक ओआरएस म्हणून काम करते आणि थकवा देखील कमी करते. (Social News)

– उन्हाळ्यात अनेकांना आम्लपित्त, गॅस, छातीत जळजळ, बद्धकोष्ठता आदी समस्यांना सामोरे जावे लागते. या त्रासावर ताडगोळे खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले आहारातील फायबर आणि नैसर्गिक थंडावा पोट शांत ठेवतो आणि पचन सुधारतो. (Marathi Health News)

– ताडगोळ्यात असलेले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात, जेव्हा त्वचेवर जळजळ, ऍलर्जी किंवा पुरळ उठू लागतात, तेव्हा ताडगोळ्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा थंड होण्यास मदत होते.

– या फळामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी शक्ती देतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.