सगळ्यांनाच आपल्या त्वचेची आणि आपल्या सुंदरतेची काळजी असतेच. यासाठी प्रत्येक जणं मग स्त्री असो किंवा पुरुष विविध उपाय करताना दिसतात. यात खासकरून स्त्रियांना कायमच आपल्या लूकची काळजी असते. आपण चांगले दिसावे, आपली त्वचा कायम मुलायम आणि तजेलदार राहावी यासाठी सगळेच आग्रही असतात. यासाठी आपण अनेकदा छोटे आणि सोपे घरगुती उपाय करत असतो. यातलाच एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय उपाय म्हणजे चेहऱ्याला मुलतानी माती लावणे. (Multani Mati)
मुलतानी माती लावून चेहरा उजळवण्याचा उपाय अतिशय जुना आणि प्रभावी आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा महागड्या ब्युटी ट्रेंटमेन्ट उपलब्ध नव्हत्या तेव्हा कदाचित आपल्या आजी, पणजी या देखील हाच उपाय लावून आपला चेहरा छान ठेवत असतील. आज आधुनिक काळात अनेक परदेशी आणि महागड्या ब्युटी ट्रीटमेंटमध्ये मुलतानी मातीचा उपाय मागे पडताना दिसत आहे. असे असले तरी अनेक महिला आजही हाच उपाय करतात. चला मग जाणून घेऊया या मुलतान मातीच्या फायद्यांबद्दल. (Skin Care Tips)
* मुलतानी मातीमध्ये अॅसिडिक गुणधर्मांसह खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. यातील अॅसिडिक घटक त्वचेतील पीएच लेव्हल संतुलित ठेवण्याचे कार्य करते. मुलतानी मातीमधील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे मुरुम आणि मृत त्वचेची समस्या दूर होते. (Skin Care)
मुलतानी माती नैसर्गिक स्वरुपात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करते. रोमछिद्रे, सनबर्न, काळवंडलेली त्वचा, रॅशेज, मुरुम, डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. यातील औषधी गुणधर्म त्वचेवरील रोमछिद्रे खोलवर स्वच्छ करतात. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते. (Marathi News)
* मुलतानी मातीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेतील तेल काढून टाकते, तसेच व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स कमी करते आणि त्वचेचे छिद्र बंद करते. मुलतानी मातीचा वापर त्वचेवरील मुरुमे दूर करण्यासाठी केला जातो. हे सनबर्न दूर करण्याचेही काम करते.
* चेहऱ्यावरील काळे डाग आणि काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती वापरू शकता. मुलतानी माती मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास देखील मदत करते. (Marathi Trending News)
* मुलतानी मातीच्या नियमित वापराने मुरुमांची समस्या कमी करता येते. एवढेच नाही तर ते पुन्हा येण्यापासूनही रोखले जाऊ शकते. नैसर्गिक सौंदर्य मिळवण्यासाठी मुलतानी माती आणि गुलाबपाणीचा फेस पॅक लावावा. (Marathi Top News)
मुलतानी मातीचे विविध फेसपॅक
१) मुलतानी माती आणि गुलाब पाणी फेसपॅक
एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती आणि १/४ कप दूध किंवा गुलाबजल एकत्र करून पॅक तयार करा. आता तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडा करा आणि नंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा. हा पॅक १० मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवा. लक्षात ठेवा की पॅक काढून टाकण्यासाठी, खूप जोरात स्क्रबिंग करण्याची किंवा फेस वॉश वापरण्याची गरज नाही. (Social NEws)
=======
हे देखील वाचा : Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ
=======
२) मुलतानी माती आणि मध पॅक
एका भांड्यात २ चमचे मुलतानी माती, १ चमचा मध आणि २-३ चमचे पाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. १५ – २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. मध त्वचेला ओलावा देईल.जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा रस आणि मध वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
३) लिंबू आणि मुलतानी माती पॅक
लिंबूमध्ये ब्लीचिंग एजंट्स असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ते मुलतानी मातीमध्ये मिसळून लावले तर त्वचेला एक अद्भुत चमक येते. याशिवाय, जर तुम्ही लिंबाची साल बारीक करून त्यात घातली तर ते नैसर्गिक स्क्रब म्हणून देखील काम करते.