Over eating health issues : झपाट्याने बदलणाऱ्या लाइफस्टाइलमध्ये प्रत्येकजण एवढा व्यस्त झाला आहे की, त्याला स्वत:कडे पुरेसे लक्ष देणे शक्य नाही. याच लाइफस्टाइलचा आरोग्यावर परिणाम होतो आणि काही आजार मागे लागतात. काहीवेळेस तणाव, चिंता या स्थितीमध्ये काहीजण ओव्हर इटिंग करतात. या कारणास्तवही आरोग्य बिघडले जाऊ शकते. या स्थितीत काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया….
पचक्रियेसंबंधित समस्या
ओव्हरइटिंग केल्याने पोटाचा आकार सामान्य आकारापेक्षा अधिक फैलावला जाऊ शकतो. यावेळी पोट फुगी, मळमळ आणि पचनसंबंधित समस्या होऊ शकतात. खरंतर, ओव्हरइटिंगमुळे शरीरात अॅसिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्न होऊ शकते.
मेटाबोलिक तणाव
अत्याधिक खाल्ल्याने मेटाबॉलिज्म अस्थायी रुपात वाढू शकतो. अशातच ज्यावेळी आपण ओव्हर इटिंग करतो तेव्हा खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यास अतिरिक्त मेहनत करावी लागते. मेटाबॉलिक तणाव वाढल्याने गरम होणे, गाम येणे किंवा चक्कर येणे अशा समस्या होऊ शकतात.
हार्मोनल समस्या
दररोज ओव्हर इटिंग केल्याने भूक नियंत्रित कणारे हार्मोन जसे की, ग्रेलिन आणि लेप्टिनचे संतुलन बिघडले जाऊ शकते. यामुळे अधिक भूक वाढली जाते आणि अन्नपदार्थ पचण्यास समस्या उद्भवू शकते.

Overeating Risk
दीर्घकालीन होणाऱ्या समस्या
लठ्ठपणा
ओव्हरइटिंगचा थेट परिणाम वजन वाढण्यावर होऊ शकतो. अतिरिक्त कॅलजी शरीरात फॅटच्या रुपात जमा होते. यामुळे लठ्ठपणा आणि वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. लठ्ठपणाच्या कारणास्तव मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कॅन्सरसारख्या समस्यांची जोखिम वाढली जाते.
हृदयासंबधित समस्या
ओव्हर इटिंगदरम्यान अत्याधिक फॅट, साखर, प्रोसेस्ड शुगर आणि कोलेस्ट्रॉल युक्त आहाराचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आमि ब्लड शुगर वाढली जाते. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होते, यामुळे हृदयासंबंधित समस्या होण्याचे कारण ठरू शकते.
====================================================================================================
हेही वाचा :
घरातील या वस्तू चेहऱ्याची त्वचा करतील डीप क्लिन
वर्कआउटनंतर ब्लोटिंगची समस्या उद्भवते, जाणून घ्या कारण
=======================================================================================================
मानसिक आरोग्यासंबंधित समस्या
दीर्घकाळ ओव्हर इटिंग करणे भावनात्मक संकटाचे कारण असू शकते. यामुळे नैराश्य आणि चिंता अशा स्थितीचा समावेश असू शकतो. एखादा व्यक्ती आधीपासूनच तणावाखाली असेल तर ओव्हर इटिंग केल्याने आरोग्यासह मानसिक आरोग्य बिघडले जाऊ शकते.
फॅटी लिव्हर
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार अशावेळी होते जेव्हा लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते. ही समस्या ओव्हरइटिंग किंवा चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्येमुळे होऊ शकते. ओव्हर इटिंगच्या कारणास्तव फॅटी लिव्हसंदर्भात वेळीच उपचार न केल्यास लिव्हरमध्ये सूज येण्याचा धोका वाढला जातो.(Over eating health issues)
असा करा बचाव
-ओव्हर इटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी एक्सरसाइज, मेडिटेशन करू शकता. तणाव कमी झाल्यास ओव्हर इटिंगच्या समस्येपासून दूर राहू शकता.
-धावपळीच्या आयुष्यात खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे.
-दीर्घकाळापासून ओव्हर इटिंगच्या समस्येचा सामना करत असाल तर डॉक्टरांना भेटा