Calcium Deficiency Symptoms : कॅल्शियम आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे खनिज आहे. यामुळे हाडं आणि दात मजबूत होण्यासह स्नायू आणि हृदयाचे कार्य सुरळीत पार पडण्यास मदत होते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास काही प्रकारच्या आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर.. खरंतर, कॅल्शियममुळे हाडं ढिसूळ होऊ लागतात. यामुळे स्नायूंमध्ये दुखणे अशा समस्या उद्भवतात. खासकरुन वृद्धापकाळात हाडं ढिसूळ झाल्याने अधिक वेदना होतात.
स्नायूंना पेटके येणे
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास स्नायूंना पेटके येणे किंवा खेचल्यासारखे होऊ शकते. खाकरुन हातापायाच्या येथे ही समस्या होते. काहीवेळेस रात्रीच्या वेळेस याचा अधिक त्रास होऊ शकतो.
मज्जासंस्थेतील बदल
कॅल्शियम शरीरातील मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक आहे. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास यामुळे व्यक्तीला बैचेन वाटणे, भीती वाटत राहणे आणि हातापायांना मुंग्या येण्याची समस्या अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.
हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं ढिसूळ होऊ लागतात. यामुळे हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढला जातो. ही समस्या खासकरुन वृद्ध व्यक्तींना होऊ शकते.
दातांसंदर्भात समस्या
शरीरात कॅल्शियमची समस्या उद्भवल्यास दातं कमजोर होऊ शकतात. अथवा किडण्यास सुरुवात होऊ शकते. एवढेच नव्हे काही वेळेस दात तुटलेही जाऊ शकतात.
त्वचा, केस आणि नखांमध्ये बदल
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, गळण्यासह नखं तुटण्याची देखील समस्या होऊ शकते.(Calcium Deficiency Symptoms)
=======================================================================================================
हेही वाचा :
दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य
उन्हाळ्यात शरीरातील लोहाची कमी करतील दूर हे 5 रिफ्रेशिंग ड्रिंक्स
=======================================================================================================
उपाय काय?
-शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेपासून दूर राहण्यासाठी दूध, दही,पनीर, हिरव्या पालेभाज्या आणि तीळसारख्या गोष्टींचे सेवन करा. यामुळे शरीरात कॅल्शियमचा स्तर टिकून राहण्यास मदत होते.
-व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते.सूर्यकिरणांच्या माध्यमातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. याशिवाय व्हिटॅमिन डी युक्त आहार जसे की, अंडी, मासे आणि फोर्टिफाइड दूधाचे सेवन करू शकता.
-शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याच्या सप्लिमेंट्स खा.
-हाडं मजबूत राहण्यासाठी दररोज व्यायाम करा.
-हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा.