Home » Mango : गोड आणि केमिकल फ्री आंबा ओळखण्याच्या सोप्या टिप्स

Mango : गोड आणि केमिकल फ्री आंबा ओळखण्याच्या सोप्या टिप्स

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mango
Share

एप्रिल महिना लागला की सगळ्यांना वेध लागतात ते आंब्याचे. फळांचा राजा आंबा कोणाला आवडत नाही? वर्षातून एकदा येणाऱ्या आंब्याच्या सिझनची सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू. उन्हाळा कोणालाच आवडत नाही, मात्र फक्त आंब्यासाठीच हा ऋतू सगळ्यांना आवडतो. आंबा हे फळ सगळ्यांचेच आवडते आहे. त्यामुळे आंबा बाजारात दिसू लागला की लगेच तो घरी आणायची प्रत्येक जणांची इच्छा असते. मात्र आंबा खरेदी करताना अनेक जणं घाबरतात कारण, आंबे चांगले आहेत की, नाही?, गोड असतील ना?, केमिकलने पिकवलेले नसतील ना? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आंपण घेत असलेला आंबा हापूस आंबाच आहे ना? (Mango)

प्रत्येक सामान्य माणसाला आंबा खरेदी करताना हे प्रश्न पडतातच. एकतर आंबा खूपच महाग येतो, त्यामुळे खात्रीशीर व्यक्तीकडून आणि ज्याला आंबा ओळखता येतो त्यानेच आंबा खरेदी केलेले उत्तम ठरते. मात्र आज आम्ही तुमची ही सर्वात मोठी समस्या दूर करणार आहोत. या आंब्याच्या सीझनमध्ये खरा आणि गोड आंबा ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला आंबा खरेदी करताना अडचण येणार नाही. (Hapus Amba)

वासावरून ओळखा
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांना गोड सुगंध असतो, तर रासायनिक पद्धतीने कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांना रासायनिक किंवा विचित्र वास असू शकतो. जर तुम्हाला गोड आंबा घ्यायचा असेल तर त्याच्या देठाचा वास घ्या. आंब्याला वास असेल तर तो पिकलेला आणि गोडही आहे. कच्च्या आंब्याला वास येत नाही. (Marathi Top News)

Mango

गोल आकार
जे आंबे किंचित गोलाकार असतात आणि जास्त वाकलेले नसतात, ते आंबे बरेचदा गोड असतात. पण जर आंबे खूप वक्र असतील आणि खूप सुंदर दिसत असतील तर ते पूर्ण पिकलेले किंवा गोड नसतील.

डाग किंवा ओरखडे
जर आंब्यामध्ये केमिकल असतील, तर त्यामुळे आंब्यावर काही खाचा, ओरखडे दिसू शकतात किंवा त्यावर डाग पडलेले देखील असू शकतात. असे आंबे निवडणे टाळा. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांना असे बाह्य डाग असण्याची शक्यता कमी असते. (Marathi Trending News)

आंब्याचा घट्टपणा तपासा
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांच्या तुलनेत कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे मऊ किंवा नरम वाटू शकतात. कारण पिकण्याच्या प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने फळांच्या पेशी भिंती तोडतात, ज्यामुळे त्याची साल नरम होऊन आंबा मऊ वाटू लागतो. नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे घट्ट असतात.

बेकिंग सोडा वापरा
पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि नंतर आंबे १५-२० मिनिटे त्यात भिजवा. हे भिजवलेले आंबे धुतल्यानंतर जर आंब्यांचा रंग बदलला तर ते रासायनिक पद्धतीने पिकवलेले किंवा पॉलिश केलेले असण्याची शक्यता असते. (Marathi Latest NEws)

बकेट टेस्ट करा
आंबा खरेदी केल्यानंतरही काही उपाय करून केमिकल असलेला आंबा शोधू शकता. घरी आणलेले सर्व आंबे पाण्यानं भरलेल्या बादलीत ठेवा. जे आंबे पाण्यात स्थिरावतील, ते नैसर्गिकरित्या पिकलेले असतील. तसेच, जे आंबे वर तरंगणारे आहेत, ते रसायनांचा वापर करुन पिकवलेले असतील.

सालीचा रंग तपासा
कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रंग एकसारखा असतो आणि ते नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा जास्त पिवळे किंवा नारिंगी दिसू शकतात. तसेच, या आंब्यावर कृत्रिम चमक असल्याने आंबे थोडे अधिक चमकदार दिसू शकतात. तर नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांचा रंग एकसारखा कधीच नसतो. (Social News)

आंब्याची चव
जर आंबा केमिकल्सने युक्त असेल तर त्याची चव मंद किंवा विचित्र असू शकते. जर आंब्याची चव खराब असेल किंवा खाल्ल्यानंतर तो खराब वाटत असेल, तर तो कृत्रिमरित्या पिकवलेला असू शकतो.

Mango

कट टेस्ट करा
आंबा कापल्यानंतर जर त्याचा रंग गडत पिवळा असेल तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला असतो. आंब्याच्या कडा गडद आणि त्याचा गर जर हलका पिवळा असेल तर तो केमिकल्सच्या मदतीनं पिकवलेला आहे हे समजावे. (Top Stories)

स्पर्शाने ओळखा
हे आंबे गोड आहेत की आंबट हे तुम्ही आंब्यांना स्पर्श करून ओळखू शकता. जर आंब्याचा स्पर्श थोडा मऊ असेल तर याचा अर्थ असा होतो की तो गोड असेल. पण आतून खूप कठिण दिसत असेल तर तो आंबट असला पाहिजे.

=========

हे देखील वाचा : Muskmelon : उन्हाळ्यात खरबूज खा आणि ‘हे’ चमत्कारिक लाभ मिळवा

=========

हापूस आंबा कसा ओळखावा?
* हापूस आंबा वरच्या बाजूला फुगीर असतो, इतर आंबे तुलनेने निमुळते असतात.
* हापूस आंब्याचा देठ खोल असते.
* हापूस आंबा आतून केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी किंवा इतर आंबे हे आतून पिवळ्या रंगाचे असतात.
* हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. या सुगंधामुळे हा हापूस आंबा दुरून देखील पटकन ओळखता येतो.
* पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.
* हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.