सध्या एप्रिल महिना चालू आहे, अनेकांच्या शाळांना अजूनही सुट्टी लागलेली नाही. त्यामुळे अजूनही घरांमध्ये तसे सामान्यच वातावरण आहे. मात्र पुढच्या मे महिन्यात सर्वच शाळांना सुट्ट्या लागतील आणि मुलं देखील फ्री होतील त्यामुळे आतापासूनच घरांमध्ये मे महिन्यात कुठे फिरायला जायचे यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. मुलांना जरी सुट्ट्या असल्या तरी पालकांना सुट्ट्या नाहीत. त्यामुळेच जवळपास वीकेंडला जात येतील असे ठिकाणं शोधताना दिसत आहे. (Trimbkeshwar)
मात्र येऊन जाऊन माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा आदी ठिकाणांना जाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असे ठिकाण सांगणार आहोत, जिथे असणाऱ्या निसर्गाला धार्मिकतेची जोड आहे. शांत आणि थंड वाऱ्यासोबतच इथे मन प्रसन्न करणारे वातावरण देखील आहे. हे ठिकाण सगळ्यांना नक्कीच माहित असेल, अनेक लोकं इथे गेले देखील असतील हे ठिकाण आहे नाशिक जवळचे त्रंबकेश्वर. चला तर मग जाणून घेऊया. या ठिकाणाबद्दल. (Summer Holiday)
अनेक लोकं त्रंबकेश्वरला जाऊन आले असतील मात्र या ठिकाणाचा इतिहास आणि या ज्योतिर्लिंगाबद्दल खास माहिती खूपच कमी लोकांना ज्ञात असेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये १२ ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्व आहे. देशाच्या विविध ठिकाणी हे सर्व ज्योतिर्लिंग वसलेले आहेत. यातलेच एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्रंबकेश्वर महादेव. इतर ११ ज्योतिर्लिंगापेक्षा हे मंदिर, इथले शिवलिंग आणि याचा इतिहास खूपच वेगळा आहे. (Marathi)
=========
हे देखील वाचा : Mumbai : या सुट्ट्यांमध्ये भेट द्या मुंबईतील या ऐतिहासिक किल्ल्यांना
=========
अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी प्रसिद्ध असे नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर वसलेले आहे. नाशिक शहरापासून अगदी जवळ ३० किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. या मंदिराला मोठे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे मोठे आणि अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे तेथे बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी असते. (Marathi Top News)
त्रंबकेश्वर मंदिराचा इतिहास
नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ या कालावधीत हेमाडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. या मंदिराचा जीर्णोद्धार १७५५ मध्ये सुरू झाल्यानंतर ३१ वर्षांच्या मोठ्या काळानंतर १७८६ साली तो पूर्ण झाला. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी तब्बल अंदाजे १६ लाख खर्च झाल्याचे सांगितले जाते. भारत सरकारने या मंदिराला ३० एप्रिल १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. (Marathi Latest NEws)
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसावर पाच सुवर्णकलश असून मंदिरावरील ध्वजा पंचधातूंची आहे. हा कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी मंदिराला अर्पण केलेली आहे. मंदिराच्या उत्तर व्दारावर मंदिर निर्माणाचा इतिहास शिलालेख स्वरूपात कोरून ठेवण्यात आला आहे. त्र्यंबक मंदिराच्या बांधकामासाठी जेवढी वर्षे लागली तितकी मंदिरे अमृत कुंंडाच्या बाजूला परिसरात बांधण्यात आलेली आहेत. दक्षिणव्दारातून दर्शन करून बाहेर पडल्यानंतर ही मंदिरे नजरेस पडतात. (Marathi Trending News)
श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरला तर तोबा गर्दी असते. शिवाय तिसऱ्या सोमवारी तर ब्रह्मगिरी पर्वताची फेरी देखील असते. येथे ब्रह्मगिरी हा महाराष्ट्रातला उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा पर्वत आहे. भाविक या दिवशी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारली जाते. याच ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम झाला आहे. इथेच भगवान शिवने त्यांच्या जटा आपटल्या होत्या. या पर्वतावरून संपूर्ण त्रंबक परिसर अतिशय सुंदर दिसतो. (Social News)
त्रंबकेश्वर मंदिराजवळ तीन पर्वत आहेत, जे ब्रह्मगिरी, निलगिरी आणि गंगा द्वार म्हणून ओळखले जातात. ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते. नीलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरु यांचे मंदिर आहे. गंगा द्वार पर्वतावर गोदावरी किंवा गंगा देवीचे मंदिर आहे. मूर्तीच्या पायातून पाण्याचे थेंब थेंब थेंब पडतात, जे जवळच्या तलावात जमा होते.
ऐतिहासिक दृष्ट्या त्रंबकेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. येथे असलेल्या कुशावर्तमध्ये स्नान केल्याने पापांचे क्षालन होते. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी आदी अनेक धार्मिक विधी केले जातात. याच त्रंबकेश्वरमध्ये गोरखनाथांनी ९ नाथांना आणि ८४ सिद्धांना उपदेश केला होता असं देखील सांगितलं जातं. (Top Stories)
देशातील हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे, की या ठिकाणी शिवलिंग नाहीये. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. या शिवलिंगात ब्रम्हा, विष्णू, महेश हे तीनही ईश्वर विराजमान आहेत. अर्थात शिवलिंगाच्या वर जो अंडाकृती भाग असतो तो इथे नाही. त्याऐवजी तीन कोपऱ्या आहेत, ज्या त्रिदेवांचे प्रतीक आहेत. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विराजमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचं हे जगात एकमेव शिवलिंग असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर ज्योतिर्लिंगावर “त्रिकाल पूजा” केली जाते. ती पूजा द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच केली जाते.
=========
हे देखील वाचा : Nashik : नाशिक पर्यटन
=========
त्रंबकेश्वराची कथा
प्राचीन काळी ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्येचे पती ऋषी गौतम यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. या परिसरात असे अनेक ऋषी होते जे गौतम ऋषींचा हेवा करत होते आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते. एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषींवर गायींच्या हत्येचा आरोप केला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागेल, असे सर्वांनी सांगितले.
त्यानंतर गौतम ऋषींनी शिवलिंगाची स्थापना करून पूजा सुरू केली. ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव आणि माता पार्वती तेथे प्रकट झाले. देवाने वरदान मागायला सांगितले. तेव्हा गौतम ऋषींनी गंगा देवीला त्या ठिकाणी पाठवण्यासाठी शिवाकडे वरदान मागितले. देवी गंगा म्हणाली की, जर शिव देखील या ठिकाणी थांबले तर ती देखील येथेच राहील. भगवान शिवाने गंगेच्या विनंतीवरून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे वास्तव्य करण्याचे मान्य केले आणि गंगा नदी गौतमीच्या रूपाने तेथे वाहू लागली. गोदावरी हे गौतमी नदीचे नाव आहे.