Manali Adventure Sports : मनालीमध्ये पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, माउंटन बाइकिंग, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि झिपलाइनिंगसह वेगवेगळ्या प्रकारच्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची मजा लुटता येते. या ठिकाणी मित्रपरिवारासोबत नक्कीच एन्जॉय करू शकता. खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजण थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. अशातच भारतातील काही थंड हवेच्या ठिकाणांपैकी मनालीला भेट देऊ शकता. जाणून घेऊया मनातील काही अॅडव्हेंचर स्पोर्ट्सबद्दल सविस्तर…
झिपलाइनिंग
हिरव्यागार दरी आणि बर्फाळ डोंगरांमध्ये फिरण्याची आवड असेल आणि तुम्ही अडव्हेंचर्स असण्यासह उंचीची भीती नसेल तर मनाली मध्ये झिपलयिंगची मजा घेऊ शकता. मनालीच्या सोलंग घाटी ध्ये झिपलयिंग हे अॅडव्हेंटर स्पोर्ट्सची मजा घेऊ शकता. या ठिकाणी मित्रपरिवारासोबत नक्कीट तुमच्या ट्रिपची मजा द्विगुणीत होईल. डोंगररांगा आणि घाटांमधल्या शांतेतत अशाप्रकारचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करण्याची मजा काही औरच आहे. मनालीला देशातल्या कानाकोपऱ्यातून अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची मजा घेण्यासाठी येतात. याशिवाय मनालीत वेगवेगळ्या प्रकारच्या झिपलाईनचा आनंद घेऊ शकता. जसे की, एरियल स्किल आणि जंगल झिपलाईन इत्यादी. इथे तुम्हाला केबल पॉडच्या माध्यमातून उंचावरुन पर्वत रांगांमधील निसर्गाचे सौंदर्य तुमचा कॅमेरामध्ये टिपू शकता. झिपलयिंगच्या तिकिटाचे दर 2000 रुपये प्रति व्यक्ती आहे.

Manali Adventure Sports
पॅराग्लायडिंग
हिमालयातल्या हवेत एक वेगळाच आनंद आहे आणि तो तुम्ही पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून एन्जॉय करू शकता. पण मनातील पॅराग्लायडिंगची किंमत वेगवेगळी आहे. पॅराग्लाइडिंगसाठी तुम्हाला2500 पासून ते 6500 पर्यंत अशी रक्कम मोजावी लागू शकते. काही ठिकाणी ह्याचीच किंमत 12000 रुपये देखील असू शकते. तुम्ही मनालीमध्ये पॅराग्लायडिंग बऱ्याच ठिकाणी करू शकता. सोलंग घाटी, फातूर, बिजली,महादेव,कांगडा घाटी, मरही अशा ठिकाणी पॅराग्लाइडिंगचा आनंद घेऊ शकता. हे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स 14 वर्षांरील व्यक्तींसाठीच आहे.
स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग
स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग या अॅडव्हेंचर स्पोर्टची मज़ा घेण्यासाठी तुम्हाला सोलंग वॅली आणि रोहतांग पास येथे भेट द्यावी लागेल.या ठिकाणी मित्रपरिवारासोबत अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची मजा घेऊ शकता. मनालीच्या सुंदर अशा निसर्गरम्य रस्त्यांवर तुम्हाला ट्रेकिंग देखील करू शकता. तुम्ही या ठिकाणी माउंटन बाइकच्या मदतीने ही प्रवास करू शकता. तिकिटांची किंमत 2000 पासून ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकते.
==============================================================================================
हेही वाचा :
London : लंडन शहरापासून श्रीमंत चालले दूर !
Rambagh Palace : जगातील सर्वात लक्झरी हॉटेल रामबाग पॅलेस
=======================================================================================================
रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग
उंच ठिकाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करू शकता. हे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असेल. मनाली मध्ये रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठी काही खास गाव आहेत. जसे – मथियाना गावाच्या जवळच एक खडक आहे जिथे तुम्ही रॉक क्लाइंबिंगचा आनंद घेऊ शकता. मनालीमधीलच सोलंग वॅली आणि चीचोगामध्ये रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग लोकप्रिय आहे. या अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची किंमत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. प्रति व्यक्ती 300 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकतात. (Manali Adventure Sports)
बंजी जंपिंग
मानलीमध्ये बंजी जंपिंगची मजा तुम्ही कमीतकमी खर्चामध्ये घेऊ शकता. मनालीच्या जवळच असलेल्या कोठी गावात बंजी जंपिग करू शकता. हे गाव मनालीपासून 13 किलोमीटरवर आहे. या अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची किंमत प्रति व्यक्ती 2499 रुपये ते 4599 रुपये एवढी आहे.