Home » उन्हाळ्यात दररोज दही खाताय? करू नका या चुका, बिघडेल आरोग्य

उन्हाळ्यात दररोज दही खाताय? करू नका या चुका, बिघडेल आरोग्य

by Team Gajawaja
0 comment
Curd Benefits
Share

Curd Disadvantage in Summer : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजण थंड पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये दह्याचा देखील समावेश आहे. दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच हेल्दी बॅक्टेरिया असतात, जे गट हेल्थसाठी फायदेशीर मानले जातात. सकाळी किंवा दुपारी दह्याचे सेवन करू शकता. कारण यामधील व्हिटॅमिन आणि मिनिरल्स शरीराला पोषण देतात. मेंदूच्या आरोग्यासाठी दही उत्तम मानले जाते. स्नायूंना ते हाडांना बळकटी मिळण्यासाठी दह्याचे सेवन करू शकता.

मात्र उन्हाळ्यात दह्याचे दररोज सेवन करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कारण यावेळी दह्यामध्ये थोडं पाणी घालून सेवन करावे. याशिवाय उन्हाळ्यात दररोज दह्याचे सेवन करताना कोणत्या चुका करणे टाळावे हे पुढे जाणून घेऊया.

दह्यामध्ये मीठ घालू नका
काहीजण दह्यामध्ये जीरे पावडर आणि मीठ घालून खाणे पसंत करतात. पण आयुर्वेदानुसार, असे करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात नाही. मीठाचे दह्यासोबत सेवन करणे टाळावे. अन्यथा कमी प्रमाणात मीठ दह्यामध्ये मिक्स करावे.

Curd

आंबट फळांसोबत दही खाणे टाळा
दह्याचे आंबट फळांसोबत सेवन करणे टाळावे. याशिवाय तिखट पदार्थांसोबतही दही खाऊ नका. यामुळे गट हेल्थला नुकसान पोहोचले जाते. दही खाताना त्यामध्ये आवळ्याची पावडर, मध मिक्स करू शकता यामुळे आरोग्याला पोषण तत्त्वे मिळतात.

पालेभाज्यांसोबत दही नको
दही कधीच पालकसारख्या भाज्यांसोबत खाऊ नये. यामध्ये ऑक्सालेटचे प्रमाण अधिक असते आणि दह्यामधील कॅल्शियमच्या कारणास्तव पचनास समस्या उद्भवू शकते. पालक पचण्यास थोडा वेळ लागतो. यामुळे दही आणि पालकाचे एकत्रित सेवन केल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

=======================================================================================================

हेही वाचा : 

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टींचे सेवन करणे टाळा

Portfolio Diet म्हणजे काय? घ्या जाणून सविस्तर इन्फो

=======================================================================================================

नॉनव्हेजसोबत दही टाळा
दही नॉनव्हेज पदार्थांसोबत खासकरुन माशांसोबत खाणे टाळावे. यामुळे पचनक्रिया बिघडणे, पीएच बॅलेन्स न होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशातच काही आरोग्यासंबंधित समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.(Curd Disadvantage in Summer)

दह्याचे सेवन असे करू नका
दही खाण्यापूर्वी गरम करू नये. असे केल्यने त्यामधील पोषण तत्त्वे नष्ट होतात. यामुळे आरोग्याला फायदा होत नाही.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.