Home » Rambagh Palace : जगातील सर्वात लक्झरी हॉटेल रामबाग पॅलेस

Rambagh Palace : जगातील सर्वात लक्झरी हॉटेल रामबाग पॅलेस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rambagh Palace
Share

अनेकदा भारतामध्ये विविध देशांमधील मोठमोठी राजकीय मंडळी येत असतात. भारताला भेट देण्यामागे केवळ पर्यटन हा हेतू नसतो तर यामागे अनेक राजकीय महत्वाचे हेतू आणि उद्दिष्ट असतात. आजवर भारतामध्ये विविध देशांमधील अनेक मोठे मान्यवर आले. आता सध्या देखील भारतामध्ये अतिशय मोठे राजकीय व्यक्तिमत्व भारत दौऱ्यावर आले आहेत. महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. राजकीयदृष्ट्या त्यांचा भारत दौरा फारच महत्वाचा आणि विशेष मानला जात आहे. (Rambagh Palace)

जेडी वेन्स यांनी त्यांच्या या दौऱ्यामध्ये दिल्लीमधील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराला भेट दिली. आता ते जयपूरला देखील जाणार आहे. जेडी वेन्स हे त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा आणि मुलं यांच्यासोबत भारत दौऱ्याला आले आहेत. जेडी वेन्स यांना भारताच्या समृद्ध अशा सांस्कृतिक वारशाला जवळून अनुभवायचे असल्याने ते भारतातील दिल्ली, आग्रा, जयपूर अशा महत्वाच्या शहरांना भेट देऊन तेथील ऐतिहासिक ठिकाणं पाहणार आहेत. (JD vence)

अशातच जेडी वेन्स आता जयपूरमध्ये असून ते येथे रामबाग पॅलेस या ऐतिहासिक हेरिटेज हॉटेलमध्ये राहणार आहे. जे पूर्वी राजस्थानच्या राजघराण्याचे वैभव असलेले निवासस्थान होते. भारतातील नव्हे जगातील अतिशय प्रसिद्ध हॉटेलपैकी एक हॉटेल म्हणून या हॉटेलची ओळख आहे. हे हॉटेल भारतातील सर्वात महागडे हॉटेल देखील आहे. हा सुंदर राजवाडा एकेकाळी जयपूरच्या राजाचं निवासस्थान होतं. चला तर मग जाणून घेऊया या हॉटेलचा इतिहास आणि इतर माहिती. (Marathi Trending News)

=========

हे देखील वाचा : Akshardham : दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराची खास वैशिष्ट्ये

=========

Rambagh Palace

रामबाग पॅलेस जवळजवळ १९० वर्षे जुना राजवाडा आहे आणि आता त्याचे एका आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर केले गेले आहे. या हॉटेलमध्ये वेन्स कुटुंबासाठी १० लक्झरी सुइट्स बुक करण्यात आले आहेत. वेन्स या हॉटेलमध्ये यांत असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी १ एप्रिलपासूनच सुरू झाली होती. सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य दिले जात असल्याने या हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग १ ते २३ एप्रिलपर्यंत बंद होते. (Marathi Top Stories)

प्राप्त माहितीनुसार वन्स कुटुंब रामबाग पॅलेसच्या सर्वात भव्य आणि महागड्या ग्रँड प्रेसिडेन्शियल सूटमध्ये थांबणार आहे. या सुटचे क्षेत्रफळ अंदाजे १,७९८ चौरस फूट आहे आणि हे सूट खासकरून उपराष्ट्रपतींच्या कुटुंबासाठी तयार करण्यात आले आहे. या सुटचा एक रात्रीचा दर जवळपास १६ लाखांपर्यंत आहे. दरम्यान हे रामबाग पॅलेस हॉटेल आधी एक भव्य राजवाडा होता. या राजवाड्याचे नंतर हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. (Top Stories)

जगातील सर्वात आलिशान आणि भव्य हॉटेल्सपैकी एक असलेले रामबाग पॅलेस हे हॉटेल १९० वर्ष जुने आहे. रामबाग पॅलेस ‘ज्युवेल ऑफ जयपूर’ म्हणून देखील ओळखले जाते. या शाही राजवाड्यात तब्बल ७९ खोल्या आहेत. महाराजा सवाई मानसिंग द्वितीय आपल्या राणीसाठी हा महल बांधला होता. रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये वेगवेगळे रूम्स आहेत, येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे ३० हजारांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत आहे. यात ड्रेसिंग एरियासह रॉयल डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूम देखील आहे. येथे आलेल्या पाहुण्यांना शाही वागणूक मिळते. (social News)

Rambagh Palace

महाराजा सवाई मानसिंग यांनी त्यांच्या द्वितीय पत्नीसाठी गायत्री देवी यांच्यासाठी हा महल बांधला होता. गायत्री देवी यांचा जन्म २३ मे १९१९ रोजी लंडनमध्ये झाला. वयाच्या १२ व्या वर्षी, एका शर्यतीदरम्यान त्यांची भेट महाराजा सवाई मानसिंग यांच्याशी झाली. पहिल्याच भेटीत त्या महाराजा सवाई मानसिंग यांच्या प्रेमात पडल्या. महाराजांनी आधीच दोनदा लग्न केले होते. तरीही राजकुमारी गायत्री त्यांच्या प्रेमात पडल्या. कुटुंबाचा याला विरोध होता. अखेर १९४० मध्ये दोघांनी लग्न केले. त्यावेळी या लग्नावर ३.५ लाख रुपये खर्च झाले होते. (Social Update)

महाराजा सवाई मानसिंग यांनी गायत्री देवीसाठी रामबाग पॅलेस बांधला. राणी गायत्री देवी जयपूरच्या महाराणी बनल्या. या राजवाड्याच्या तिजोरीत ८०० kg सोनं आणि तब्ब्ल १५००० कोटींची रोकड असल्याचे देखील सांगण्यात येते. हा राजवाडा १८३५ मध्ये बांधला गेला. या पॅलेसच्या डिझाइनसाठी महाराजांनी त्याकाळातील प्रसिद्ध डिझायनर सॅम्यूअल स्विंटन जेकबची निवड केली होती. त्यानंतर जेकबने जी कलाकृती तयार केली ती आजही लक्षवेधी ठरते. त्यानंतर १९२५ मध्ये रामबाग पॅलेस हे जयपूरच्या महाराजांचं निवासस्थान बनलं. पुढे १९५७ मध्ये महाराजा सवाई मान सिंह यांनी या महालाचं आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर केलं. हा राजवाडा ४७ एकरमध्ये पसरलेला आहे. (Marathi)

या राजवाड्यामध्ये अनेक आलिशान सूट, संगमरवरी कॉरिडॉर, मोठे हवेशीर व्हरांडे आणि मोठे बगीचे आहेत. हॉटेलमध्ये एक मोठा स्विमिंग पूल देखील आहे. यासोबतच तुम्हाला खेळाची आवड असेल तर या हॉटेलमध्ये पोलो गोल्फ, जिवा ग्रांडे स्पा, जकूझी, इनडोअर, आउटडोअर स्विमिंग, वॉकिंग ट्रेल, फिटनेस हब, योगा पॅव्हेलियनमध्ये योगा यासारख्या लक्झरी सुविधाही उपलब्ध आहेत. (Marathi Top News)

=========

हे देखील वाचा : Historical Buildings : भारतातील महिला शासकांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू

=========

Rambagh Palace

रामबाग पॅलेस हे जयपूरमध्ये असून, इथे पोहचण्यासाठी तुम्ही विमान, रेल्वे किंवा तुमच्या खासगी वाहनाचा देखील वापर करू शकता. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे हॉटेल फक्त ११ किमी अंतरावर आहे. टॅक्सी किंवा खासगी वाहनाने येथे सहज पोहोचता येते. शिवाय जयपूर रेल्वे स्थानक पासून हे हॉटेल केवळ ६ किमी दूर आहे. राष्ट्रीय महामार्गांद्वारे जयपूरला भारतातील सर्वच महत्वाच्या शहरांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करून येथे येणे देखील शक्य आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.