ब्रिटिश सत्तेवरील सूर्य कधीही मावळत नाही, असे एकेकाळी गर्वानं सांगितले जायचे. अवघ्या जगभर ब्रिटीशांची सत्ता पसरली होती. जगभरातील देशांवर राज्य करुन ब्रिटननं आपला खजाना भरला. मात्र आता याच खजिन्याला घरघर लागली आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या ब्रिटनची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ब्रिटन म्हणजे, श्रीमंतांचा देश अशी ओळख होती. तेच श्रीमंत या देशाला सोडून अन्य देशांच्या आश्रयाला जात आहेत. ब्रिटनची राजधानी असलेले लंडन हे एकेकाळी जगातील सर्वाधिक करोडपतींचे शहर म्हणून परिचित होते. मात्र याच लंडनला करोडपती सोडून दुस-या देशाच्या आश्रयाला जात आहेत. (London)
2014 पासून हे स्थलांतर होत आहे. त्यातही कोविड-19 च्या महामारीमध्ये ब्रिटनला बसलेला आर्थिक फटका अद्यापही दूर झालेला नाही. त्याचाही परिणाम येथील करोडपती उद्योजकांना बसला आहे. त्यामुळेच कमकुवत होत असलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला अधिक फटका बसत आहे. ब्रिटनची उत्पादन क्षमता मंदावत चालली असून अन्य देशांच्या तुलनेत ब्रिटनचा विकास दर कमी होत चालला आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी ब्रिटनची सत्ता ज्या देशांवर होती, त्या देशांचा विकास दरही आता ब्रिटनपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. या सर्वात आपल्या देशाची आर्थिक स्थिती भक्कम करायला मदत करण्याऐवजी येथील उद्योजकांनी आपला तोटा दूर करण्यासाठी अन्य देशांना जवळ केले आहे. परिणामी ब्रिटनमधील अनेक उद्योगसंस्था बंद झाल्या आहेत, त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली असून महागाईचा स्तरही वाढला आहे. (International News)
ब्रिटन हा देश शाही देश म्हणून ओळखला जातो. येथील राजघराणे हे जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि लोकप्रिय राजघराणे आहे. याच ब्रिटननं जगावर राज्य केलं आहे. पण ब्रिटनची ही सत्ता आता लोप पावली आहे. येथील उद्योगधंद्यांमध्ये मंदिचे वातावरण आहे. उत्पादन वाढीचा वेगही कमी झाल्यामुळे या देशात महागाईचे प्रमाण अधिक वाढले आहे. यासंदर्भात ब्रिटनमधील काही संस्थांनी अभ्यास करुन एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार लंडनमध्ये एकेकाळी जगातील सर्वात धनाढ्य व्यावसायिक रहात होते. हे व्यावसायिक आता लंडन सोडून अन्य देशांमध्ये स्थायिक होत आहेत. त्यांनी आपल्या उद्योगधंद्यानाही अन्य देशात नेले आहे. यामुळे ब्रिटनमधील उत्पादनातील वाढ कमी झाली आहे. याची सुरुवात 2007-2009 या वर्षापासून झाली. या वर्षात आलेल्या आर्थिक मंदिची झळ ब्रिटनला मोठ्या प्रमाणात बसली. यातून ब्रिटनची अर्थव्यवस्था कधीच स्थिर होऊ शकली नाही. युरोपिय युनियनमधूनही ब्रिटन बाहेर पडला. या सर्वातून सावरत असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था कोविड-19 मध्ये पार कोलमडून गेली. (London)
याचा परिणाम म्हणजे, ब्रिटनमधील करोडपतींनी देश सोडण्यास सुरुवात केली. 2007 पासून हे स्थलांतर सुरु झाले होते. पण त्यात 2017 सालापासून अधिक वाढ झाली. कोरोना साथीमध्ये तर यात मोटी वाढ झाली. आता हजारो उद्योगपती लंडनमधून बाहेर जात असल्याचे चित्र आहे. अहवालानुसार 2024 मध्ये 11300 हून अधिक करोडपती लंडन सोडून अमेरिका आणि आशिया मधील देशांत स्थलांतरीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 10 वर्षांत लंडनमधील 12 टक्के श्रीमंत नागरिक अन्य देशात रहायला गेले आहेत. परिणामी एकेकाळी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती रहात असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणा-या लंडन शहरानं आपली ओळख गमावली आहे. आता लंडन जगातील टॉप 5 श्रीमंत शहरांच्या यादीतूनही बाहेर पडले आहे. लंडनमधून बाहेर पडणा-या या उद्योगपतींमुळे येथील उद्योगही बंद होत आहेत. या शहरात नोकरीच्या संधीही कमी होत आहेत. (International News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!
=======
विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील नोक-या या शहरात फारच अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. न्यू वर्ल्ड वेल्थचे संशोधन प्रमुख अँड्र्यू अमॉइल्स यांनी लंडनपेक्षा आशियामधील कुठल्याही देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नोक-या अधिक असल्याचे सांगितले आहे. शिवाय लंडनमध्ये मालमत्ता कर सर्वाधिक आहे. त्यामुळेही उद्योगपती या शहरापासून दूर होत चालल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शिवाय लंडन स्टॉक एक्सचेंजचे महत्त्व कमी होत आहे. जागतिक बाजार व्यवस्थेत लंडन स्टॉक एक्सचेंजचा प्रभाव नाही. जगातील टॉप 10 स्टॉक एक्सचेंजच्या यादीत त्याचा समावेश नाही. या सर्वांचा फायदा अमेरिका आणि आशियाला झाला आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये करोडपतींची संख्या 98% ने वाढली आहे. तर आशियातील सिंगापूरमध्ये ही वाढ 62% आहे. दुबई, टोकियो आणि लॉस एंजेलिस सारख्या शहरांमध्येही करोडपतींची संख्या वेगाने वाढत आहे. न्यू यॉर्क शहर 3,84,500 करोडपतींसह जगातील सर्वात श्रीमंत शहर झाले असून शाही देश म्हणून ओळखला जाणारा ब्रिटन या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. (London)
सई बने