उन्हाळा सुरु झाला की शरीराची अतिशय योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. उत्तम खानपान सोबतच आपले शरीर कायम हायड्रेटेड राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा थकवा येणे, चक्कर येणे, उष्माघात होणे आदी गंभीर समस्या उदभवू शकतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त एक गोष्ट पाळली पाहिजे आणि ती म्हणजे सतत पाणी पिणे. शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही हे पाहिले पाहिजे. यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच पाणी असलेली फळं देखील खाल्ली पाहिजे. (Watermelon)
जेव्हा जेव्हा पाणीदार किंवा भरपूर पाणी असलेल्या फळांचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यासमोर आणि डोक्यात एकच फळ येते हो, तेच कलिंगड. कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते. उन्हाळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कलिंगड. उन्हाळा सुरु झाला की, मार्केटमध्ये लाल चुटुक कलिंगड आपले लक्ष वेधून घेतात. या ऋतूमध्ये अतिशय लाभदायक फळ म्हणून कलिंगडाकडे पाहिले जाते. चविष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी फळ म्हणून कलिंगडाची ओळख आहे.(Summer and Watermelon)
आपल्याला निरोगी ठेवण्यामध्ये फळं मोठी भूमिका बजावत असतात. आहारामध्ये फळांचे सेवन केल्यास शरीराला नैसर्गिकरित्या साखर मिळण्यास मदत होते. फळं खाल्ल्यामुळे शरीरामध्ये साखरेचे आणि पाण्याचे प्रमाण संतुलित राहाण्यास मदत होते. फळांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात जेवणापेक्षा अधिक फळांचे सेवन केल्यास उत्तम आरोग्य राहाण्यास मदत होते. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते पाहूया. (Summer Health Care Tips)
==========
हे देखील वाचा : Summer : उन्हाळ्यात स्टायलिश लूक पाहिजे…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो
==========
* कलिंगडाचे सेवन आरोग्याससाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कलिंगडाचे सेवन केल्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेशन मिळते. कलिंगडामध्ये ९२% पाणी असते ज्यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहाते. (Marathi Top News)
* कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए आणि बी६ असते, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकशक्ती वाढते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाही. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅनिन सी असते ज्यामुळे त्याचे सेवन तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. (Marathi News)
* उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराले उर्जा मिळते ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिम असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते.
* कलिंगडाचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि अमीनो अॅसिडसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. (Marathi Trending News)
* कलिंगड खाल्ल्यास शरीरातील सर्व हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. कमी कॅलरीज आणि चरबीमुक्त असल्याने, वजन कमी करण्यासाठी देखील हे एक उत्तम फळ आहे.
* कलिंगडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करून पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देते. (Top Stories)
* कलिंगडाच्या सेवनामुळे छातीतील जळजळ दूर होण्यास मदत होते. एवढेच नाही तर याच्या नियमित सेवनामुळे मूत्राशयात संसर्ग देखील कमी होतो.
मात्र कलिंगडाचे हे सर्व फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही हे फळ योग्य वेळेत खाल. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नक्की क्या? आता काय फळं खायला देखील योग्य वेळ पाहायची का? तर याचे उत्तर आहे हो… कोणतीही गोष्ट योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणत खाल्ली तर ती आपल्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक ठरते. मग कलिंगड खायची योग्य वेळ कोणती? चला जाणून घेऊया याबद्दल. (Social News)
==========
हे देखील वाचा : Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय
==========
जड जेवण जेवल्यानंतर लगेचच कलिंगड खाणे आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पचन प्रक्रिया मंदावू शकते. असे केल्यास तुम्हाला पोटाशी संबंधित त्रास देखील होऊ शकतात. म्हणून, कधीही कलिंगड आणि जेवण एकत्र घेऊ नये. जर तुम्ही जेवणाच्या वेळी कलिंगड खात असाल तर तुम्ही जेवण जेवले नाही तरी चालते. शिवाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात कलिंगड खाऊ शकता. मात्र याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास देखील त्रास उदभवू शकतात.(Social Update)
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कलिंगड खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी १० ते १२ तर संध्याकील ५ च्या आत कलिंगड खाणे फायदेशीर ठरते. यातही तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये कलिंगडाचा समावेश करू शकता. मात्र मधुमेह अर्थात डायबिटीस असणाऱ्या लोकांनी कलिंगड कमी खावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे. कारण यात नैसर्गिकरीत्याच साखरेचे प्रमाण खूप असते. (Marathi Top Trending News)