सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढताना दिसत आहे. या उन्हाचा सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणावर त्रास होताना दिसत आहे. या कडक उन्हाळ्याला मोठ्या प्रदूषणाची देखील चांगलीच साथ मिळत आहे. याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर, आरोग्यावर आणि खासकरून आपल्या त्वचेवर होताना दिसत आहे. ऊन आणि प्रदूषण यामुळे सर्वाधिक नुकसान त्वचेचे होत आहे. त्वचा काळवंडते, पुरळ येतात, पिग्मेंटेशन होते, त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. आपल्याला त्रास होत असला तरी आपण घरी बसून राहू शकत नाही. विविध कामांमुळे आपल्याला घरातून बाहेर पडणे आवश्यक आहे. मग यावर उपाय काय? (Summer)
पार्लरमध्ये रोज रोज जाणे प्रॅक्टिकली शक्य नाही आणि खिश्याला देखील ते परवडणारे नाही. मग असे कोणते घरगुती सोपे उपाय आहेत का, जे केल्याने जास्त खर्च देखील होणार नाही आणि घरच्याघरी कोणत्याही त्रासाशिवाय पार्लरसारखी नितळ सुंदर त्वचा मिळेल? हो आहेत ना…चला मग आज आपण या लेखातून असेच काही घरगुती सोपे आणि सहज होणारे उपाय जाणून घे, जे केल्याने तुम्हाला अतिशय सुंदर आणि आकर्षक त्वचा मिळेल. (Summer Remedies)
* कॉफी फेसमास्क
साहित्य :- कॉफी पावडर, पाणी, कॉर्न स्टार्च, कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल
कृती :- कॉफी मास्क तयार करण्यासाठी भांड्यामधे कॉफी पावडर घेऊन त्यात पाणी घालून कॉफी उकळवून घ्यावी. तयार कॉफी गाळून घ्या आणि त्यात कॉर्न स्टार्च घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि विटामिन ई कॅप्सूल टाकून जाडसर पेस्ट तयार करा. हा कॉफी फेसमास्क लावण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तयार केलेला मास्क संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर काहीवेळ फेसमास्क तसाच ठेवा. मास्क कोरडा झाल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम तर होतेच सोबतच त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. (Marathi Top News)
* बेसन आणि मध फेसपॅक
साहित्य :- बेसन, हळद, मध, पाणी
कृती :- एका वाटीमध्ये १ चमचा बेसन घेऊन त्यात हळद टाका. त्यानंतर त्यात मध आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा. बेसनच्या मिश्रणाची जाडसर पेस्ट बनवा. हा तयार केलेला मास्क काळवंडलेल्या त्वचेला लावून लावून घ्या. १५ ते २० मिनिटं ठेवून मास्क कोरडा झाल्यानंतर हाताने मसाज करा. चेहऱ्याला आणि हातापायांना मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर थंड पाण्याने हात पाय आणि चेहरा स्वच्छ धुवा. मास्क धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावून ठेवा.(Marathi Trending News)
==========
हे देखील वाचा : Summer : उन्हाळ्यात स्टायलिश लूक पाहिजे…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो
Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय
==========
* बटाट्याचा रस
बटाट्यामध्ये नैसर्गिक स्वरूपातच ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. बटाट्याचा रस काढून त्वचेवर लावावा आणि १५ ते २० मिनिटे ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने तो धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा उजळ आणि टॅन फ्री दिसेल. (Top tories)
* दही आणि हळदीचा पॅक
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा रंग सुधारतात. दही आणि हळदीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. नियमित वापरामुळे तुम्हाला टॅनिंगपासून आराम मिळू शकतो.(Marathi Latest News)