आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जास्त लोकांना माहित नसल्या तरी देखील महत्वाच्या आहेत. अशीच एक आपल्या वेद पुराणानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पृथ्वीवर असणारे आठ चिरंजीव. आपल्या पुराणांमध्ये असे आठ पुरुष आहेत जे कोणत्या वचनाने, वरदानाने किंवा शापाने चिरंजीव झाले आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व पुरुष दैवी शक्तींनी संपन्न आहेत. योगामध्ये सांगितलेल्या आठ सिद्धींच्या सर्व शक्ती त्याच्यामध्ये आहेत. सनातन धर्मात सप्त चिरंजीवींना पृथ्वीचे सात महामानव म्हटले आहे. पुराणानुसार सप्त चिरंजीवी कोण आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. (Hindu)
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः ॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम् ।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित ॥
अर्थात अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम हे सात महामानव चिरंजीवी आहेत. या सात महापुरुषांसोबत आठव्या ऋषी मार्कंडेयांचे रोज स्मरण केले तर शरीरातील सर्व रोग संपून माणूस शतायुषी होईल. चला तर मग जाणून घेऊया या सर्व चिरंजीवांबद्दल.
अश्वत्थामा (Ashwathama)
गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आजही श्रीकृष्णाच्या शापामुळे पृथ्वीवर भटकत असल्याचे सांगितले जाते. महाभारतानुसार अश्वथामाच्या कपाळावर एक मणी होता. पण अर्जुनने तो मणी बाहेर काढला होता. ब्रह्मास्त्र वापरल्यामुळे, कृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला होता की तू या पृथ्वीवर कल्पंतापर्यंत राहशील, म्हणूनच अश्वत्थामाची गणना चिरंजीवांमध्ये केली जाते. तो आजही जिवंत आहे आणि त्याच्या कर्मामुळे भटकत आहे अशी मान्यता आहे. मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर आणि हरियाणात त्यांच्या रूपाची लोककथा आजही प्रचलित आहे. (Marathi News)
=======
हे देखील वाचा : Neha Kakkar : भावंडांमधील Sibling Divorce म्हणजे काय?
=======
राजा बळी (Raja Bali)
देवांवर हल्ला करण्यासाठी बळी राजाने इंद्रलोकाचा ताबा घेतला होता. मात्र राजा बळीचा गर्व नष्ट करण्यासाठी, भगवान विष्णूनी वामन अवतार घेत ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि राजा बळीकडे तीन पद जमीन मागितली. भगवंताने रूप अतिशय भव्य आणि मोठे केले आणि पृथ्वी आणि आकाश दोन पावलांमध्येच काबिज केले. आता तिसरे पाऊल कुठे ठेवणार असा प्रश्न उपस्थित झाल्यावर राजा बळीने त्याच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवले. आपल्या पुराणानुसार राजा बळी हा भक्त प्रल्हादचा वंशज असल्याचे सांगितले आहे. राजा बळीचे दानशूर वृत्ती पाहून श्रीहरी विष्णू बळीवर प्रसन्न झाले आणि बळी राजा श्री विष्णूंचा द्वारपाल झाला. (Marathi Top News)
ऋषी व्यास (Rushi Vyas)
ऋषी व्यास यांना वेदव्यास म्हणूनही ओळखले जाते. चार वेद, १८ पुराणे, महाभारत, श्रीमद भगवत गीता आणि भविष्यपुराण यांची रचना ऋषी व्यासांनीच केली आहे. त्यांना वैराग्याचे जीवन प्रिय होते, परंतु आईच्या सांगण्यावरून त्यांनी विचित्रवीर्याच्या दोन्ही निपुत्रिक राण्यांकडून नियोगाच्या नियमाने धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर या तीन पुत्रांना जन्म दिला होता. (Marathi Trending News)
हनुमान
अंजनी पुत्र हनुमानालाही अमर राहण्याचे वरदान मिळाले आहे. श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेल्या हनुमानाच्या भक्तीची चर्चा आजही नेहमी होते. मात्र महाभारतात देखील हनुमान असल्याचे संदर्भ आपल्या पुराणांमध्ये आहे. याबद्दल एक कथा देखील प्रसिद्ध आहे की, भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमान म्हाताऱ्या वानरांचे रूप घेऊन भीमाच्या वाटेत शेपटी पसरून बसतात. भीम त्यांना आपली शेपटी मार्गातून काढायला सांगतो. तेव्हा हनुमान म्हणतात की ती तू स्वतः बाजूला कर, पण भीमाने आपली सर्व शक्ती एकवटून देखील हनुमानाची शेपूट काही बाजूला करू शकला नाही. यानंतर भीमाचे गर्व हरण झाले होते. शिवाय जेव्हा सीता माता लंकेतील अशोक वाटिकेत होत्या, तेव्हा तिथे हनुमानाकरवी श्रीरामाचा संदेश ऐकून हनुमानजी अमर राहतील असा आशीर्वाद त्यांनी दिला होता. (Top Stories)
विभीषण (Vibhishan)
विभीषण हा रावणाचा धाकटा भाऊ आहे. विभीषण देखील श्रीरामाचे मोठे भक्त आहे. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, तेव्हा विभीषणाने रावणाला श्रीरामाशी शत्रुत्व न घेता त्यांना ओळख ते स्वयं विष्णू अवतार असल्याचे सांगत माता सीतेला सन्मानाने परत पाठव असा सल्ला दिला होता. याच गोष्टीवरून रावणाने विभीषणाला लंकेतून हाकलून दिले होते. तेव्हा विभीषण श्रीरामाच्या सेवेत गेले आणि त्यांनी रामाला युद्धात मदत केली होती. विभीषण देखील सात चिरंजीवांपैकी एक आहे. (Social Updates)
कृपाचार्य (Krupacharya)
कृपाचार्य हे अश्वथामाचे मामा आणि कौरवांचे कुलगुरू होते. शिकार करत असताना शंतनूला दोन मुलं सापडली. शंतनूने त्यांना कृपी आणि कृप अशी नावे देऊन वाढवले. महर्षी गौतमाचा मुलगा शरदवन याच्या वेळूवर वीर्य पडल्यामुळे कृपा आणि कृपी यांचा जन्म झाला अशी पौराणिक कथा आहे. (Social News)
महर्षी परशुराम (Maharshi Parshuram)
परशुराम हे भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे. परशुराम यांचे वडील जमदग्नी तर आई रेणुका आहेत. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकरानी आपले शस्त्र रामाला दिले. तेव्हापासून राम हे परशुराम झाले. परशुरामांचा जन्म वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला. याच वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. भगवान परशुराम हे श्रीरामाच्या आधी होते, पण चिरंजीवी असल्याने ते श्रीरामाच्या काळातही राहिले. परशुरामाने २१ वेळा पृथ्वीवरून सर्व धर्महीन क्षत्रिय राजांचा नाश केला असल्याची आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. (Top Marathi Stories)
=======
हे देखील वाचा : Longest Flights : ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब आणि वेळ खाऊ विमान प्रवास
Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा
=======
ऋषी मार्कंडेय (Rushi Markandey)
मार्कंडेय ऋषी हे भगवान शिवाचे परम भक्त होते. त्यांनी आपल्या तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि महामृत्युंजय मंत्र सिद्ध केला. म्हणूनच मार्कंडेय ऋषींचेही रोज स्मरण करायला सांगितले आहे.