Home » Ramnavmi : रामनवमी कधी आहे? रामनवमीचे महत्व काय?

Ramnavmi : रामनवमी कधी आहे? रामनवमीचे महत्व काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ramnavmi
Share

गुढीपाडव्याच्या मोठ्या सणाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर अतिशय आनंदाने झाली. चैत्र महिन्यातील पाडव्यानंतरचा दुसरा मोठा सण म्हणजे रामनवमी. आदर्श पुरुष अशी ओळख असलेल्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजे रामनवमी. आपल्या हिंदू लोकांचे आराध्य दैवत म्हणून श्रीराम यांना ओळखले जाते. प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णूचे सातवे अवतार, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते.(Ramnavmi)

श्रीराम यांनी जीवनभर कोणतीही तडजोड न करता आपले तत्व पाळले. त्यांनी नेहमीच सत्याचा मार्ग निवडला. ‘एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी’ हे तीन महत्वाचे गुण असलेले श्रीराम म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्श आहे. अशा या श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमीचा सण आता अगदीच जवळ आला आहे. रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचनिमित्ताने आपण जाणून घेऊया रामनवमी बद्दल अधिकची माहिती. (Shri Ram Navmi Information)

श्रीहरी विष्णू यांचे अवतार असलेल्या भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचे पठण केले जाते, गीत रामायणाचे कार्यक्रम केले जातात, भजन कीर्तन करून भगवान श्रीरामाची उपासना करतात. राम मंदिरांमध्ये तर श्रीरामांचा जन्मोत्सव करतात. दुपारी जेव्हा श्रीरामांचा जन्म झाला होता त्याच वेळेला श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्रीरामाचा पाळणा देखील गायला जातो. यादिवशी राम मंदिरं भाविकांनी भरलेली असतात.(Marathi Latest News)

Ramnavmi

========

हे देखील वाचा : Uluru : तुम्हाला माहित आहे का…? चमत्कारिक रंग बदलणाऱ्या डोंगराबद्दल

========

राम नवमी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:२६ वाजता सुरू होईल, आणि रविवार, ६ एप्रिल रोजी ७:२२ वाजता समाप्त होईल. त्यामुळे उगवत्या सूर्याने बघितलेल्या तिथीनुसार रामनवमी रविवार, ६ एप्रिल साजरी केली जाईल. ६ एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३९ पर्यंत राहील. पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे दोन तास ३१ मिनिटे असेल. (Marathi News)

रामनवमी शुभ योग
रामनवमीच्या दिवशी रवि पुष्य, सुकर्मा, रवि, सर्वार्थ सिद्धी, असे अनेक योग निर्माण होत आहेत. रामनवमीला सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग निर्माण होईल. त्याशिवाय ७ एप्रिल रोजी सकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून ते ०६ वाजून १७ मिनिटांपर्यंत रवि पुष्य योग असेल आणि सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपासून सुरू होईल आणि तो संपूर्ण दिवस राहील. (Top Stories)

‘रामनवमी’चे महत्त्व
त्रेतायुगात अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी भगवान विष्णू यांचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमी अर्थात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रीराम यांचा जन्म मोठ्या कारणासाठी या पृथ्वीवर झाला होता. भवन विष्णूनी त्यांच्या राम अवतारामध्ये रावणासारख्या शक्तिशाली राक्षसाचा वध केला आणि पुन्हा मनुष्याचे रक्षण केले. (Marathi Trending News)

Ramnavmi

========

हे देखील वाचा : IPL : धोनीच्या आऊट होण्यावर दिलेल्या एक्सप्रेशनमुळे रातोरात व्हायरल झालेली ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?

========

रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्मोत्सव रामाच्या मंदिरासोबतच इतरही अनेक मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये देखील साजरा केला जातो. या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास श्रीराम यांचा जन्म झाला असल्याने १२ ला रामाला पाळण्यात घातले जाते, त्याला झुलवले जाते. पाळणा गायला जातो. शिवाय मंदिरात, मठांत यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. श्रीरामांसोबतच माता सीतेची देखील यादिवशी पूजा केली जाते सीता मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने, माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.