Home » Kavya Maran : आयपीएलमध्ये सतत लाइमलाईट्मधे येणारी काव्या मारन आहे तरी कोण?

Kavya Maran : आयपीएलमध्ये सतत लाइमलाईट्मधे येणारी काव्या मारन आहे तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kavya Maran
Share

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल म्हणजे सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी जेव्हा २००७ साली आयपीएल सुरु झाले तेव्हापासून यंदाच्या १८ व्या सिझनपर्यंत या लीगची क्रेझ कमी न होता वाढत जात आहे. या आयपीएलमध्ये मागील अनेक सीझनपासून एक चेहरा सतत प्रकाशझोतात येत आहे. अगदी टीव्ही स्क्रीनवर आणि सोशल मीडियावर देखील ‘याच’ चेहऱ्याची चर्चा रंगताना दिसत आहे. खासकरून जेव्हा जेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या मॅचेस होतात तेव्हा हा चेहरा खूपच लाईमलाइट मिळवतो. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर सनरायझर्स हैदराबाद या संघाची मालकीण काव्या मारन आहे.(IPL 2025)

सनरायझर्स हैदराबादचा संघ जिंकल्यावर आनंदाने अक्षरशः उद्या मारणारी, संघ हरल्यावर हळवी होऊन रडणारी, कायम टीमसोबत दिसणारी आणि सतत आपल्या टीमला चांगले खेळण्यासाठी प्रेरित करणाऱ्या काव्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. असे असले तरी काहींना त्याच्याबद्दल माहित असले तरी बरेच लोकं तिच्याबद्दल अनभिज्ञ आहेत. आज आपण याच काव्या मारन बद्दल जाणून घेणार आहोत.(Kavya Maran)

सनरायझर्स हैदराबाद टीमच्या प्रत्येक मॅचदरम्यान टीमची जर्सी घालून काव्या कायम स्टेडियममध्ये उपस्थित असते. आजवर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी तिला ‘मिस्ट्री गर्ल’ असं नाव देखील दिलं. मात्र काव्या कोणी मिस्त्री गर्ल नाही तर ती मोठ्या बिजनेस घरातून येते. काव्या ही सनरायझर्स हैदराबाद टीमची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मालक आहे. (Social News)

Kavya Maran

मारन कुटुंब हे उद्योग जगतातील मोठं नाव आहे. काव्याचे वडील आणि हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन हे भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहांपैकी एक असलेल्या सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. त्यांच्याकडे ३२ टीव्ही आणि ४२ एफएम रेडिओ स्टेशन आहेत. याच कलानिधी मारन यांची मुलगी असलेल्या काव्याचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ साली तामिळनाडूतील चेन्नईमध्ये झाला. काव्या मारन एक प्रभावी आणि प्रतिष्ठित कुटुंबातून येते.(Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Famous Bridge : भारतातील ‘हा’ खांबविरहित ब्रिज, रात्री १२ वाजता खास कारणामुळे होतो बंद

=======

काव्या मारनचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चेन्नईमध्ये झालं. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली. तिने ब्रिटनमधल्या लियोनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून MBA चे शिक्षण पूर्ण केले. काव्या २०१७ नंतर सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटला वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या सन नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टची प्रमुख आहे. सन म्युझिक आणि सन नेटवर्कच्या एफएम चॅनेलसाठीची जबाबदारी तिच्याकडेच आहे.(Top Stories)

शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्या भारतात परतली आणि ती सन टीव्ही नेटवर्कमध्ये सहभागी झाली. २०१९ मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये काव्या मारनचा समावेश करण्यात आला. काव्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या लिलावात ती सक्रियपणे सहभागी होत असते. या लिलावात तिचा सहभाग, तिचे क्रिकेटमधील ज्ञान आणि अभ्यास स्पष्ट दिसते.(Trending Marathi News)

Kavya Maran

काव्या मारनचं कुटुंब बिझनेस वर्ल्डमध्ये प्रसिद्ध आहे. यासोबतच मारन कुटुंब राजकारणातही सक्रिय आहे. काव्याचे आजोबा मुरासोली मारन हे माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री होते तर तिचे काका दयानिधी मारन हेसुद्धा केंद्रीय मंत्री होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काव्याला वार्षिक १.०९ कोटी रुपये पगार मिळतो. तिची नेट-वर्थ अंदाजे ४०९ कोटी रुपये आहे.(Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!

=======

सध्या काव्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत देखील तुफान चर्चा रंगताना दिसत आहेत. काव्याचं नाव भारतातील सर्वात महागड्या संगीतकारासोबत जोडलं जात आहे. काव्यासोबत नाव जोडलं गेलेला तो भारतातील सर्वात महागडा संगीतकार आहे, अनिरुद्ध रविचंदर. मिडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या आणि अनिरुद्ध एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, संगीतकार अनिरुद्ध रविचंदरच्या टीमनं अशा बातम्यांचं खंडन करत ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे.(Kavya Maran News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.