Home » Swami Samarth : श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन माहिती

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटदिन माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Swami Samarth
Share

“भिऊ नकोस मी पाठीशी आहे” या वचनामुळे स्वामींनी सर्वच भक्तांनी क्षणार्धात भीतीच संपवून टाकली. चांगल्या वाईट काळात स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे असतात. आम पासून खासपर्यंत सर्वच स्वामींचे नित्सिम भक्त आहेत. आजही स्वामी सर्वच भक्तांना त्यांच्या असण्याची अनुभूती देतच असतात. कोट्यवधी भाविकांना स्वामींचे अनेक अंगावर शहारे आणणारे अनुभव येत असतात. स्वामींच्या नावाशिवाय रोजच्या दिवसाची सुरुवात न होणाऱ्या त्यांच्या भक्तांसाठी स्वामींचा प्रगटदिन म्हणजे पर्वणीच.(Swami Samarth)

प्रत्येक स्वामी भक्त हा दिवस खूपच आनंदाने आणि स्वामी पूजनाने साजरा करतो. वर्षभर या दिवसाची प्रत्येक भक्त मोठ्या भक्तिभावाने वाट बघत असतो. स्वामीप्रती असणारी आपली श्रद्धा आणि स्वामीप्रेम व्यक्त करतात. समर्थांची महिती आणि त्यांच्या भक्त नसलेला व्यक्ती या जगात शोधूनही सापडणार नाही. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचा आज प्रगटदिन आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे श्री स्वामी समर्थांना आणि त्यांच्या दर्शनाला एक खास महत्व आहे.(Shri Swami Samarth Maharaj Pragatdin)

समर्थांच्या प्रगटदिनाच्या दिवशी अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसून येते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६९ वा प्रकटदिन सोहळा आहे. आज ३१ मार्च २०२५ म्हणजेच सोमवारी रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा होत आहे.

Swami Samarth

इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अर्थात ०६/०४/१८५६ रविवार. स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घ काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते.(Marathi Top News)

==============

हे देखील वाचा : Blue City : तुम्हाला माहित आहे का…? भारतातील कोणत्या शहराला ”ब्लू सिटी” म्हटले जाते?

===============

स्वामी समर्थांच्या प्रगटदिनाची कथा
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती देणारी कोणतीही अधिकृत नोंद नाही. मात्र समर्थांच्या प्रगटदिनाबद्दल एक कथा खूपच प्रचलित आहे, आणि सांगितली जाते. पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. पुढे अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात १८५६ मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. त्यानुसार या वर्षी ३१ मार्च सोमवारी रोजी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा होत आहे. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. असे सांगितले जाते की, अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे-तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. याठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूरमार्गे अक्कलकोटला आले. (Marathi Trending News)

गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. १४५९ मध्ये माघ वद्य १ शके १३८० रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ते या तपश्चर्येमध्ये इतके मग्न होते की, त्यांच्याभोवती मुंग्यांनी वारूळ तयार केले होते. एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती या वारुळावर पडली. (Marathi Latest News)

यानंतर वारुळातून रक्ताची एक धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. याच वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. ती व्यक्ती म्हणजे हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून नकळतपणे घडलेल्या या घटनेमुळे लाकूडतोड्या खूप घाबरला होता. मात्र, स्वामींनी त्या लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते तिथून निघून देशाटनासाठी गेले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले. (Social News)

Swami Samarth
समर्थानी त्यांची शेवटची वर्षे एका अक्कलकोट येथील एका वटवृक्षाखाली घालवली. त्यांनी भक्तांना कायमच योग्य मार्ग दाखवत त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या. जिथे त्यांनी वयाच्या 600 व्या वर्षी महासमाधी घेतली. असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला. एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला. (Marathi Latest Stories)

==============

हे देखील वाचा : Rock: हत्तींचे बळ देखील हलवू न शकलेल्या १३०० वर्ष जुन्या कृष्णाच्या दगडाबद्दल माहित आहे का?

===============

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक होई रे मना।
निर्भय होई रे मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी
नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥

जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेविन काळ ना नेई त्याला।
परलोकीही ना भिती तयाला॥२॥

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

उगाची भितोसी भय हे पळु दे।
वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे।
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

खरा होई जागा श्रद्धेसहीत।
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ।
नको डगमगु स्वामी देतील हात॥४॥

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥ ५॥

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.