Home » Gudhipadwa : गुढीपाडवा खास : मलईदार श्रीखंड रेसिपी

Gudhipadwa : गुढीपाडवा खास : मलईदार श्रीखंड रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Gudhipadwa
Share

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरात हिंदू नवीन वर्षाच्या स्वागताची अंतिम टप्प्यात आली आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस, साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त आदी अनेक कारणांमुळे गुढीपाडव्याचा सण मोठा आणि खास असतो. महिला वर्गाची तर नुसती लगबग असेल. घराच्या साफसफाईपासून ते स्वयंपाकापर्यंत सर्वच गोष्टी परफेक्ट होण्यासाठी महिला जय्यत तयारी करत आहे. अशातच नवसावा दिवस म्हटल्यावर गोड पदार्थ देखील खासच पाहिजे ना…?(Gudhipadwa)

तसे पाहिले तर गुढीपाडव्याच्या दिवशी गोड पदार्थ सगळ्याच घरांमध्ये फिक्स असतात. आमरस आणि पुरी, पुरणाची पोळी किंवा श्रीखंड आणि पुरी यापैकी एक किंवा दोन गोड पदार्थ घराघरांमध्ये केले जातात. मात्र तसे पाहिले तर गुढीपाडवा आणि श्रीखंड पुरी हे जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे बहुतांशी घरांमध्ये यादिवशी श्रीखंड पुरीचाच बेत असतो. विकतचे श्रीखंड महागही असते आणि त्याला तशी चव नसते. शिवाय भरपूर पैसे देऊनही श्रीखंडाचो क्वांटिटी डोळ्यात काही भरत नाही. आणि तसे पण नवीन वर्षाचा मोठा सण म्हणजे आपल्या हातूनच गोड काहीतरी व्हायला नको का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याच श्रीखंडाच्या अगदी सोप्या अशा काही रेसिपी सांगणार आहोत. जेणेकरून पहिल्यादाच श्रीखंड करत असला तरी एकदम परफेक्ट आणि मुलायम श्रीखंड तयार होईल. (Marathi Top News)

Gudhipadwa

साहित्य – चक्का, साखर, वेलची, जायफळ

कृती –

श्रीखंड तयार करण्यासाठी पूर्वतयारी अवश्य आहे. यासाठी पाडव्याच्या दोन दिवस आधी दही लावून घ्या. या लावलेल्या दह्याचा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी चक्का तयार करा. हा चक्का तयार करण्यासाठी काही विशेष प्रक्रिया नाही. यासाठी तयार केलेलं दही आठ ते दहा तास सुती कापडात घट्ट पिळून टांगून ठेवायचं. किंवा सुती कपड्यामध्ये दही घट्ट बांधावे आणि चाळणीवर खाली भांडे ठेऊन त्या दह्यावर वजन ठेऊन ८ ते १० ठेवायचे. असे केल्याने त्यातील संपूर्ण पाणी निघून जाईल आणि छान चक्का तयार होईल.(Marathi Trending News)

१० तासानंतर आपण पाहिले तर आपला चक्का छान तयार झालेला असतो. आता श्रीखंड बनवणं खूपच सोपं आहे. जितका चक्का तयार केला असेल त्याचप्रमाणात किंवा आवडीनुसार कमी जास्त चक्क्यामध्ये साखर टाकून घ्या आणि नीट मिक्स करून साखर विरघळेपर्यंत चक्का बाजूला ठेवा. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये किंवा पूर्ण यंत्रातून काढून घ्या. वाटलेले हे मिश्रण चाळणीत गाळून घ्या. त्यानंतर त्यात वरून जायफळ आणि वेलची पावडर टाका.(Latest Marathi News)

==============

हे देखील वाचा : Gudipadwa : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात ‘गुढीपाडवा’

===============

आता जर जर तुम्हाला आम्रखंड करायचं असेल तर चक्का झाल्यानंतर त्यात साखरेसोबत तुम्हाला आंब्याचा रस अथवा पल्प मिसळावा लागेल. ज्यामुळे त्याला आम्रखंडाचा स्वाद येईल. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे श्रीखंड बनवू शकता. याशिवाय तुम्ही या श्रीखंडामध्ये विविध प्रकारचे भरपूर ड्रायफ्रुटस टाकून ड्रायफ्रूट श्रीखंड तयार करू शकतात. आजकाल तर विविध फळांचे पल्प देखील टाकून श्रीखंड केले जाते. किंवा आवडीच्या फळांचे तुकडे टाकून फ्रुट श्रीखंड सुद्धा तयार केले जाते. एकदा का श्रीखंड तयार झाले की ते फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड सर्व्ह करा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.