जगातील सर्वात श्रीमंत माणसं स्वत:चे पैसे अमर होण्यासाठी खर्च करत आहेत. ब्र्यान जॉनसन हे नाव तुम्ही ऐकलं असेल हा माणूस स्वत:ला त्याच्या वयोमानानुसार जास्तीत जास्त तरुण ठेवण्याचा प्रयत्न करतो. जेफ बेजोस यांनी तर माणसाचं वयोमान उलटवणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक सुद्धा केली आहे. पण प्रश्न हा आहे की माणूस मरणं थांबवू शकतो का? म्हणजे तो अमर होऊ शकतो का ? तर याचं उत्तर सध्या तरी नाही आहे. पण काही असे सजीव आहेत जे ‘Sacred Games’ मधल्या गणेश गायतोंडे सारखं छाती ठोकपणे बोलू शकतात, आश्वाथामा है अपुन, कभी नही मरेगा!.. म्हणजे थोडक्यात, हा सजीव अमर आहे. पण कसं काय ? हेच जाणून घेऊ. (Turritopsis Dohrnii)
अमर असलेल्या त्या संजीवाचं नाव आहे Turritopsis Dohrnii, ही एक प्रकारची जेलीफिश आहे. पण हे कळालं कसं की ही जेलीफिश अमर आहे ? तर १९८० मध्ये क्रिश्चियन सोमर आणि जॉर्जियो बेस्टेरेलो या विद्यार्थ्यांनी एका नदीतून पॉलिप्स ऑब्जर्वेशनसाठी गोळा केले. आता पॉलिप्स म्हणजे काय, तर कोणत्याही जेलीफिशचं जीवन एका फर्टिलाइज्ड अंड्याच्या रूपात सुरू होतं. त्यानंतर ते लार्वाच्या रूपात विकसित होतं, आणि हा लार्वा जमिनीवर येऊन, त्याचं रोपटं तयार होतं. याला आपण जेलीफिशचं झाड म्हणू शकतो. आता हे झाड म्हणजे पॉलिप्स जस जसं मैच्योर होतं, तस तसं त्यामध्ये अनेक बर्ड्स वाढू लागतात आणि प्रत्येक बर्ड नंतर त्या पॉलिप्समधून वेगळा होऊन एफायरा लार्वात रूपांतरित होतो. आणि तो एफायरा लार्वा मैच्योर झाला की तो जेलिफिशमध्ये बदलतो. एका पॉलिप्सपासून डझनभर जेलिफिश तयार होतात. (Turritopsis Dohrnii)
आता, क्रिश्चियन आणि जॉर्जियो यांनी काही पॉलिप्स मोठ्या पाण्याच्या टाकीत ठेवल्या आणि त्याचं ऑब्जर्वेशन सुरू केलं. तोपर्यंत जोपर्यंत त्या पॉलिप्समधून बड्सचं एफायरा लार्वात रूपांतर नाही झालं. आता या दोघांना असं वाटलं होतं की जेलीफिशेस मैच्योर होऊन जेलीफिश निर्माण करण्यासाठी लार्वा तयार करतील. पण जेव्हा त्यांनी अनेक दिवसांनी पाण्याच्या टाकीत बघितलं, तेव्हा त्यांना त्या टाकीत काहीतरी विचित्र दिसलं. त्यांना दिसलं की जिथे पूर्वी एकही पॉलिप नव्हता, तिथे अनेक नवीन पॉलिप्स आले होते. ही आश्चर्याची गोष्ट नव्हती. आश्चर्याची गोष्ट ही होती की कोणत्याचं जेलिफिशचा मृतदेह त्यांना टाकीत सापडला नव्हता. म्हणजे या टाकीत काय होत होतं. तर जेव्हा पाण्यात टेंशन वाढायचं. म्हणजे या जेलिफिशेसंना जेव्हा धोका वाटायचा त्या पुन्हा पॉलिप्समध्ये रूपांतरित होत होत्या. ते सुद्धा फर्टिलायझेशन शिवाय आणि कोणत्याही प्री-पॉलिप लार्वा स्टेजच्या शिवाय. म्हणजेच, या जेलीफिश दरवेळी मृत्यूच्या काठावर जात असताना, स्वतःला पुन्हा जिवंत करत होत्या, ज्यामुळे त्यांचा शरीर कधीही मरणं पावत नव्हतं, आणि पॉलिप्सपासून वेगळं होत असताना त्यांची संख्या सुद्धा वाढत होती.(Turritopsis Dohrnii)
===============
हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !
===============
सोप्या भाषेत सांगायचं तर मरण पावत असणाऱ्या माणसाने पुन्हा गर्भात जाऊन जन्माला येण्यासारखीच ही प्रोसेस आहे. आणि यामुळेच कळालं की ही जेलीफिश अमर आहे. म्हणूनच हिला नाव पडलं इम्मॉर्टल जेलीफिश. पण ही जेलीफिश मरतच नाही असं नाही जर कोणी मुद्दाम तिला मारण्याचा प्रयत्न केला. तर ती मरण पावते. पण जेव्हा जेव्हा जेलीफिशेसवर काही ताण येतो, तेव्हा त्या स्वतःला प्रभावीपणे डी-एज करण्याची क्षमता ठेवतात. हा ताण म्हणजे नैसर्गिक ताण, आजार, प्रदूषण, अन्नाची कमतरता, पर्यावरणातील बदल, या गोष्टी.(Turritopsis Dohrnii)
विचार करा की पाण्याखालच्या या जिवाने स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी, स्वत:चं नैसर्गिक तंत्रज्ञान तयार केलं आहे. पाण्याखालील जगात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. तो त्याप्रकारे Evolve झाला असेल. पण माणसाने स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी तयार केली हत्यारं, Bombs. आता माणसं सुद्धा अमर होण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञांनाचा शोध घेत आहेत. पण या अमर होण्याच्या लाईनीत जगातील सर्वात श्रीमंतच लोक उभे आहेत. तुम्हाला काय वाटत? या जिवाचं ऑब्जर्वेशन करून आपण सुद्धा अमर होण्याचं तंत्र विकसित करू शकतो का? आणि जरी केलं तर ते फायद्याचं ठरेल की तोट्याचं? कारण महाभारतात कृष्णाने सुद्धा आश्वाथामाला अमर होण्याचा वरदान नाही श्राप दिला होता.