हिंदू धर्मात नवरात्र उत्सवाला खूप महत्त्व आहे. या नऊ दिवसांत, देवीची वेगवेगळ्या रुपात पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र नवरात्र, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीपासून सुरू होते. यावर्षी चैत्र नवरात्र 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत साजरी होईल. यावर्षी नवरात्रीचा एक दिवस कमी असणार आहे. नवरात्रीमध्ये 8 दिवसात दुर्गामातेच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येईल. यात 5 एप्रिल रोजी महाअष्टमी साजरी होईल. नवरात्रीमध्ये अष्टमीला मोठे महत्त्व असते. यावेळी हवन, कलश पूजन आणि कन्या पूजन करण्यात येते. यावर्षीची नवरात्र ही रविवारी सुरु होऊन रविवारी संपणार आहे. त्यामुळे यावेळी माता दुर्गेचे आगमन हे हत्तीवरुन होणार आहे. हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. माता दुर्गा हत्तीवरुन येणार हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानण्यात येते. (Navratri)
यावर्षी चैत्र नवरात्र 30 मार्चपासून सुरु होत आहे. चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीपासून सुरू होते. या काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यावेळी चैत्र नवरात्र सर्वार्थ सिद्धि योगात सुरू होणार आहे. चैत्र नवरात्रीचा उत्सव साजरा करतांना पहिल्या दिवशी कलश स्थापना होते. या कलशाची पुढचे नऊ दिवस पुजा केली जाते. मात्र यावर्षी चैत्र नवरात्र 8 दिवसांची आहे. पहिल्या दिवसाचा कलश स्थापन करण्याचा कालावधी सकाळी 6.13 ते 10.22 असा असेल, तसेच दुपारी 12.1 ते 12.50 या कालावधीमध्येही कलश स्थापन करता येणार आहे. 30 मार्च रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवेशी माता शैलपुत्रीची पुजा कऱण्यात येईल. आई शैलपुत्रीचा जन्म पर्वतीय राजा हिमालयाची कन्या म्हणून झाला. म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. माता शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ धरले आहे. कठोर तपस्या करणारी माता शैलपुत्री ही वन्य प्राण्यांची रक्षक म्हणूनही पुजली जाते. 31 मार्च रोजी चैत्र नवरात्रीची द्वितीया आणि तृतिया तिथी आहे. (Marathi News)
यावेळी माता ब्रह्मचारिणी आणि माता चंद्रघंटा यांची पूजा करण्यात येईल. 1 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची चतुर्थी तिथी असून यावेळी माता कुष्मांडाची पूजा कऱण्यात येईल. 2 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची पंचमी तिथी आहे. यावेळी माता स्कंदमातेची पूजा करण्यात येईल. 3 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची षष्ठी तिथी आहे. तर 4 एप्रिल रोजी सप्तमी तिथी आहे. 5 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. यावेळी माता महागौरीची पूजा करण्यात येईल. नवरात्राचे नऊ दिवस हे शक्ती, भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जातात. यावर्षी नवरात्रीची समाप्ती एक दिवस आधी होत आहे. 6 एप्रिल रोजी नवमी तिथी असून माता सिद्धिदात्रीची पूजा होईल. असे असले तरी चैत्र नवरात्रीच्या उपवासाचा शेवट सोमवार 7 एप्रिल रोजी होईल, असे जाणकारांनी सांगितले आहे. दरवर्षी नवरात्र साजरी करतांना देवी मातेचे आगमन कुठल्या वाहनावरुन झाले आहे, याची भाविकांना ओढ असते. माता ज्या वाहनावर बसून आली असेल, त्यावरुन पुढचे वर्ष कसे जाणार याचा अनुमान लावला जातो. या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, यावेळी चैत्र नवरात्रीला, देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आगमन करणार आहे. (Navratri)
==============
हे देखील वाचा : Holi : जाणून घ्या धूलिवंदन आणि रंगपंचमीमधला फरक
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
देवी भागवत पुराणानुसार, हत्तीवर बसून देवी दुर्गेचे आगमन हे खूप शुभ लक्षण मानले जाते. यासोबतच, या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवातही अनेक शुभ योगांनी होईल. ज्या दिवशी नवरात्र सुरू होईल त्या दिवशी रवि योग, सर्वार्थ सिद्धि योग, इंद्र योग आणि रेवती नक्षत्र असेल. त्यामुळे यावर्षीची चैत्र नवरात्र ही भाविकांना सुख, समृद्धीचा आशीर्वाद घेऊन येत असल्याचे सांगितले आहे. ज्या वर्षी देवी माता हत्तीवर बसून येते आणि हत्तीवरुन निघून जाते, त्या वर्षी देशात चांगला पाऊस पडतो आणि चांगले पीक येते, असे मानले जाते. देवी माता हत्तीवर बसून प्रस्थान करतांना आपल्या भक्तांना आर्थिक प्रगती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते, असे सांगितले जाते. नवरात्रीची सुरुवात कोणत्या वारापासून होते, यावर देवी मातेचे वाहन अवलंबून असते. देवी भागवत पुराणानुसार, जेव्हा नवरात्र रविवार किंवा सोमवारी सुरू होते आणि संपते, तेव्हा देवी माता हत्तीवर बसून येते, आणि हत्तीवरुन प्रस्थान करते. यावर्षी तसाच योग असून याला शुभ योग मानण्यात आले आहे. (Marathi News)
सई बने