नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले. आहेत. हे दोघं भारतीय वेळेनुसार आज १९ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. हे दोघंही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत. या दिवसाच्या संपूर्ण जगाला मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. (Sunita Williams News)
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे मागच्या वर्षी ५ जून २०२४ रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात गेल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ ८ दिवसांचा होता. मात्र याच प्रवासादरम्यान अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाला, आणि यामुळे नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले. त्यामुळे अंतराळवीरांना अवकाशात जावे लागले. (Sunita Williams Return)
मात्र आज सुनीता विल्यम्स पुन्हा पृथ्वीवर सुखरूप परतल्यामुळे सर्वच आनंदात आहे. मात्र मोठा काळ अवकाशात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहून आल्यामुळे सुनीता यांना पृथ्वीवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या अंतराळवीरांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे अनेक आरोग्य आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यात त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांचा सामना करावा लागेल. (Top Marathi News)
=======
हे देखील वाचा : Gujarat : या अनोख्या गिफ्ट सिटीची माहिती आहे का !
=======
– कमकुवत स्नायू
अवकाशात सर्व काही हवेत तरंगत असल्यामुळे शरीराला काम करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे अंतराळात गुरुत्वाकर्षणाअभावी शरीराचे स्नायू कमकुवत होतात. मात्र पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या शरीराला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घ्यावे लागते. याला बराच काळ लागू शकतो. म्हणूनच अंतराळवीरांना सुरुवातीला काही दिवस चालायला आणि समतोल राखायला अवघड जाते.(Marathi Trending News)
– हाडांवर होणारा परिणाम
अवकाशामध्ये ९ महिने राहिल्याने अवकाशवीरांच्या हाडांची घनता दर महिन्याला जवळपास १ टक्क्यांनी कमी होते. यात खासकरून पाय, पाठ आणि मानेच्या हाडांवर याचा अधिक परिणाम दिसून येतो. यामुळे सुनीता यांना आता परत आल्यानंतर शारीरिक हालचालींमध्ये त्रास होण्याची शक्यता आहे.(Latest News)
– समतोल आणि समन्वयात अडचण
आपल्या कानात आणि मेंदूमध्ये वेस्टिब्युलर सिस्टिम नावाची एक खास प्रकारची प्रणाली आपल्या शरीराला स्थिर ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावत असते. अंतराळात खूप कमी वेळ राहिल्यामुळे या प्रणालीवर परिणाम होऊन आपल्या शरीराचे संतुलन राखणे कठीण होऊ शकते. त्यामुळे हे बघता सुनीताला उभं राहण्यास, चालण्यात आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समन्वय साधण्यात संघर्ष करावा लागू शकतो. (Social News)
– डोळ्यांवर होणारा परिणाम
अवकाशात असणाऱ्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील द्रव पदार्थ डोक्याच्या दिशेने वर सरकत असतो. याचा परिणाम डोळ्यांमागे असणाऱ्या मज्जातंतूंवर होतो आणि त्यावर दाब येतो. याला स्पेसफ्लाईट असोसिएटेड न्यूरो-ओक्युलर सिंड्रोम (SANS) म्हणतात. यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊन चष्मा घालण्याची गरज भासू शकते. (Marathi Latest News)
– मायक्रोग्रॅव्हिटीची सवय
अंतराळात बरेच दिवस राहिल्यामुळे अंतराळवीरांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची सवय होते. अंतराळात सर्वच गोष्टी तरंगत असतात, पण पृथ्वीवर परतल्यानंतरही तिचा मेंदू तसाच काम करतो. सुरुवातीला ते नकळत गोष्टी हवेत सोडतात, आता ते पडतील हे विसरून जातात.(Sunita Williams News)
– रोगप्रतिकारक शक्ती आणि रेडिएशन प्रभाव
अंतराळात असलेल्या उच्च स्तरीय रेडिएशनच्या संपर्कात आल्यास अंतराळवीरांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. रोगप्रतिकारक कमी झाल्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा आणि इतर आजार होण्याचा धोका वाढू शकतो. सोबतच अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे डीएनएमध्ये बदल, हृदयाच्या समस्या आणि मानसिक तणाव यांचा देखील सामना करावा लागू शकतो.
======
हे देखील वाचा : Iran : कुठे झाला लाल रंगाचा पाऊस !
=======
– अॅनिमिया
अंतराळात असताना अंतराळवीरांचे रक्त हळूहळू अशक्त होते. याला स्पेस अॅनिमिया म्हटले जाते. पृथ्वीवर दर सेकंदाला शरीरात २ दशलक्ष लाल रक्त पेशी नष्ट करते. पण अंतराळात या प्रणालीमध्ये अडथळा येतो. एका अभ्यासानुसार, सहा महिन्यांच्या अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांचे शरीर दर सेकंदाला ३ दशलक्ष लाल रक्तपेशी नष्ट करतात, जे सामान्यपेक्षा ५४ टक्के जास्त आहे. त्यामुळेच पृथ्वीवर पुन्हा आल्यानंतर अंतराळवीरांना अशक्तपणा, थकवा, आळस जाणवू शकतो.
– किडनीच्या समस्या
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम मूत्रसंस्थेवरही होतो. लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. हार्मोनल बदल आणि आतड्यांतील मायक्रोबायोटामध्ये होणारे बदल, पोषक तत्वांचे कमी प्रमाण झाले तर आरोग्य बिघडू शकते
– ह्रदयविकाराचा त्रास
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात दीर्घकाळ काळ वास्तव केल्याने त्यांना ह्रदयाचा धोका निर्माण होऊ शकतो. ह्रदयाचा आकार अंडाकृती असतो, मात्र अंतराळात जास्त दिवस राहिल्याने त्यांच्या ह्रदयाचा आकार पाण्याने भरलेल्या फुग्यासारखा होतो. यामुळे ह्रदयरोग होऊ शकतो.