Home » Summer : उन्हाळ्यातही होतोय कोरड्या ओठांचा त्रास…? जाणून घ्या यामागील कारणं आणि उपाय

Summer : उन्हाळ्यातही होतोय कोरड्या ओठांचा त्रास…? जाणून घ्या यामागील कारणं आणि उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Summer
Share

उन्हाळ्यात जशा त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. मात्र उन्हाळ्यात अतिशय सामान्य असलेली अजून एक समस्या म्हणजे ओठ फुटणे. अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील हे ऐकून, मात्र हो उन्हाळ्यात देखील ओठ फुटण्याची समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरते. हिवाळ्यात तर ही समस्या खूपच सामान्य असली तरी उन्हाळ्यात देखील या त्रासला अनेकांना सामोरे जावे लागते. (Summer)

ओठ कोरडे होऊन त्याची स्किन निघण्याची, ते कोरडे होण्याची आणि क्रॅक होण्याची समस्या निर्माण झाली की आपला चेहरा देखील खराब दिसू लागतो. कारण असे ओठ सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. ही ओठांची समस्या फक्त आपल्या लुकसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. त्यामुळे ओठांवर ओलावा टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे. (Lip Care In Summer)

मात्र तुम्हाला माहित का की उन्हाळ्यात ओठ का फुटतात? चला जाणून घेऊया याबद्दल.
उन्हाळ्यात ओठ फुटण्याचे मुख्य कारण म्हणजे, वातावरणातील कोरडेपणा आणि शरीरातील पाण्याची कमतरता. उन्हाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण खूप कमी होते. शरीरातील ओलावा कमी झाल्यामुळे, ओठ कोरडे होण्यास सुरुवात होते. ओठांची त्वचा शरीरातील सर्वात पातळ त्वचा असते. (Summer Care Tips)

Summer

शरीरातील ओठ हीच एकमेव अशी गोष्ट आहे ज्याला छिद्रे नसतात आणि त्यामुळे त्यातून घाम बाहेर येत नाही. म्हणून, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होताच, पहिले ओठ कोरडे पडतात. म्हणूनच ना केवळ हिवाळ्यात तर उन्हाळयात देखील ओठांची काळजी घेणे खूपच आवश्यक असते. उन्हाळ्यात ओठ फुटण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे सूर्याची तीव्र किरणं. मग उन्हाळ्यात ओठांची काळजी घ्यायची कशी? चला जाणून घेऊया याबद्दल. (Marathi Top Stories)

============

हे देखील वाचा : Heatstroke : उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

============
खोबरेल तेल
खोबरेल तेल आपले ओठ मऊ करण्यासाठी सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. आपले ओठ स्वच्छ कोमट पाण्याने धुऊन घ्यायचे ओठ कोरडे करून त्यावर हलक्या हातांनी खोबरेल तेलाने मसाज करावा. हा उपाय रात्री केल्यास अधिक चांगला रिझल्ट मिळेल. रात्रभर ओठांवर खोबरेल तेल लावल्यानंतर सकाळी कोमट पाण्याने ते धुवा. या उपायाने अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येईल. (Trending Lifestyle News)

कोरफड
कोरफड आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर कोरफडीचे जेल लावावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ओठ स्वच्छ धुऊन टाकावे. (Marathi News)

Summer

मध
फाटलेल्या ओठांवर मध लावल्याने देखील आराम मिळतो.अभ्यासानुसार मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. मध लावल्याने ओठ मऊ राहतील. मधाचा वापर करून तुम्ही घरच्याघरी एखादी क्रीम किंवा लिपबाम देखील तयार करू शकता.(Beauty Care)

तूप
खोबरेल तेलाप्रमाणे तूप देखील कोरड्या ओठांसाठी लाभदायक आहे. तुम्ही ओठांवर रात्री झोपताना किंवा दिवस देखील तूप लावल्यास ओठ मऊ होतील आणि ते कोरडे होणार नाही.

============

हे देखील वाचा : Sweat Smell : चारचौघात घामाच्या दुर्गंधीमुळे ओशाळलेपणा जाणवतो….? मग करा ‘हे’ सोपे उपाय

============

दुधाची साय
दुधाची साय देखील निस्तेज आणि कोरड्या ओठांना ठीक करण्यासाठी रामबाण उपाय आहे. ओठांवर ही साय लावल्याने नक्कीच फायदा होतो.

* हे उपाय कराच सोबतच दिवसभरात भरपूर पाणी प्या. ओठांना वेळोवेळी मॉइश्चरायझिंग लिप बाम किंवा लिप बटर लावा. उन्हाळ्यात बाहेर जाताना ओठांवर देखील सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्यासाठी SPF असलेल्या लिप बामचा वापर करा. ओठांना सुंदर बनवण्यासाठी हळद आणि दुधाची घट्ट पेस्ट बनवून ती ओठांवर लावा आणि थोड्यावेळाने ओठ धुवून टाका.

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या )


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.