म्यानमार या देशामधील सायबर टोळ्यांचे जाळे नुकतेच उघडकीस आले आहे. भारत आणि बांगलादेशच्या पूर्वेस, तिबेटच्या दक्षिणेस, चीनच्या नैऋत्येस असलेल्या या देशामध्ये चीनच्या पुढाकारानं सायबर टोळ्यांनी आपले जाळे विणले आहे. या सायबर टोळ्यांचा जगभरातील सायबर गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. म्यानमारमध्ये असलेल्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत चीननं येथे उद्योगाच्या नावानं अनेक सायबर केंद्र उघडली आहेत. या सायबर केंद्रात म्यानमारमधील तरुणही मोठ्या संख्येनं कामाला आहेत. सोबत भारत आणि पाकिस्तानमधील तरुणांनाही येथे काम देण्यात येत आहे. (Myanmar)
सायबर केंद्राच्या नावाखाली ही केंद्र जगभरात सायबर चोरी करत करोडोंची फसवणूक करत आहेत. या सायबर केंद्रांमधून सुरुवातीला नोकरीच्या जाहिराती देण्यात येतात. परदेशात नोकरीच्या अमिषानं भारत, चीन, श्रीलंका येथील तरुण या जाहिरातींना बळी पडत आहेत. हे तरुण म्यानमारमध्ये आल्यावर त्यांना ही केंद्र म्हणजे, फसवणुकीची केंद्र असल्याची जाणीव होते. मात्र चीनी गुंडाच्या मार्फत चालवल्या जाणा-या या सायबर केंद्रात दाखल झालेल्या तरुणांना सहजासहजी तेथून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हे तरुण आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत. म्यानमारमधील अशाच सायबर केंद्रावर नुकत्याच पडलेल्या धाडीतून हे भीषण वास्तव उघडकीस आले. या केंद्रांमध्ये अनेक तरुणांकडून जबरदस्तीनं काम करुन घेण्यात येत होते. सुटका केलेल्यांमध्ये म्यानमारमधील तरुणही होते, शिवाय भारत आणि पाकिस्तानमधील तरुणही या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर गुन्हेगारी हा सर्वात मोठा धोका सध्या आहे. (International News)
या सायबर गुन्ह्यांमध्ये म्यानमार या छोट्या देशाचा पुढाकार आहे, ही माहिती दिली तर आश्चर्य वाटेल. मात्र नुकतीच म्यानमारमधील सायबर गुन्ह्येगारीची काळी बाजू उघड झाली आहे. जगातील सर्वात मोठे सायबर केंद्र या म्यानमारमध्ये असल्याचे उघड झाले आहे. ही सायबर केंद्र चीनमधील काही गुन्हेगार चालवत असल्याचीही माहिती आहे. या सायबर केंद्रांमध्ये भारतातील 200 आणि पाकिस्तानमधील 500 तरुण काम करत होते. नोकरीच्या नावाखाली या तरुणांची या सायबर केंद्रात नेमणूक करण्यात आली. मात्र कामाचे स्वरुप स्पष्ट झाल्यावर या तरुणांनी काम करण्यास नकार दिल्यावर त्यांना प्रसंगी मारहाणही करत काम करण्यास भाग पाडण्यात आले. म्यानमारमध्ये अशाच प्रकारची अनेक सायबर केंद्र असून त्यामध्ये अनेक तरुणांना फसवून कामाची लालूच दाखवत भरती करण्यात आले आहे. ही सर्व सायबर केंद्र चीनी गुंड चालवत आहेत. येथून जगभरात फोन लावले जातात. त्यातून सायबर गुन्हे केले जातात. लोकांचे करोडो रुपये या सायबर गुह्यातून मिळवले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Myanmar)
परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या तरुणांना या सायबर केंद्रात काम देण्यात येते. बेरोजगार तरुण या टोळ्यांचे लक्ष असतात. या सायबर केंद्रात कामाला लागल्यावर हे तरुण गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतात, आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. भारतातून म्यानमारमध्ये गेलेल्या काही तरुणांनी यासाठी कर्ज काढल्याचेही स्पष्ट झाले आहे. याच सायबर केंद्रांवर आता चीननं कारवाई सुरु केली आहे. अलीकडेच, चिनी अभिनेता वांग झी याच्यासोबत असाच मोठा फसवणुकीचा गुन्हा झाल्यावर चीननं ही कारवाई सुरु केली आहे. म्यानमारमध्ये अशा स्वरुपाचे अनेक सायबर केंद्र असून त्यात 1 लाख 20 हजार तरुण काम करत आहेत. या तरुणांमध्ये चीनमधील तरुणांचाही समावेश आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !
===============
अशा सायबर केंद्रातील तरुणांची सुटका करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानंही यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतातील 200 तरुण या चक्रात सापडले असून त्यांना परत आणण्यासाठी आता भारत सरकार प्रयत्न करणार आहे. शिवाय पाकिस्तानमधील 500 तरुणांनाही पाकिस्तान आपल्या देशात परत घेऊन जाणार आहे. चीन, थायलंड आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या सायबर केंद्रातून आत्तापर्यंत 20 देशांतील देशातील नागरिकांची फसवणूक झाली आहे. या सायबर गुन्ह्यांच्या केंद्रातून आता 200 भारतीय तरुणांची सुटका झाली असून थायलंडमार्गे त्यांना देशात परत आणण्यात आले आहे. हे तरुण सोशल मिडियामध्ये आलेल्या जाहिरातीमधून या सायबर केंद्रावर काम करण्यासाठी गेले होते. यातील अनेकांनी कर्जही काढून म्यानमार गाठले. मात्र तिथे गेल्यावर या सगळ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले, आणि त्यांच्याकडून जबरदस्तीनं सायबर गुन्हे करुन घेण्यात आले. त्यामुळे अशाप्रकारच्या कुठल्याही जाहिरातींना फसू नये, असे आवाहन भारत सरकारतर्फे तरुणांना कऱण्यात आले आहे. (Myanmar)
सई बने