भारत ही ऋषीमुनी साधू संतांची भूमी… पण सातव्या-आठव्या शतकादरम्यान इस्लामिक आक्रमण वाढलं आणि भारताच्या संस्कृतीत इतर संस्कृतीही मिसळू लागल्या. भाषा बदलली, पोशाख बदलले, राहणीमान बदललं, कला बदलली. त्यातच साधू-संतांच्या भूमीमध्ये पीरबाबा आले. मग या सुफींचे मोठमोठे दर्गे बनायला सुरुवात झाली. अशाच एका सुफी बाबांची दर्गा महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये आहे, जिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा माथा टेकतात. ते म्हणजे हजरत ताजुद्दीन बाबा ! पण हे बाबा नक्की आहेत कोण, त्यांचा इतिहास काय आणि मोठमोठे राजकीय नेते इथे का येतात ? जाणून घेऊ. (Tajuddin Baba)
भारतातला पहिला दर्गा म्हणजे राजस्थानचा प्रसिद्ध अजमेर शरीफ… याच्या व्यतिरिक्त इथे मुंबईचा हाजीअली दर्गा, दिल्लीचा हजरत निजामुद्दीन दर्गा, काश्मीरचा हजरतबाल दर्गा, आग्राचा अलीम चिश्ती दर्गा अशा अनेक दर्गा आहेत, जिथे मुस्लीम आणि हिंदू भाविक जात असतात. अशीच एक दर्गा म्हणजे हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा… नागपूरचे सुफी बाबा ताजुद्दीन यांना हा दर्गा समर्पित आहे. या ताजुद्दीन बाबांचा जन्म २७ जानेवारी १८६१ ला नागपूरच्या कामठीला झाला होता. बालपणीच अनाथ झाल्यामुळे त्यांचे काका अब्दुल रहमान यांनी त्यांचा सांभाळ केला. बालपणापासूनच ते चलबिचल असायचे. खेळांमध्ये त्यांचं मन रमत नव्हतं आणि ते सतत हजरत अब्दुल्ला शाह यांच्यासोबत राहायचे. त्यामुळे ताजुद्दीनकडे काहीतरी अध्यात्मिक शक्ती आहे, असं अब्दुल्ला शाह यांना वाटायचं.(Political News)
१८८१ मध्ये २० वर्षांचे असताना ते नागपूर आर्मी रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून रुजू झाले. त्यांची पोस्टींग मध्य प्रदेश च्या सागर इथे झाली होती. पण यावेळीही ते सागरचे प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्ती हजरत बौद यांच्यासोबत रहायला लागले. याचा परिणाम नोकरीवर होऊ लागला आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला. बौद यांना आपला अध्यात्मिक गुरु त्यांनी मानलं. यानंतर त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. घरदार सोडून ते कुठेही फिरू लागले. त्यांच्या नातेवाईकांना वाटत होतं की यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
परिणामी त्यांच्या कुटुंबीयांनी हात वर केले आणि ताजुद्दीन बाबा (Tajuddin Baba) तेव्हापासून अवलिया बनूनच राहिले. ताजुद्दीन बाबा हे अवलिया अवस्थेत असताना त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना मानसिक रुग्ण समजुन मानकापूरच्या मानसिक रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तिथे त्यांनीच कित्येक रुग्णांना बरं केलं, असं म्हटलं जातं. त्यांच्याकडून सकारात्मक शक्तीचा अनुभव मिळतो, अशी लोकांची मान्यता झाली, यानंतर अनेक जण त्यांची भेट घेऊ लागले, त्यांना आपलं सुख-दुख सांगू लागले. बाबाही त्यांना आशीर्वाद देऊ लागले. अशा प्रकारे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले. अगदीच प्रसिद्ध मेहेर बाबासुद्धा त्यांचे शिष्य झाले. मेहेर बाबा यांनी आपल्या आयुष्याला वेगळ वळण देणाऱ्या पाच बाबांना गुरु मानलं. ते म्हणजे हजरत बाबाजान, उपासनी महाराज, शिर्डीचे साईबाबा, नारायण महाराज आणि ताजुद्दीन बाबा ! (Political News)
==============
हे देखील वाचा : Indrajeet Sawant : मार्टिनची डायरी आणि कोरटकर-सावंत वाद का घडला ?
=============
१९२५ साली ६५ वर्षांचे असताना ते आजारी पडू लागले. नागपूरचे महाराज राघोजीराव भोसलेसुद्धा त्यांचे भक्त होते आणि दैनंदिन त्यांची भेट घ्यायचे. ताजुद्दीन बाबा आजारी आहेत, असं कळताच त्यांनी मोठमोठे डॉक्टर्स त्यांच्या उपचारांसाठी बोलावले होते. पण त्याचा नाईलाज झाला आणि अखेर ऑगस्ट १९२५ ला त्यांचं निधन झालं. यानंतर त्यांच्या स्मरणार्थ नागपूरच्या वाकी येथे त्यांची समाधी बांधण्यात आली आणि दर्गा तयार करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत इथे भव्य उर्स भरतो. लाखोंच्या संख्येने भाविक या दर्ग्यावर येतात. (Political News)
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवर्षी नित्यनियमाने या दर्ग्याला भेट देतात. चादर चढवतात. दर्ग्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या जातात. पहायला गेलं भारतीय जनता पार्टी आणि दर्गा trust यांचे चांगले संबंध आहेत. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे चेअरमन प्यारे खान यांनीही लोकसभा इलेक्शनमध्ये नितीन गडकरी यांचा प्रचार केला होता. याशिवाय ताजुद्दीन बाबांच्या कुटुंबातील सय्यद तलफ ताजी यानेही भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राजकारण्यांपासून सगळेच ताजुद्दीन बाबा (Tajuddin Baba) यांचे भक्तमंडळी आहेत. गेल्या १०० वर्षांपासून या ताजुद्दीन बाबा दर्ग्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचं कार्य अविरतपणे सुरु ठेवलं आहे.