बघता बघता २०२५ वर्षातील दोन महिने कसे? कुठे? निघून गेले कळलंच नाही. मार्च महिना आला आणि प्रचंड उकडायला देखील व्लागलं. मग काय आपलं शहर सोडून जरा निवांत कुटुंबासोबत वेळ घालवायचा ठिकाणं तुम्ही नक्कीच शोधत असाल ना? मग या लेखातून तुम्हाला मार्च महिन्यात बांधतात कुठे फिरायला जाऊ शकता याची यादी नक्कीच मिळेल. शिवाय मार्च महिना म्हटलं की होळी हा सण आलाच. यंदा होळी भारतातच्या एका सुंदर पर्यटनस्थळी साजरी करावीशी वाटत असेल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊयात मार्च २०२५ मधील भारतातील टॉप ५ ठिकाणं जिथे तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. शिवाय ठिकाणांनुसार काय आऊटफिट घालायचे हे देखील जाणून घेऊयात…(Travel Diary 2025)
Jaipur
“म्हारे हिवडा मैं नाचे मोर तक थैय्या थैय्या”, या ओळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं गुलाबी शहर अर्थात जयपूर. मार्च महिना जयपूर सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी अगदी योग्य महिना आहे. जयपूरमधील पॅलेस, किल्ले पाहणं पुन्हा एकदा राजा-रजवाड्यांच्या काळात जाण्याचाच एक सुखद अनुभव आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जयपूरमध्ये होळीच्या निमित्ताने विविध ठिकणी पारंपरिकरित्या केलं जाणारं होलिका दहन, कल्चरल परफॉर्मन्स ज्यात घुमर, कालबेलिया, आणि भावी डान्स असे विविध नृत्य प्रकार सादर केले जातात. याशिवाय होळीच्या निमित्ताने तुम्ही जयपूरमधील गोविंद देव जी या मंदिरालाही भेट देऊ शकता. याव्यतिरिक्त, अंबर किल्ल्यावर साजरा केला जाणारा पारंपारिक रंगांचा सणही तुम्ही एन्जॉय करु शकता. होळीचा आनंद लुटत गैटोर, पत्रिका गेट, जयपूर वॉल, मंकी मंदिर ही ठिकाणं देखील व्हिजिट करु शकता. (Travel destinations)
आता जयपूर म्हटलं की जरा ट्रेडिशनल आऊटफिट घालणं तर मस्ट आहे. त्यामूळे जयपूरला फिरायला जात असाल तर फ्लॉई स्कर्ट्स, शॉर्ट कुर्ती आणि त्याखाली जीन्स किंवा पलाजो, इंडो वेस्टर्न कॉर्ड सेट्स, कॉटनच्या साड्या असे कपडे नक्कीच तुम्ही परिधान करुन ट्रेडिशन जयपूर पिंक सिटीत आपलं वेकेशन इन्जॉय करु शकता. त्यामुळे जयपूरमध्ये जर का जाण्याचा प्लॅन करत असाल तर १३ मार्च ते १६ मार्च लॉंग विकेन्डला ही ट्रीप नक्कीच होऊ शकते. (Travel outfits 2025)
Rishikesh
यानंतरचं शहर म्हणजे ऋषिकेश, उत्तराखंड. तुम्हाला जर का अॅडव्हॅन्चर आणि देवदर्शन या दोन्ही भावना एकत्र अनुभवायच्या असतील तर उत्तराखंड हा एक बेस्ट ऑप्शन आहे. ऋषिकेशला गेलात तर त्रिवेणी घाटावरची गंगा आरती चुकूनही मिस करु नका. याशिवाय, लक्ष्मण झुला, राजाजी नॅशनल पार्क, वशिष्ठ गुहा मंदिर, परमार्थ निकेतन आश्रम या ठिकाणांनाही आवर्जून भेट द्या. तसेच, ऋषिकेशला गेल्यावर रिव्हर राफ्टिंग हे तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवाच. (Travel Destinations 2025)
आता आऊटफिट्सकडे वळूयात. कॉटनचे टी-शर्ट्स, फ्लॉई टॅंक टॉप्स, कॉटनचे कुर्ते यांना तुम्ही लॉंग स्कर्ट, पलाजो पॅन्ट, कॉटन पॅन्ट्स यांच्यासोबत पेअर करुन घालू शकता. त्यासोबतच लाईट वेटचे जॅकेटट्स किंवा शॉल घेऊन तुम्ही तुमचा आऊटफिट पुर्ण करु शकता.
Spiti Valley
यानंतरचं ठिकाण आहे स्पिटी वॅली. इन्स्टाग्रामवर तुम्ही स्पिटी वेलींचे व्हिडिओ किंवा फोटो पाहिले असतील. बर्फाने आच्छादलेले पर्वत, फ्रोझ झालेल्या नद्या आणि ढगाळ वातावरण असा निसर्गाचा एक वेगळाच थंडगार अनुभव घेण्यासाठी स्पिटी वॅलीला एकदा तरी जायलाच हवं. मार्चमध्ये स्पिटी वॅलीत -२ ते १० डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. शिवाय मार्च महिन्यात १२ तास सनलाईट असते. स्पिटी वॅलीला गेल्यावर चंद्रताल लेक, धनकार मॉनेस्ट्री, बरालाच्छा पास, काझा मॉनेस्ट्री, की मॉनेस्ट्री ही ठिकाण नक्की पाहा. याशिवाय किबेर, काझा या गावांनाही आवर्जून भेट द्या. स्पिटी वॅलीला निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत पिन वॅली नॅशनल पार्क लिस्टमधून वगळू नका. (Travel Destinations 2025)
स्पिटी वॅली या ठिकाणची खासियत म्हणजे तिथे बऱ्याच मुली सोलो ट्रॅव्हलही करतात. मार्च महिन्यात स्पिटीमध्ये थंड वातावरण असल्याकारणाने थंडीपासून बचाव करणारे पण आपली फॅशनही आपल्याला जपता येईल असे कम्फर्टेबल आऊटफिट घालावे. ज्यात जीन्स, लॉंग स्लिव्जचे टीशर्ट, किंवा साडी आणि त्यावर जॅकेट असे आऊटफिट्सही तुम्ही ट्राय करु शकता.(Travel Destinations 2025)
Khajuraho
मध्यप्रदेशातील खजुराहो हे ठिकाण हिंदू आणि जैन मंदिरांसाी विशेष प्रसिद्ध आहे. महत्वाचं म्हणजे या ठिकाणाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. खजुराहो येथे ९ ते १२व्या शतकात बांधण्यात आलेली मंदिरं आहेत. खजुराहोमध्ये गेल्यावर लक्ष्मणा मंदिर, नंदी मंदिर, भगवान पार्श्वनाथ दिगंबर मंदिर, वराह मंदिर, चित्रगुप्त मंदिर, वामना मंदिर या ठिकाणांना नक्की भेट द्या. याशिवाय पन्ना नॅशनल पार्कची सफारी करायला विसरु नका. आता खजुराहो या ठिकाणाला धार्मिक महत्व अधिक असल्यामुळे ट्रेडिशनल कपडे ज्यात कुर्ते, साडी असेच आऊटफिट्स परिधान करा.
Mahabalipuram
जर का तुम्हाला इतिहास या विषयात रस असेल तर तमिळनाडूमधील महाबलीपुरम या ठिकाणाला नक्की भेट द्या. महाबलीपुरम हे पल्लव वंशाच्या राजधानीचं शहर होतं. महाबलीपुरममध्ये दगडांमध्ये पक्षी, प्राणी, देव, संत यांची शिल्प कोरली आहेत. महाबलीपुरमला गेल्यावर पंचरथ, क्रिष्णा बटर बॉल, शॉर मंदिर, महिशासुरमर्दीनी गुहा, टायगर गुहा, गणेशरथ, स्कल्पचर म्युझियम ही ठिकाणं पाहा. या ही पर्यटन स्थापला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असल्यामुळे ट्रेडिशनल आऊटफिट्सवर भर द्या. (Travel Destinations 2025)
रसिका शिंदे-पॉल