कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर छावा चित्रपट (Chhaava Movie)अखेर थिएटर्समध्ये धडकलाच… देशभरातील प्रेक्षकांना आणि खासकरून मराठी प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या Magnum Opus ची उत्सुकता होती. इतकंच काय Advance बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसात छावाची तब्बल ५ लाख तिकीट विकली गेली होती. त्यामुळे प्रचंड हाईप असलेला डीरेक्टर लक्ष्मण उतेकर यांचा Cinematic Masterpiece आता तुम्ही थिएटर्समध्ये अनुभवू शकता. पण त्याच्याआधी आपण थोडक्यात छावा कसा आहे हे जाणून घेऊ. (Chhaava Review)
सुरुवातीला छावाच्या cast बद्दल आणि कलाकारांनी कसं काम केलं आहे हे जाणून घेऊ. यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज, रश्मीका मंधाना महाराणी येसूबाई, अक्षय खन्ना औरंगजेब, आशुतोष राणा हंबीरराव मोहिते, दिव्या दत्ता सोयराबाई, विनीत कुमार सिंग कवी कलश, संतोष जुवेकर रायाजी बांदल, नील भूपालम अकबर, प्रदीप रावत येसाजी कंक, डायना पेंटी झीनतून्नीसा, किरण करमरकर अण्णाजी दत्तो, सारंग साठे गणोजी शिर्के, सुव्रत जोशी कान्होजी शिर्के यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगणवरही या चित्रपटात एक खास जबाबदारी देण्यात आली आहे, ती तुम्हाला चित्रपटात कळेलच… विकी कौशलने साकारलेले शंभू राजे ही या मुव्हीची जमेची बाजू आहे. कारण त्याने ज्याप्रमाणे या रोलसाठी मेहनत घेतली आहे तसा तो साकारलासुद्धा आहे. डायलॉग डिलिव्हरीपासून ते एक मराठा राजा म्हणून असणारे हावभाव त्याला परफेक्ट जमले आहेत. याआधी Sardar Udham आणि Sam Bahadur हे दोन बायोपिक त्याने केले होते. त्यामुळे यामध्ये त्यांचा दांडगा अनुभव दिसून आळा आहे. (Chhaava Review)
रश्मीका तशी (Rashmika Tashi) या भुमिकेसाठी परफेक्ट दिसून आली नसली, तरी कसं बसं तिने एक मराठा राणी होण्याचा भार पेलला आहे. इतर कलाकारांनीही मराठा सरदार उत्तमरीत्या साकारले आहेत. त्यातच एक ऐतिहासिक पात्रं म्हणून अक्षय खन्नाने भलताच प्रभाव पाडला आहे. त्याने औरंगजेब जबरदस्त साकारला आहे. त्याचा स्क्रीन टाईम जरी कमी असला तरी त्याचा स्क्रीन Presence Impact फुल आहे. मुळात ऐतिहासिक चित्रपटांमध्ये Characters ची नावं कोणाला माहित नसतात. पण छावामध्ये तुमचा तो गोंधळ उडत नाही. ऐतिहासिक सिनेमा म्हटलं तर तो जास्त कमर्शिअल आणि Dramatic करण्यासाठी निर्माते Cinematic Liberty घेतातच… यामध्येही तशी लिबर्टी घेण्यात आली आहे.(Latest Movie Reviews)
चित्रपटाची सुरुवात बुर्हाणपूरच्या लुटीपासून दाखवण्यात आली आहे. म्हणजेच शंभू राजेंच्या जन्मापासून ते शिवरायांच्या निधनापर्यंतचे प्रसंग टाळण्यात आले आहेत. म्हणजेच १६८१ ते १६८९ या आठ वर्षांचा काळ चित्रपटात आहे. पण तरीही चित्रपटाचा प्लॉट गोंधळतो. बुर्हाणपूरनंतर शंभू राजेंची एकही महत्त्वाची मोहीम चित्रपटात दाखवण्यात आलेली नाही. त्यात घटनाक्रमाची माहिती किंवा साल न दाखवल्यामुळे तुम्ही निश्चितच कन्फ्युज होऊन जाल. इंटर्व्हल होईपर्यंत शंभू राजेंचा राज्याभिषेक, रायगडावरील कलह, शंभू राजे आणि शहजादा अकबर भेट, औरंगजेबाची दक्खनकडे कूच या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
यात अजून गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच शंभू राजे आणि येसूबाई म्हणजेच विकी कौशल आणि रश्मीकाची केमिस्ट्री रंगवण्यात आली आहे. पण तरीही फर्स्ट हाफपर्यंत लक्ष्मण उतेकर यांना प्रेक्षकांना खिळवून ठेवता आलं नाही. पण चित्रपटातली वेशभूषा, मेकअप, सेटअप, दमदार डायलॉग्स आणि दिग्दर्शन ही या चित्रपटाची प्रभावशाली पकड म्हणावी लागेल. लक्ष्मण उतेकर हा बॉलीवूडचा गाजलेला Cinematographer आहे. त्यामुळे याचीही सिनेमॅटोग्राफी आणि कलर ग्रेडिंग उत्तम आहे. पण स्क्रीनप्ले तुमचा इतका गोंधळ उडवतो की तुम्ही फर्स्ट हाफमध्ये शंभू राजेंवरील सिरीयल पाहताय की काय, असा भास होतो. (Latest Movie Reviews)
चित्रपटाचा सेकंड हाफ दमदार आहे. औरंगजेबाची छावणीदेखील परफेक्ट दाखवण्यात लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यशस्वी ठरला आहे. विशेष करून मराठी माणसं ही इतिहासाशी इमोशनली Attached आहेत. त्यामुळे छावामध्येही असे अनेक इमोशनल सिन्स आहेत, ज्यामुळे तुम्ही चित्रपटाशी जोडले जाता. VFX वर देखील छावाच्या टीमने चांगली छाप पाडली आहे. एका गोष्टीची मात्र इथे कमतरता दिसून येते, ते म्हणजे मराठी डायलॉग्स… हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा… हा डायलॉग सोडला तर कुठेही दमदार असा मराठी डायलॉग किंवा संवाद चित्रपटात कुठेच नाही. ऐतिहासिकदृष्ट्या पाहायचं झालं तर राज्याभिषेकानंतर अवघ्या १५ दिवसांनी महाराजांनी बुऱ्हाणपुरची मोहीम हाती घेतली होती. पण इथे आधी बुर्हाणपूर लुट दाखवण्यात आली आहे आणि नंतर राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. याशिवाय सोयराबाईंना पूर्णपणे व्हिलन दाखवण, प्रेक्षक आणि इतिहासप्रेमींच्या पचनी पडणार नाही. त्यात सिंह आणि शंभू राजेंच युद्ध हे प्युअर Cinematic लिबर्टी आहे.(Chhaava Review)
शंभू राजे म्हणजेच विकी कौशल आणि छंदोगामात्य कवी कलश म्हणजेच विनीत कुमार सिंग यांची जुगलबंदी उत्तम जमली आहे. आता विषय मराठ्यांचा आहे त्यामुळे मराठमोळ्या Actors चा भडीमार या चित्रपटात आहे. संतोष जुवेकर, सारंग साठे, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर अशा अनेक कलाकारांनी जबरदस्त पर्फोरमन्स दिले आहेत. Background Music ही छावाची निगेटिव्ह बाजू म्हणावी लागेल. मातब्बर संगीतकार ए. आर. रेहमान यांचं म्युझिक असूनसुद्धा ते तितकं एन्गेजिंग वाटत नाही. त्यात कुठेही मराठी किंवा फोक म्युझिकचा तडका नाही.
============
हे देखील वाचा : Tanaji Malusare : यशवंत घोरपडे की यशवंती नावाची घोरपड?
============
उदा, द्यायचं झालं तर रेहमान यांनी ‘जोधा अकबर’ आणि ‘पोन्नियीन सेल्व्हन’ या ऐतिहासिक चित्रपटांना दिलेलं संगीत जमून आलं आहे. पण यामध्ये एखाद गोंधळ, पोवाडा किंवा तगडी मराठी पंचलाईन असलेलं गाण असत, तर चित्रपटाच वजन आणखी वाढलं असत. यातली सर्वच गाणी आधुनिक पद्धतीची वाटत आहेत. त्यांना १६व्या शतकातील लोकंसंगीताची जोड कुठेही दिसून आली नाही. कदाचित ही गाणी हिंदी प्रेक्षक खेचून घेण्यासाठी असू शकतात. चित्रपट शंभू राजेंची कैद आणि त्यांच्या निर्घृण हत्येपर्यंत जातो. पण एंडिंग इमोशनल जरी असली तरी खूप Dramatic आहे. अजून एक म्हणजे पुढे हिंदवी स्वराज्य छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी कसं संभाळल आणि त्यानंतर मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला, याचे End टायटल्स हवे होते.(Chhaava Review)
संभाजी महाराजांवर गेल्याच वर्षी तीन मराठी चित्रपट आले होते, ते म्हणजे ‘संभाजी १६८९’, ‘शिवरायांचा छावा’ आणि ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ ! पण आता बॉलीवूडने पेललेलं हे शंभू राजेंच्या जीवनावर आधारित असलेलं शिवधनुष्य देशभरातील सिनेप्रेमींना आवडतं, हे येणारे २-३ दिवसच दाखवून देतील. एकंदरीत इतिहास तुम्ही पुस्तक आणि संदर्भ ग्रंथांमधूनच शिकून घ्यायला हवा पण हा मुव्ही तुम्ही FAMILY सोबत जाऊन बघू हमखास बघूच शकता!