Home » America : विमान अपघात की घातपात !

America : विमान अपघात की घातपात !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेमध्ये विमान अपघात झाला आहे. एका प्रवासी विमानाची आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची समोरासमोर टक्कर झाली. रोनाल्ड रेगन वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. या विमानात 60 प्रवासी असून त्यातील काहींचा मृत्यू झाल्याची भीती आहे. कारण हेलिकॉप्टरची धडक झाल्यावर विमानातून आगीचा मोठा गोळा तयार झाल्याचे काही व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. या धडकेनंतर विमान आणि हॅलिकॉप्टर हे पोटोमॅक नदीत पडले. या घटनेनंतर सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली असून विमानातील प्रवाशांना शोधण्यासाठी पोटोमॅक नदीत शोधमोहीम सुरु कऱण्यात आली आहे. या विमानातील काही प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून अन्य प्रवाशांच्या जीवित असण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. कारण ही धडक झाल्यावर विमानाला आग लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे सांगणे आहे, शिवाय ज्या नदीत विमानाचे अवशेष पडले ती पोटोमॅक नदी पूर्णपणे गोठलेली होती. (America)

मात्र या सर्वात हा अपघात नेमका कसा आणि का झाला, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. अपघात झाला ते ठिकाण रोनाल्ड रेगन वॉशिंग्टन विमानतळाजवळ होते. या भागात नेहमीच प्रवाशी विमानांची संख्या मोठी असते. त्यामुळे या भागात लष्करी विमानांना उडवण्यास परवानगी नव्हती, अशात हे लष्करी हेलिकॉप्टर नेमके विमानाच्या समोर कसे आले हा प्रश्न विचारण्यात येत आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या अपघाताबाबत शंका उपस्थित करत हा घातपात तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. त्याला कारण म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा आकाश निरभ्र होते. ज्या हेलिकॉप्टरनं ही धडक दिली ते ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आधुनिक असे आहे, अगदी एका क्षणातही ते आपली दिशा बदलू शकते. अशावेळी हॅलिकॉप्टर चालकाला समोरचे मोठे प्रवासी विमान का दिसले नाही, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. या अपघाताबद्दल शंका निर्माण होण्याचे आणखी प्रमुख कारण म्हणजे, हा अपघात झाला ते स्थळ व्हाईट हाऊसच्या जवळ आहे. आणि अपघात झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच होते. त्यामुळे या सर्व बाबींची आता चर्चा होत असून खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच शंका व्यक्त केल्यामुळे या अपघाताची लष्करी चौकशी सुरु झाली आहे. (International News)

अमेरिकेमधील सर्वात व्यस्त असणा-या काही विमानतळांपैकी एक असलेले रेनॉल्ड रेगन विमानतळावर उतरत असलेल्या एअरलाइन्स फ्लाइट 5342 या प्रवासी विमानाची आणि अमेरिकेतील लष्करात सर्वात प्रगत असे माऩण्यात येणा-या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये हवेत टक्कर झाली. ही टक्कर होताच, आगीचा गोळा होत विमान खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी शूट केले आहे. ही ट्क्कर एवढी जोरदार होती की, आकाशातच विमानाचे तुकडे झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. हे विमान आगीच्या गोळ्यात खाली असलेल्या पोटोमॅक नदीत पडले आहे. ही नदी गोठली असून विमानाचे अवशेष नदीच्या तळाशी गेल्यानं आता त्यांना कसे काढायचे हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. या विमानात 60 प्रवाशी आणि क्रू मेंबर होते. यातील कोणी जिवंत असेल का, याबाबत शंका व्यक्त होत आहे. टक्कर झाल्यावर निर्माण झालेला आगीचा गोळा आणि बर्फाळ नदीच्या तळाशी विमानाचा मलबा गेल्यानं ही भीती व्यक्त होत आहे. यासाठी आता अग्निशामक दल आणि अन्यही यंत्रणा कामाला लागल्या आहेत. (America)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

हा विमान अपघात नेमका कसा झाला, याबाबत शंका व्यक्त होत आहे. विमान अपघात झाला, तो मार्ग विमानांच्या उतरण्यासाठीचा राखीव होता. रेगन विमानतळावर कायम प्रवासी विमानांची ये-जा असते. अशावेळी लष्करी हेलिकॉप्टर तिथे कसे आले, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. ज्या विमानाचा अपघात झाला, ते विमान कॅनडा एअरलाईन्सचे होते. अमेरिकेतील कॅन्सस सिटीहून ते वॉशिंग्टनला येत होते. ज्या हेलिकॉप्टरला विमानाची टक्कर झाली ते अमेरिकन सैन्याचे ब्लॅकहॉक (H-60) हेलिकॉप्टर होते. व्हाईट हाऊस आणि विमानतळामधील हवाई अंतर तीन किलोमीटरपेक्षा कमी असल्यामुळे आता हा अपघात नसून घातपात होता का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या भागात शक्यतो लष्करी हॅलिकॉप्टर येत नाहीत. ज्या हेलिकॉप्टरची विमानाला धडक बसली, त्यात काही सेकंदात दिशा बदल्य़ाची यंत्रणा होती. अशावेळी हॅलिकॉप्टर चालकांला आपल्या समोरचे मोठे विमान का दिसले नाही, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. याबाबत फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड चौकशी करत असून ट्रम्प यांनीही हा अपघात कमी पण घातपात जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.