Home » Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस

Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Wheat Grass Juice
Share

गव्हाच्या अंकुरांचा रसाबद्दल (Wheat Grass Juice) अनेकांनी ऐकले असेल. गव्हाच्या अंकुरांचा रस हे ऐकून बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव निर्माण झाले असतील. मात्र आपल्या आयुर्वेदामध्ये, निसर्गोपचारामध्ये याबद्दल खूप सांगितले आहे. हा गव्हाच्या अंकुरांचा रस आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी खूपच फायदेशीर आणि लाभदायक आहे. या रसाबद्दल अनेकांना माहित असेल तर काहींना याबद्दल काहीच कल्पना नसेल. आज आपण या लेखातून या गव्हाच्या अंकुरांचा रसाबद्दल माहिती जाणून घेऊया. (Wheat Grass Juice)

गव्हाच्या तृणात असणाऱ्या रोग बऱ्या करणाऱ्या गोष्टींबाबत आजही संशोधन सुरू आहे. गव्हाच्या अंकुर रसामध्ये ३५० हून अधिक रोग बरे करण्याची ताकद असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. तज्ज्ञांनी या गावाच्या अंकुर रसाला ‘हरित रक्त’ म्हणून देखील म्हटले आहे. या रसात कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, जीवनसत्त्वे व क्षार आहेत. गव्हांकुरात मॅग्नेशिअम, व्हिटामिन ए, ई, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. या घटकांची आपल्या शरीरालादेखील आवश्यकता असते. गव्हांकुराचा रस हा आरोग्यासाठी अतिशय फायदेकारक ठरतो. (Health Care)

गव्हाच्या ताज्या तृणांपासून तयार केला जाणारा रस अर्थात ज्यूस यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच क्लोरोफिल, फ्लेव्होनॉईड्स, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई देखील असतात. हिरव्या गवतासारखे दिसणारे गव्हांकुर म्हणजेच व्हीट ग्रास शक्तिशाली डी-टॉक्सिन एजंटच्या रुपात काम करते. पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असलेल्या या वनस्पतीचा वापर दैनंदिन आहारात केल्यास अनेक शारीरिक व्याधींपासून सुटका होऊ शकते. (Health)

Wheat Grass Juice

– गव्हांकुराचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराची धोका कमी होतो. व्हीटग्रासमध्ये भरपूर फायबर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. (Marathi Top Stories)

– गव्हांकुरांच्या नियमित वापर केल्यास केस मजबूत, दाट आणि चमकदार होतात. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक पोषक आणि खनिजे व्हीटग्रासमध्ये असल्याने, दररोज एक ग्लास गव्हाचा रस घेतल्यास केस गळणे कमी होते. शिवाय केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो.

– गव्हांकुराचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे गव्हाचा घास घेतल्यास त्यांना अनेक फायदे होतात.

– गव्हाचा रस आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करतो ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ प्रभावीपणे बाहेर काढण्यास मदत होते.

– व्हीट ग्रास खाल्ल्याने रक्तप्रवाहात सुधारणा होते. याचा ज्युस पिण्यासह चेहऱ्यावर किंवा गळ्यावर कॉटनच्या मदतीने लावल्यास स्कीन ग्लो झाल्याचे दिसून येते. जर तुमची स्कीन रफ असेल तर याचा रस लावल्याने मऊ आणि मुलायम होते. पण ज्युस लावल्यावर जरा वेळात तो लगेच पुसून घ्यावा.

– पाचन सुधारते, आर्थरायटिसमध्ये लाभ, कमजोरी दूर होते, श्वास आणि शरीराचा वास दूर होतो, स्कीनला झालेल्या जखमा भरतात, दात मजबूत राहतात, लिव्हरची स्वच्छता करतो, सनबर्न पासून स्कीनला वाचवितो, ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतो, सायनसच्या समस्येपासून सुटका, कॅन्सरपासून बचाव, इम्युन सिस्टिम चांगली राखतो.

=======

हे देखील वाचा : Vijayasai Reddy : त्यांना लागली शेतीची ओढ !

=======

– गव्हाच्या गवतामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर याचा फायदा होतो. गहू डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासही मदत करतो.

– गव्हांकुराचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे गव्हाचा घास घेतल्यास त्यांना अनेक फायदे होतात. रक्तातील साखर वाढली की शरीरात अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. अशा वेळी हा ज्यूस प्यायल्याने आराम मिळतो.

– गव्हांकुराच्या रसामुळे पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर फायदा होतो. गहू डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासही मदत करतो.

(टीप : आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ल्या घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.