Reasons of bad breath बहुतांशवेळा म्हटले जाते की, सकाळी घरातून निघताना कांदा किंवा लसणाचे सेवन करणे टाळावे. यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. याशिवाय काहीजण कांदा-लसूणचे सेवन करत नाही तरीही त्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते. काहीवेळेस ही समस्या एवढी वाढली जाते की, चारचौघांमध्ये बोलताना लाज वाटते. सध्या मोठ्या प्रमाणात व्यक्ती तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येचा सामना करत आगेत. पण यामागील कारणे माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
तोंडाच्या दुर्गंधीला वैद्यकीय भाषेमध्ये हॅलिटोसिस असे म्हटले जाते. ही एक सर्वसामान्य समस्या आहे. यामध्ये तोंडाची योग्य स्वच्छता न करणे, दात आणि हिरड्यांसंबंधित समस्या, तोंड कोरडे होणे, अनहेल्दी डाएट यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. याशिवाय मधुमेह आणि पोटासंबंधित समस्यांसह अन्य आजारांमुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. सातत्याने ही समस्या उद्भवत असल्यास डॉक्टरांची भेट घ्यावी.
डेंटिस्टनुसार, योग्य पद्धतीने ब्रश आणि जीभेची स्वच्छ करावी. जेणेकरुन दातांमध्ये अडकलेल्या अन्नपदार्थांमुळे तोंडात बॅक्टेरिया वाढले जाणार नाही. अन्यथा तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. हिरड्यांना येणारी सूज, दात किडल्यानेही तोंडाला दुर्गंधी येते. कांदा, लसूण, मसालेदार पदार्थ, तंबाखू आणि धुम्रपान केल्यानेही तोंडातून घाण वास येऊ लागतो.
![reasons of bad breath](https://gajawaja.in/wp-content/uploads/2025/01/reasons-of-bad-breath-1.png)
reasons of bad breath
=======================================================================================================
हेही वाचा :
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य
Black Pepper Water Benefits : थंडीत काळीमिरीचे पाणी प्यायल्याने दूर होतात या समस्या
=======================================================================================================
अशातच तोंडाच्या दुर्गंधीपासून कशी सुटका मिळवावी असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यावर डेंटिस्ट म्हणतात की, सर्वप्रथम तोंडाची स्वच्छता करावी. दिवसातून दोनदा फ्लोराइड युक्त टुथपेस्टने ब्रश करावे. जीभेची स्वच्छता करण्यासाठी टंग क्लिनरचा वापर करावा. दातांमध्ये अडकलेले अन्नपदार्थ काढण्यासाठी इंटरडेंटल ब्रश किंवा फ्लॉसचा वापर करणे महत्वाचे आहे. याशिवाय अशा माउथवॉशचा वापर करा ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया दूर होईल.
एक्सपर्ट्सनुसार, तोंडात सातत्याने लाळ अधिक निर्माण झाल्यास दुर्गंध येण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, याशिवाय तंबाखू, सिगरेट आणि कॅफेनचे सेवन कमी करावे. याशिवाय डाएटवरही लक्ष द्यावे. फायबरयुक्त फळ आणि भाज्यांचे सेवन करा. यामुळे बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होईल. लसूण, कांदा आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. (Reasons of bad breath)
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही समस्येवर तोडगा निघत नसल्यास डॉक्टरांना भेटा. दातांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करणे आणि कॅव्हिटी किंवा हिरड्यांच्या समस्येवर योग्य उपचार घ्यावेत.