Home » Calendar : २ सप्टेंबरला झोपलेली लोकं उठली १४ सप्टेंबरला ?

Calendar : २ सप्टेंबरला झोपलेली लोकं उठली १४ सप्टेंबरला ?

by Team Gajawaja
0 comment
Share

कोरोनानंतर २०२० हे वर्ष आयुष्यातून डिलीट करून टाकावं, असं प्रत्येकाच्या बोलण्यातून आपण ऐकलं आहे. कारण त्यावेळी खरचं हे वर्ष म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यासाठी, कुटुंबासाठी काळकुट्ट वर्षच होतं. कदाचित ही त्या काळातील अनुभवांची आणि कष्टांची प्रतिक्रिया असू शकते, पण वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही ते आपल्या गतीने सुरूच राहतं. आपल्याला ते मान्य करायचं असो किंवा नसो किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करायचा असो, थोडक्यात काय तर वेळेचं हे कालचक्र आपल्याला उत्तर द्यायला बांधील नाही हेच खरं. पण त्या गतीला आपल्याला आपल्या जीवनाचा एक भाग बनवून त्याचा सामना हा करावा लागतो. कारण प्रत्येक दिवस नवीन अनुभव नवी आशा घेऊन येतो. पण, एका काळात एक अशी घडामोड घडली होती ज्याने संपूर्ण जगातील कॅलेंडरला एका चकित करणाऱ्या बदलासाठी भाग पाडलं. तर नेमकी काय होती ती घटना ? आणि असं कोणतं वर्ष होत ज्याने संपूर्ण आयुष्य लोकांचं बदललं ? जाणून घेऊ. (Calendar)

इंग्रजी इतिहासात असं एक वर्ष मानलं जातं जेव्हा एका वर्षातले ११ दिवस अचानक गायब झाले होते. ते वर्ष म्हणजे १७५२ ! या वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातच एक घटना घडली होती, ज्यामुळे पूर्ण इतिहासच बदलला गेला. ब्रिटन आणि त्यांच्या वसाहतींमध्ये २ सप्टेंबर १७५२ रोजी लोक झोपली आणि जेव्हा ती उठली, तेव्हा तारीख होती १४ सप्टेंबर १७५२. या ११ दिवसांचा घोळ म्हणजे ‘जुलियन कॅलेंडर’ व ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ यांच्यातील बदल. त्या काळात या घटनेमुळे निषेध व्यक्त केला जात होता आत्ताचं सोशल मीडिया तेव्हा असतं तर बवाल उडाला असता इतकं ते ट्रोल केलं गेलं असतं. आपल्यासाठी कदाचित लॉकडाउन पुढे हे ११ दिवस खूपच छोटे असतील पण त्यावेळी ह्या ११ दिवसांमुळे लोकांच्या आयुष्यात खळबळ उडाली होती.(Calendar History)

कारण त्याकाळातील लोकांचा विरोध असण्यामागचं कारण म्हणजे जन्माला आलेले, मृत पावलेले व त्या दरम्यान ठरवलेली लग्न ह्या कशाचीच नोंद त्यावेळी होणार नव्हती पण असं का ? तर जुलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर यामध्ये खूप मोठा फरक होता. पारंपरिक पद्धतीनुसार त्यावेळी ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं जे ज्युलियस सीझर यांच्याद्वारे आमलात आणलं गेलं होतं. तर ग्रेगोरियन कॅलेंडर हे पॉप/ पोप फ्रान्सिस्कसच्या कॅलेंडर सुधारणांच्या नियमाने १५८२ मध्ये सरकार गेले. त्यावेळी जुलियन कॅलेंडरमध्ये काही प्रमाणात चुका होत्या, ज्यामुळे वेळेच्या गणनेत फरक होऊ लागला होता. आणि ग्रेगोरियन कॅलेंडर आले आणि त्यामध्ये काही दिवस कमी केले गेले, ज्यामुळे तारीख २ सप्टेंबर १७५२ नंतर लगेच १४ सप्टेंबर १७५२ अशी झाली.(Calendar)

त्यानंतर, ब्रिटन आणि त्याच्या वसाहतींमध्ये लोकांना या ११ दिवसांच्या गायब होण्याची घटना अत्यंत धक्कादायक वाटली. त्यांनी त्यावर तीव्र विरोधही केला. लोकांमध्ये अशांती निर्माण झाली आणि गावोगावी दंगली होऊ लागल्या. त्यावेळी, आजकाल सारख्या सोशल मीडियाचा प्रसार नव्हता, अन्यथा ही घटना किती तरी दिवस चर्चेत राहिली असती, आणि त्यावर विविध ट्रोल्स बनवले गेले असते. पण त्या काळाच्या ऐतिहासिक दिवसांची कल्पना केल्यास ते खूप महत्त्वपूर्ण ठरत. काळ कितीही बदलला तरी, त्यात आलेली प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते,असं म्हणतात जस आपल्याला लॉकडाउन शिकवून गेला त्याप्रमाणे ते ११ दिवस त्यांना शिकवून गेले.(Calendar)

कॅलेंडर मधील ह्या ११ दिवसांचा काळ कनफूजिंग जरी वाटतं असला तरी त्यावेळी त्या काळच्या ब्रिटन सरकारन अजून एक बदल त्यावेळी जाहीर केला तो म्हणजे १७५२ च्या वेळी न्यू इयर हे २५ मार्चपासून सुरु व्हायचं परंतु त्यावेळी त्यांनी ते बदलून न्यू इयर हे १ जानेवारी रोजी सुरु होईल व ३१ डिसेंबर रोजी संपेल हा बदल जाहीर केला. आता तुम्ही म्हणाल नवीन कैलेंडर नुसार एखाद्या व्यक्तीचं जर २६ एप्रिलला लग्न झाल असेल तर ती तारीख कोणती असेल? तर एखाद्या व्यक्तीच लग्न २६ एप्रिलला जुलियन कॅलेंडरनुसार झाल असेल, तर ग्रेगोरीयन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख ७ मे होईल. हे बदल त्या काळच्या लोकांसाठी खूप गोंधळ उडवणारे असले तरी देखील त्याचा पॉसिटीव्ह परिणाम त्यावेळी झाला जो की अजूनही पाहायला मिळतो. तो म्हणजे १७५२ च्या सप्टेंबर महिन्यात १९ दिवस होते, त्यामुळे कर्मचारी वर्गाला एका महिन्याच्या पगाराचे ३० दिवस दिले गेले. त्यामुळे ‘पेड लिव्ह’ म्हणजेच भरपगारी रजा हा रिवाज सुरू झाला. आणि या बदलामुळे कर्मचारी वर्गाला अधिक फायदा झाला आणि या संकल्पनेचा वापर पुढील काळात अनेक देशांमध्ये पाहायला मिळाला.(Calendar History)

इंग्लंडमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरच्या स्वीकारासाठी“द कॅलेंडर अॅक्ट १७५०” या कायद्याची निर्मिती केली गेली होती. यामुळे इंग्लंड आणि त्याच्या वसाहतींमध्ये एक मोठा बदल झाला. या कायद्यामुळे इंग्लंडमध्ये १७५२ मध्ये कॅलेंडर सुसंगत करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आणि ज्युलियन कॅलेंडरच्या वापरात झालेल्या ११ दिवसांच्या गडबडीला थांबवण्यात आल. या कायद्यान इंग्लंडमध्ये १७५२ साली ज्युलियन कॅलेंडरला पार करून ग्रेगोरियन कॅलेंडर लागू करण अनिवार्य केल. याचा परिणाम असा झाला की, २ सप्टेंबर १७५२ नंतर १४ सप्टेंबर १७५२ असा थेट दिवसांची विश्रांती लागू करण्यात अली. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये १७५१ चे वर्ष हे फक्त २८२ दिवसांचे मान्य करण्यात आले, कारण ११ दिवस हे कॅलेंडरमधून काढले गेले होते.

===============

हे देखील वाचा : India Constitution : भारतीय संविधानाला उधार का थैला का म्हणतात?

===============

या कॅलेंडर बदलाच्या निर्णयाचा इंग्लंडमधील जनतेने मोठा विरोध केला,अनेक लोकांनी त्यावर आपला निषेध देखील व्यक्त केला आणि तीव्र असंतोष दर्शवला. एवढचं नाही तर एक प्रसिद्ध चित्रकार विल्यम हॉगार्थ यांनी त्यांचा निषेध एका चित्राद्वारे व्यक्त केला, ज्याला “Give us 11 days” हे नाव देण्यात आल. हे चित्र १७५५ मध्ये तयार करण्यात आल आणि ते त्या काळात खूप प्रसिद्ध झाल. या चित्रामध्ये, हॉगार्थन इंग्लंडमधील जनतेचा तणाव आणि असंतोषाच चित्रण केल होतं, हे चित्र त्याकाळी इतकं गाजलं तरीसुद्धा ब्रिटन सरकार झुकलं नाही. (Marathi news)

अशा स्थितीत, आपल्या समाजातील बदलांचा स्वीकार करण आणि त्यावर शांततापूर्वक चर्चा करण हे अत्यंत महत्त्वाच आहे. कारण कोविड-१९ च्या महामारीनंतर, आपण हे स्पष्टपणे पाहिलं आहे की, बदल स्वीकारण आणि त्यासोबत जुळवून घेण किती महत्त्वाच आहे. कोरोनाच्या संकटान आपल्याला दाखवून दिलं की, जरी पहिल्यापासून विरोध झाला असला तरी, योग्य धोरण आणि पावल उचलल्यान आपण संकटावर मात करू शकतो. आज, आपल्याला कायद्यांच्या आणि बदलांच्या मागील कारणांचा अभ्यास करून सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण गरजेच आहे. हे केल्यास, केवळ आर्थिक नुकसानचं टाळता येणार नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले प्रत्येक बदल आपण स्वीकारू शकतो आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकतो.त्यामुळे, थोडासा संयम, विश्वास आणि समजून उमजून निर्णय घेणं, हेच एक चांगलं मार्ग आहे, जे आपल्या देशाच्या प्रगतीत आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.