सत्य जाणून घेण्याची वेळ आता आली आहे, असा डायलॉग मारत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका खास फायलीवर स्वाक्षरी केली, आणि अमेरिकेत खळबळ उडाली. ट्रम्प यांनी ज्या फाईलवर स्वाक्षरी केली ती फाईल आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येचा तपास झाला, त्या कादगदपत्रांची. 1963 मध्ये केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांची हत्या झाली. ही हत्या कोणी आणि काय उद्देशानं केली, हे गुढ अद्यापही उलगडले नाही. आता केनडी हत्येसंदर्भातील तपास कागदांची फाईल जनतेसमोर ठेवण्यात येणार असल्यामुळे हे गुढ उलगडण्याची शक्यता आहे. यासोबतच मार्टिन लूथर किंग हत्येशी संबंधित कागदपत्रेही सार्वजनिक केली जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचार मोहीमेत यासंदर्भात वचन दिले आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी काही महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता दिली. त्यापैकीच हा एक निर्णय होता. (John F. Kennedy)
अमेरिकेचे सर्वात लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉन एफ केनेडी यांचा उल्लेख करण्यात येतो. त्यांची 1963 मध्ये ड्लास येथे हत्या कऱण्यात आली. अद्यापही या हत्येचे गुढ उलगडलेले नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी केनेडी यांच्या हत्येशी संबंधित सरकारी कागदपत्रे प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या हत्याकांडावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. फक्त तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येशी संबंधित हजारो सरकारी कागदपत्रेच नाहीत तर त्यांचे भाऊ रॉबर्ट एफ. केनेडी आणि नागरी हक्क नेते डॉ. मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांच्या मृत्यूशी संबंधित हजारो सरकारी कागदपत्रे प्रसिद्ध करण्याचे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. हे आदेश देतांना ट्रम्प यांनी आता अमेरिकन लोकांना सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधानही केले आहे. त्यांच्या या नव्या राजकीय खेळीमुळे नक्की कोणाची नावे पुढे येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कारण केनेडी हत्याकांडामागे अमेरिकेतील प्रतिष्ठीतांची नावे असल्याची कुजबूज होते. तसेच रशियाच्या गुप्तचर संघटनेवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. (International News)
या आदेशात ट्रम्प यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येशी संबंधित सर्व नोंदी 15 दिवसांच्या आत जाहीर करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच रॉबर्ट एफ. केनेडी आणि मार्टिन यांच्या हत्येशी संबंधित सर्व नोंदी 45 दिवसांच्या आत त्वरित पुनरावलोकन करून पूर्ण करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळात तपास यंत्रणांना जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येबद्दल अधिक माहिती उघड करण्याचे आदेश दिले होते. यावेळीही प्रचार मोहिमेदरम्यान राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्येशी संबंधित गोपनीय कागदपत्रांचा शेवटचा भाग सार्वजनिक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ते आता त्यांनी पूर्ण केले आहे. (John F. Kennedy)
22 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी हे पत्नीसह डॅलस, टेक्सास येथे एका उघड्या लिमोझिन कारमधून प्रवास करत होते. केनेडी यांच्या भोवती त्यांच्या चाहत्यांचा मोठा गराडा पडला होता. यादरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधीच त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी ली हार्वे ओसवाल्ड नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. केनेडी यांची हत्या ओसवाल्ड यानेच केल्याचे तपासात नमूद कऱण्यात आले. पण या तपास अहवालावर कायम टिका करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष असलेल्या केनेडीच्या हत्येचा एक मोठा कट रचला गेला आणि ओसवाल्ड फक्त एक प्यादा होता, असे अमेरिकन नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी तीन सिद्धात मांडण्यात आले. एकतर त्यात डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचा संबंध असावा असे मांडण्यात आले. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीला केनेडी यांच्या हत्येबाबत क्युबा आणि डाव्या विचारसरणीतील काही नेत्यांवर संशय होता. (International News)
================
हे देखील वाचा : Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
================
पण यासंदर्भात पुढे काय तपास झाला हे स्पष्ट झाले नाही. काही अमेरिकन केनेडी हत्येमागे सीआयएचाच हात असल्याचे मानतात. त्यांच्या दाव्यानुसार सीआयएने माफियांसोबत मिळून राष्ट्राध्यक्ष केनेडी यांची हत्या केली. तर काहींच्या मते केनेडी यांची हत्या ही रशियाची गुप्तचर संघटना केजीबीनं केली. केनेडी यांची हत्या झाली तेव्हा शीतयुद्ध सुरू होते. अमेरिका आणि रशिया यांच्या वर्चस्वाच्या लढाईत केनेडी यांची हत्या तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांनी गुप्तचर संस्था केजीबीच्या मदतीने केल्याचेही काही अमेरिकन सांगतात. मात्र यातील कुठल्याही सिद्धांताला ठोस पुरावा नाही. आता या हत्येच्या तपासातील कागदपत्र खुली करण्यात आल्यावर केनेडी हत्येवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे. (John F. Kennedy)
सई बने