तुम मुझे खून दो, में तुम्हे आजादी दुंगा…! इथल्या लहान मुलालाही सांगावं लागत नाही की, ही घोषणा कोणाची होती. भारताच्या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासातील सर्वात महान स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस…(Subhas Chandra Bose) एक असं असामान्य नेतृत्व, ज्याच्या मागावर कित्येक देश होते. पण कुणालाही त्यांचा सुगावा लागला नाही आणि त्यांनी भारताची स्वतःची हक्काची एक आर्मी उभारली. मात्र नेताजींचं आयुष्य जितकं भव्य-दिव्य राहिलं, तितकाच त्यांचा मृत्यू गूढ होता. भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त गोष्ट म्हणजे नेताजींचा मृत्यू… पण त्याहूनही वादग्रस्त गोष्ट काय… तर नेताजी आपल्या मृत्यूनंतरही ४० वर्ष जिवंत होते. आता मृत्यूनंतर जिवंत…ही नक्की भानगड तरी काय आहे…
सर्वात पहिलं हे जाणून घेऊया की नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांचा मृत्यू कसा झाला. तर त्यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमधल्या तायहोकु इथे प्लेन crash मध्ये झाल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आपली पत्नी एमिलीसोबत शेवटची भेट १९४३ ला बर्लिनमध्ये घेतली होती. त्यानंतर ते आजाद हिंद फौजचं नेतृत्व करत होते. मात्र प्लेन Crash मध्ये मृत्यू झाल्यानंतर सर्वांनी हे स्वीकारलं की आता नेताजी आपल्यामध्ये नाहीयेत. पण अनेकांच्या मते हा कथित म्हणजे फेक प्लेन crash होता आणि हा plan स्वत: सुभाषचंद्र बोस यांनीच केल्याचं बोललं जातं. बोस वेषांतर करून ब्रिटिशापासून स्वतःचा बचाव करून कितीतरी देश फिरले होते. यावरून गुप्त कारवाया करण्यात ते माहीर होते, हे दिसूनच येत. प्लेन crash चा प्लान त्यांनी रशियाची मदत घेण्यासाठी म्हणजे जोसेफ stalin यांना भेटण्यासाठी केला होता, असंही सांगितलं जात.
कारण पहिली गोष्ट म्हणजे १८ ऑगस्टला प्लेन crash होऊन सुभाषचंद्र बोस या भारतीय माणसाचं निधन झाल्याची कुठेही नोंद नाही. हा कथित प्लेन crash होता. म्हणजे निव्वळ अफवा होती, कारण तैवानच्या ओफ़िशिअल एन्ट्री बुक रेकॉर्डसमध्ये या दिवशी अशा प्रकारच्या प्लेनचा अपघात झाला, असं कुठेही मेन्शन नाही. प्लेन crash झालेले जे फोटो प्रकाशित करण्यात आले होते, ते दुसऱ्या कोणत्यातरी अपघाताचे होते. कारण प्लेन crash झालेल्या जागेचे फोटो आणि actual फोटो यांच्यात खूप तफावत होती. असं म्हणतात की, या फेक प्लेन crash च्या संपूर्ण प्लानमध्ये बोस यांचे जपानचे काही सहकारी पण या योजनेत सामील होते.(Subhas Chandra Bose)
हा विमान एक जपानी बॉम्बर प्लेन असल्याचं सांगितलं जात. यावेळी इंडियन national आर्मीचे ऑफिसर हबिबूर रेहमानसुद्धा तैवानमध्येच होते. त्यांनीही स्टेटमेंट दिली की, या प्लेन crash मध्ये सुभाषचंद्र बोस आणि २ जपानी ऑफिसर्स यांचा मृत्यू झाला. यामध्ये एक नाव म्हणजे त्सुनामासा शिदेई ! तसेच इथे तैवानमध्येच त्यांना अग्नी देण्यात आली. पण इथे आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, थर्ड डिग्री बर्न झालेली त्यांचा मृतदेहसुद्धा कुणाला दाखवण्यात आला नव्हता आणि ज्याठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली, त्या एन्ट्री बुकमध्येही सुभाषचंद्र बोस असं नाव नव्हत. त्यामुळे हा प्लेन crash, डेड बॉडी, अंत्यसंस्कार हा सगळा सेट अप होता. जो बोस यांनीच INA आणि जपानी सैन्यासोबत मिळून बनवला होता. असे काही रिपोर्ट सांगतात. त्यामुळे मुद्दा असा बनतो की १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचा मृत्यू झाला नाही, मग ते कुठे होते. याचं उत्तर म्हणजे ते तैवानमध्येच होते आणि त्यांनतर ते रशियाला आले होते.(Subhas Chandra Bose)
इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशिया आणि आपल्यावर राज्य करणारा ब्रिटन अलाईज गटात होते, तर जपान आणि जर्मनी हे axis गटात होते. सुभाषचंद्र बोस यांनी आधीच हिटलरची भेट घेतली होती. दुसरीकडे जपानसोबत त्यांचे चांगले संबंध होते. अलाईज गटात रशिया आणि ब्रिटन यांच्यातही काही कारणांवरून ताटातूट झाली होती. त्यामुळे stalin यांच्याशी चर्चा करून रशियाला आपल्याकडे खेचून जर्मनी, जपान, रशिया आणि भारत असं मिळून ब्रिटनवर attack करावा आणि भारताला स्वतंत्र करावं, अशी बोस यांची योजना होती.(Marathi News)
या सर्व गोष्टी जस्टीस मुखर्जी यांनी तयार केलेल्या मुखर्जी कमिशनमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. आता येऊया बोस कुठे होते या गोष्टीवर… तर ते आधी तैवान मग नंतर रशियाला गेले आणि तिथेच गुप्त पद्धतीने काही वर्ष राहिले. १९५३ साली जोसेफ stalin यांचं निधन झालं, त्यावेळी बोस यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र लिहिल्याचेही नमूद आहे आणि ते पत्र national archives मध्ये आहे, असंही सांगितलं जात. अजून एक गोष्ट म्हणजे त्यावेळचे ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी बोस यांच्यावर शूट at साईटची ऑर्डर दिली होती. म्हणजे बोस जिथे दिसतील, तिथे त्यांना मारून टाका, इतकी बोस यांची ब्रिटनला भीती होती आणि चर्चिल असंही म्हणाले होते की, तो माणूस अजूनही जिवंत आहे.(Subhas Chandra Bose)
आता बोस आपली identity का दाखवू शकत नव्हते, तर एक म्हणजे जिओपोलिटिकल प्रेशर आणि दुसर म्हणजे त्यांना war क्रिमिनल declare केलं जाऊ शकत होत. बोस यांचं म्हणणं होत की, माझ्यामुळे आजाद हिंद फौजची इतर लोकंही धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे ते कधीच सर्वांसमोर आले नाहीत. आता घटनाक्रम पाहुया, १९४५ साली सुभाषचंद्र बोस यांचा कथित मृत्यू, १९४७ रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, १९५३ साली Stalin यांचं निधन, आणि त्यानंतर सुरुवात झाली एका गूढ व्यक्तिमत्त्वाची, ज्यांचं नाव होत, गुमनामी बाबा !
काही लोकं या गुमनामी बाबांना साधूच मानत होते, तर काही लोकं त्यांना खुद्द सुभाषचंद्र बोसच मानत होते, रिपोर्ट्सनुसार सुभाषचंद्र बोस नंतर भारतात आले होते पण आपली ओळख पूर्णपणे लपवून ते साधू झाले होते. नाव-गाव कोणाला माहित नव्हत, त्यामुळे गुमनामी बाबा हेच नाव त्यांना पडलं. उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी त्यांनी प्रवास केला आणि वास्तव्य केलं. सर्वात आधी १९५५ साली ते निमसर इथल्या शृंगार नगरमध्ये राहिले. १९५८ मध्ये शिबाला, १९५८ ते १९६४ दरम्यान बसती नावाच्या गावात राहिले. १९६४ ते १९६७ मध्ये ते अयोध्येतील शंकर निवास… १९६७ ते १९७४ राजा मैदान… १९७४ ते ८३ गुरुद्वारा ब्रम्हकुंड आणि १९८३ ते १९८५ दरम्यान ते अयोध्येतील राम भवन इथे राहिले. कोणाला आपल्याबद्दल थोडीही शंका आली, की ते दुसरीकडे निघून जायचे. महत्त्वाच म्हणजे त्यांच्या INA मेंबर्सना त्यांची माहिती होती, मात्र सगळ्या गोष्टी गुपित पद्धतीनेच सुरु होत्या. डॉ. बनर्जी आणि दशरथ सिंग तोमर या दोन डॉक्टरांनी त्यांची होमिओपेथी ट्रिटमेंट केली होती.(Subhas Chandra Bose)
या गुमनामी बाबांकडे २४ पेटारे होते. यामध्ये त्यांच्या वस्तू, पुस्तकं, पत्र, न्यूजपेपर्स अशा सगळ्या गोष्टी होत्या. गुमनामी बाबा बंगालीसोबत ऊर्दू, रशियन, हिंदी आणि इंग्लिश या भाषादेखील बोलत होते. जे सामान त्यांच्या पेटाऱ्यातून मिळालं होत, त्यामध्ये कोलकातामधील प्रत्येक वर्षी २३ जानेवारीला साजरा केल्या जाणाऱ्या नेताजींच्या जयंतीचे फोटोसुद्धा होते. बोस यांच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी मासिकात छापून आल्या होत्या ते मासिकसुद्धा होते. बंगालच्या नेत्या लीली रॉय यांच्या मृत्यूवेळी झालेल्या शोक सभांचे फोटो होते. नेताजींसारखेच काही चष्मे सुद्धा होते.(Marathi News)
विशेष म्हणजे महात्मा गांधी आणि बोस एकाच ठिकाणाहून आपले चष्मे बनवून घेत होते आणि गुमनामी बाबा यांचाही चष्मा तिथलाच होता. गुमनामी बाबा हे चेन स्मोकर होते. सुभाषचंद्र बोससुद्धा सिगार ओढायचे. त्यांच्या पेटाऱ्यात ५५५ सिगरेट आणि परदेशी दारु सुद्धा मिळाली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या आई-वडिलांचे आणि इतर कुटुंबियांचे फोटो सुद्धा होते. आईवडिलांच्या फोटोची ते पूजासुद्धा करायचे. याशिवाय एक रोलेक्स घड्याळ, २ ओमेगा घड्याळ आणि आजाद हिंद फौज सेनेचा एक युनिफॉर्म जर्मन binaculors, दुसऱ्या महायुद्धाचे २ चे वाटर फिल्टर्स…
आता प्रश्न असा पडतो की एक बाबा किंवा संत इतक्या सगळ्या वस्तू आणि खासकरून सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत गोष्टी का होत्या ? आता हे त्यांच्या वस्तूंबद्दल झालं. त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीतही दोन महत्त्वाचे प्रसंग सांगितले जातात. अतुल सेन, पवित्र मोहन रॉय, लीला रॉय, समर गुहा, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, क्रांतिकारी दिनेशचंद्र गुप्ता, डॉ. सम्पूर्णानंद , मा आनंदमयी और माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह अशा अनेकांनी त्याकाळी गुमनामी बाबा यांची भेट घेतल्याचे उल्लेख आहेत.(Subhas Chandra Bose)
सुनील गुप्तो नेताजींच्या अगदी जवळपास माणूस… नेताजींच्या कथित मृत्यूनंतर बोस यांचे मोठे बंधू सुरेशचंद्र बोस यांच्या सांगण्यावरून त्यांनीही गुमनामी बाबा यांची भेट घेतली होती. यावेळी सुनील गुप्तो यांना कळलं होत की हे बोसच आहेत आणि त्यांनी येऊन ही गोष्ट सुरेशचंद्र बोस यांच्याकडे कन्फर्म करून घेतली. पण काही कारणास्तव त्यांची ओळख उघड करू शकत नसल्यामुळे सुरेशचंद्र बोस यांनी पुन्हा सुनील गुप्तो यांना सुभाषचंद्र बोस यांची त्यांच्या वाढदिवशी भेट घेतली होती. यावेळी त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू सोबत त्यांची आवडते हिलसा मच्छीसुद्धा पाठवण्यात आली होती. या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या होत्या.(Subhas Chandra Bose)
गुमनामी बाबांचं अक्षर सुद्धा सेम बोस यांच्यासारखच होतं. याबद्दलचा एक प्रसंग असा की, सुरेशचंद्र बोस यांची मुलगी म्हणजे ललिता बोस या गुमनामी बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या अयोध्या येथील राम भवनमध्ये आल्या होत्या. याठिकाणी त्यांना एक पत्र मिळालं होत. हे पत्र ललिता यांच्या आईंनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलं होत. यावेळी ललिता यांनी आपल्या आईचं अक्षरसुद्धा ओळखलं होत. या पत्रात त्यांनी शेवटी लिहिलं होत, मेरे प्रिय देवर को बहुत आशीर्वाद… शुभी ! हे शुभी त्या लाडाने सुभाषचंद्र बोस यांनाच म्हणत होत्या.(Marathi News)
================
हे देखील वाचा : Sanjay Gandhi : संजय गांधी यांना आणीबाणीचे खलनायक का बोललं जातं ?
================
१९८५ साली या गुमनामी बाबांचं अयोध्येत निधन झालं. १६ ऑगस्ट ला त्यांचं निधन झालं पण त्यांना अग्नी दिला गेला १८ ऑगस्टला… याचं कारण म्हणजे INA ची १३ माणसं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येणार होती. ही तीच त्यांच्या जवळची आणि प्रमुख १३ माणसं आहेत, जी दुर्गा पूजा आणि बोस यांच्या वाढदिवसाला गुमनामी बाबा यांची भेट घेत होते. गुमनामी बाबा यांचे अंत्यसंस्कारसुद्धा अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आले होते. त्यांची भेटसुद्धा ठराविक लोकच घेऊ शकत होते, त्यामुळे त्यांचा फोटो आपल्याला मिळत नाही. केवळ हाच त्यांचा काल्पनिक फोटो वापरला जातो.
आता अजून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे, जपानमध्ये त्यांच्या अस्थी आहेत. इथल्या रेन्कोजी टेम्पलमध्ये या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. अनेक भारतीय व्यक्तिमत्त्वांनी याठिकाणी भेटसुद्धा दिली आहे. पण या अस्थी बोस यांच्या नसून त्या इचीरो ओकुरा नावाच्या जपानी सैनिकाच्या असल्याचं म्हटलं जात. महत्त्वाचं म्हणजे या अस्थींचं अजूनही DNA टेस्ट केलं गेलं नाही. त्यामुळे हा एक मोठा वाद आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या गूढरीत्या झालेल्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी ती कमिशन बसवण्यात आले होते. एक म्हणजे शाहनवाज कमिटी, दुसरं खोसला कमिशन आणि तिसरं मुखर्जी कमिशन…(Subhas Chandra Bose) त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीकोनातून जाणून घ्यायचं झालं तर आजपर्यंत सर्वांनी गुमनामी बाबा हेच सुभाषचंद्र बोस होते, हे मान्य केलच नाही. अपवाद त्यांचे मोठे बंधू सुरेशचंद्र बोस ! सुरेशचंद्र बोस हे शाहनवाज कमिटीमध्ये होते आणि सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत या गोष्टीवर ठाम होते. सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनीही गुमनामी बाबा थियरी अमान्य केली आहे आणि त्यांचं निधन प्लेन crash मध्येच झाला, अशा ते म्हणतात. मुळात खर-खोट हे सगळ आपल्या डोळ्यांसमोर असतं. पण त्याला योग्यरीत्या मांडण्याची जबाबदारी आपली असते. वरती जी माहिती मी तुम्हाला सांगितली ही सगळी सुभाषचंद्र बोस यांच्यावर उपलब्ध असलेली पुस्तकं, संदर्भ, रिपोर्ट्सच्या आधारावर होती. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू, गुमनामी बाबा यांचं सत्य… या सगळ्या गोष्टी अजूनही गूढच आहेत. यावर अजूनही अनेक इतिहास संशोधक, पत्रकार आणि अभ्यासकांचं संशोधन सुरूच आहे. पण भविष्यात इतिहास कधीतरी या महान व्यक्तिमत्त्वाच्या रहस्याचा उलगडा करेल, असं वाटत.