Home » Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !

Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !

by Team Gajawaja
0 comment
Trump And Musk
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली आहेत. त्यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी ट्रान्सजेंडर संदर्भातील जो बिडेन सरकारनं घेतलेले सर्वच निर्णय बदलले आहेत. या निर्णयावर टिका होत असली तरी हा निर्णय झाल्यावर नाचून आनंद व्यक्त केला आहे तो एलॉन मस्क यांनी. ट्रम्प यांचे सर्वात जवळचे सहकारी म्हणून एक्सची सीईओ एलॉन मस्क यांची ओळख आहे. मात्र काही वर्षापूर्वी ट्रम्प आणि मस्क हे कट्टर विरोधक होते, हे सांगूनही खरे वाटणार नाही. ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर टिका करतांना लोकांना उपयोगी नसणा-या वस्तू बनवणारा उद्योगपती अशी ट्रम्प यांच्यावर टिका केली होती. मस्क यांनीही ट्रम्प यांच्याविरोधात भूमिका घेत जो बिडेन हे चांगले नेते असल्याचे आणि आपण त्यानांच मतदान केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र या दोन टोकाची मते असणा-यांमध्ये समेट कसा झाला याचे कोडे अनेकांना आहे. यासाठी कारणीभूत ठरला तो मस्क यांचा मुलगा. मस्क यांच्या तरुण मुलाने कोविड काळात आपले लिंग बदलून मुलगी होणे पसंत केले. (Trump And Musk) 

हा मस्क यांना मोठा धक्का होता. आपल्या मुलात कोणतीही कमतरता नव्हती. पण अमेरिकेमधील ट्रान्सजेंडर चऴवळ त्याच्या या लिंग बदलास कारणीभूत ठरली असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी जो बिडेन सरकारकडे दादही मागितली. मात्र बिडेन यांनी यावर काहीच कारवाई न करता, उलट ज्यांना आपले लिंग बदलायचे आहे, त्यांना सरकारी मदत देण्यास सुरुवात केली. ही मस्क यांना मोठा धक्का होता. आपल्या मुलाला मुलगी रुपात भेटायला त्यांनी नकार दिला. तसेच आपल्यासाठी आता त्याचे अस्तित्व संपल्याचे जाहीर केले. शिवाय या ट्रान्सजेंडर विचारसरणीबरोबर लढा देण्याचे जाहीर केले. फक्त जाहीरच केले नाही तर आपले कट्टर विरोधक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांनी भेट घेतली. ट्रम्प यांचीही मते मस्क यांच्यासारखीच आहेत. त्यामुळे या दोघांमधील तणाव संपला आणि वैचारिकदृष्ट्या हे दोघंही एकत्र आले. त्यापासूनच ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयाची गाथा सुरु झाली. (International News) 

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प “मेक अमेरिका ग्रेट अगेन” ही घोषणा दिली. या विजयात त्यांना एलॉन मस्क यांचा मोठा आधार मिळाला आहे. त्याबद्दल जाहीर भाषणात त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. आपल्याकडे एक तारा जन्माला आला आहे; तो एक अद्भुत व्यक्ती आहे, अशा शब्दात त्यांनी एलॉन मस्क यांचा सन्मान केला. या एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या विजयात आपली सर्व ताकद खर्च केली ती त्यांच्या मुलगी झालेल्या मुलामुळे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांचा मुलगा झेवियर याने जून 2022 मध्ये आपले लिंग बदलले आणि तो मुलगी झाला. 18 वर्षाच्या झेवियरनं मुलगी झाल्यावर विवियन हे नाव धारण केले. मुलगी झाल्यावर विवियननं आपल्याला आपल्या वडिलांसोबत कसलेच संबंध ठेवायचे नाहीत हे जाहीर केले. मस्क यांनाही हा मोठा धक्का होता. (Trump And Musk) 

==================

हे देखील वाचा :   Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?

AndhraPradesh Temple : नंदीच्या मूर्तीमुळे कलियुगाचा अंत?

==================

त्यांनी विवियनचा स्विकार करायला नकार दिला, तसेच आपल्याला झेवियर नावाचा मुलगा होता. पण त्याचा मृत्यू झाला आहे, हे जाहीर केले. पण यामागे एक वडिल म्हणून असलेली वेदना जाहीर करायलाही मस्क विसरले नाहीत. त्यांच्या मते त्यांच्या मुलामध्ये कसलीच कमतरता नव्हती. मात्र अमेरिकेमध्ये असलेल्या वेक माइंड चळवळीमुळे त्यानं लिंग बदलण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांना मुलगी किंवा मुलीला मुलगा बनवण्यासाठी ही चळवळ काम करत असल्याचा आरोपही मस्क यांनी केला. याबाबत तत्कालीन जो बिडेन सरकारही गप्प होते. शिवाय ज्या मुलांना आपले लिंग बदलायचे आहे, त्यांना ऑपरेशनसाठी सरकारी मदतही देण्यात येत होती. त्यामुळे चिडलेल्या मस्क यांनी वेक माइंड विचारसरणीला संपवण्याची प्रतिज्ञा केली. लिंग बदल शस्त्रक्रियेने आपल्या मुलाची हत्या केली असे जाहीर करत त्यांनी मुलगी झालेल्या विवियन सोबत सर्व संबंध तोडून टाकले. त्या काळात कोविडची महामारी होती. याचवेळी झेवियरनं लिंग बदलून ऑपरेशन केले. त्यासाठी वडिलांची सही त्यांनी फसवून घेतल्याचे मस्क यांनी सांगितले. (International News) 

==================

हे देखील वाचा :   Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?

Donald Trump : WHO ला टाटा आणि बरंच काही !

==================

या सर्व चळवळीबाबत मस्क यांनी आपली नाराजी कधीही लपवून ठेवली नाही. एक्सच्या माध्यमातून त्यांनी याबाबत जाहीरपणे आवाज उठवण्याचे आव्हान केले. मस्क यांना अमेरिकेतील अनेक पालकांचा पाठिंबा मिळाला. त्यांच्याही मुलांनी आपले लिंग बदलून मुलगी किंवा मुलगा होणे पसंत केले होते. या सर्व पालकांच्या मते यासाठी लिंग बदल चळवळ कारणीभूत आहे, आणि सरकारनं त्यावर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र बिडेन यांनी या चळवळीला कधीही विरोध केला नाही. परिणामी एलॉन मस्क हे ट्रम्प यांच्या जवळ गेले. त्यानंतर या दोघांमधील संघर्ष कमी झाला. दोघांचीही विचारसरणी आक्रमक, निर्णयक्षमता, आणि धडाडीचे नेतृत्वगुण त्यामुळे हे दोघेही लवकरच पक्के मित्र झाले. म्हणूनच ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यावर ट्रम्प यांनी स्टेजवर नाचून आपला आनंद व्यक्त केला. विवियन ही आता अमेरिकेतून बाहेर पडल्याची माहिती आहे. तर ट्रम्प यांनी लिंग बदलून ज्यांनी नोकरी मिळवली आहे, त्या सर्वांना इशारा दिला आहे. (Trump And Musk) 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.