Home » Sanjay Gandhi : संजय गांधी यांना आणीबाणीचे खलनायक का बोललं जातं ?

Sanjay Gandhi : संजय गांधी यांना आणीबाणीचे खलनायक का बोललं जातं ?

by Team Gajawaja
0 comment
Sanjay Gandhi
Share

साल 1980, जूनचा महिना होता. तेव्हा दिल्ली फ्लाइंग क्लबमध्ये एक नवीन विमान आलं होतं. पिट्स एस 2 ए हे खूप हलकं विमान होतं, ज्यामध्ये दोनच सीट्स होत्या. हवेमध्ये उलटं सुलटं होऊन सुसाट फिरण्यासाठी हे विमान होतं. हे विमान नवीन आलं होतं, म्हणून त्यासाठी एक warning सुद्धा होती. प्रोफेशनल पायलट्सशिवाय कोणीही हे विमान उडवू नये. पण 23 जूनच्या दिवशी एका माणसासाठी तो प्रोफेशनल पायलट नव्हता पण त्याच्याकडे pilot’s licence होतं अशा माणसांसाठी विमान ranway वर उतरवण्यात आलं होतं. विमान उडवण्यासाठी warning असून सुद्धा त्या माणसाला कोणीही अडवू शकत नव्हतं. तो माणूस विमान उडवण्यासाठी बसला आणि सोबत एक आणखी पायलट मागे बसला. विमान उडालही, पण थोडं उलट सुलट फिरल्यानंतर ते जमिनीवर कोसळलं. काही मिनिटांतच त्या ठिकाणी एम्ब्युलन्स पोहचली त्या क्रॅश झालेल्या विमानातून 2 मृतदेह काढण्यात आले. आता तिथे गाड्यांच्या सायरनचा आवाज घुमू लागला. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी स्वत: तिथे आल्या होत्या, कारण त्या दोन मृतदेहांपैकी एक हा इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांचा होता. संजय गांधी असे नेते, जे देशात आणीबाणी लागू करण्यापासून आणीबाणीमध्ये लोकांची नसबंदी करण्यापर्यंत तेच जबाबदार होते, असं बोललं जातं. त्यांच्याबद्दलचेच काही इंटरेस्टिंग किस्से जाणून घेऊ. (Sanjay Gandhi)

संजय गांधीच्या किस्स्यांची गोष्ट सुरु करूया त्यांच्या घरातील एका किस्स्यांपासून, ज्याचा उल्लेख आता आलेल्या emergency मूवी मध्ये सुद्धा आहे. शिवाय विनोद मेहता यांनी लिहिलेल्या द संजय स्टोरीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. संजय गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी ब्रेकफास्ट करण्यासाठी बसले होते. त्यावेळी तिथे इंदिरा गांधींचे काका बी.के नेहरू आणि त्यांची पत्नी फिरोरी गांधी सुद्धा उपस्थित होते. सगळं नॉर्मल होतं आणि अचानक संजय गांधींनी उठून स्वत: समोर वाढलेलं ताट फेकून दिलं आणि स्वत:च्या खोलीच्या दिशेने निघून गेले. तेव्हा सगळे शॉक होते. त्यांनी ताट फेकलं त्याचं कारण होतं त्यांना हवं होतं तसं ते अंड शिजलं नव्हतं. तेव्हा इंदिरा गांधी सुद्धा शांतच बसल्या होत्या. यावरूनच संजय गांधी किती आक्रमक स्वभावाचे होते हे कळतं.(Sanjay Gandhi)

१९७१ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी नियमांंविरुद्ध जाऊन सरकारी संसाधनांचा वापर केला होता, ज्यामुळे त्यांच्या निवडणुकीला न्यायालयाने अवैध ठरवलं. कोर्टाने इंदिरा गांधींनी निवडणुकीत अपात्र ठरवलं आणि त्यांच्या संसद सदस्यत्वाला स्थगिती दिली. त्या शिवाय जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी सरकार विरोधात देशभर आंदोलन सुरू होतं. १२ जून १९७५, पीएम इंदिरा गांधी आपल्या सल्लागार डीपी धर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीयांना सांत्वना देऊन ऑफिसमध्ये परतल्या होत्या. तेव्हा राजीव गांधी हे एक कागद घेऊय त्यांच्या जवळ आले. त्यांना कोर्टाचा निर्णय सांगितला. पण त्या काही बोलल्या नाहीत. इंदिरा गांधीं तेव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत होत्या, पण संजय गांधींनी त्यांना तो देऊ दिला नाही. जेवियर मोरो यांनी लिहिलेल्या द रेड साडी या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की, इंदिरा राजीनामा देऊ इच्छित होत्या, पण त्यावेळी संजय आले आणि त्यांना तसे करण्यापासून रोखले. संजय त्यांना सांगितले, ‘जर तुम्ही राजीनामा दिलात, तर विरोधक तुम्हाला तुमचं जेलमध्ये जाणं सुनिश्चित करतील.’ इंदिराजींना संजय यांच म्हणणं पटलं. आणि त्यांनी राजीनामा दिला नाही.(Political News)

नंतर मग पुढचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. भारतात आणीबाणी लागू झाली आणि भारताच्या इतिहासातील काळ्या अध्यायाला सुरुवात झाली. या काळात संजय गांधी कोणत्याही सरकारी पदाशिवाय सरकार चालवत होते. इंदिरा गांधीच्या विरोधात बातम्या छापू नयेत, म्हणून संजय गांधींनी देशातील सर्व वृत्तपत्रांचा वीज पुरवठा थांबवला. तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्री हे इंदर कुमार गुजराल हे होते. संजय गांधी यांनी तेव्हा त्यांना सांगितलं की “ सर्व न्यूज बुलेटिन प्रसारित होण्यापूर्वी त्यांना दाखवलं गेलं पाहिजे.” यावर गुजराल म्हणाले “हे शक्य नाही.” त्यावर संजय गांधी यांनी त्यांच्यावर आवाज चढवला. तेव्हा ते संजय गांधी यांना “आवाज उठवू नका. माझ्या मंत्रालयाच्या फाइलमधील कोणतेही साहित्य तुम्हाला पाठवले जाणार नाही.” असं प्रतिउत्तर देऊन ते तिथून निघून गेले. पुढे गुजराल यांच्यावर दबाव वाढला आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ही
तर आणीबाणीची सुरुवात होती.(Sanjay Gandhi)

या काळात संजय गांधी हे दिल्लीच्या तुर्कमान गेट परिसराला भेट देण्यासाठी गेले होते. हा परिसर मुस्लिम बहुल आणि झोपडपट्ट्यांनी भरलेला होता. तेव्हा संजय गांधींना जामा मशिदीपर्यंत पोहचण्यासाठी या झोपडपट्ट्यांमधून जावं लागलं. तेव्हा संजय गांधींनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष जगमोहन यांना हा परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. संजय गांधींच्या स्वच्छतेचा अर्थ त्यांना कळाला होता. त्या काळात संजय गांधीना कोणीच नाही म्हणत नव्हतं. मग काय दुसऱ्याच दिवशी झोपडपट्ट्यांसमोर बुलडोझर तैनात करण्यात आले आणि झोपडपट्टी हटवण्यास सुरुवात झाली. लोकांना जबरदस्तीने घरं सोडायला लावलं जात होतं. यामुळे तुर्कमान गेट, जामा मशीद आणि चांदणी चौकच्या परिसरातील लोक नाराज होते. याचवेळी नसबंदीसाठी लोकांना पकडून पकडून नेलं जात होतं.(Sanjay Gandhi)

संजय गांधी वाढत्या लोकसंख्येला देशाच्या प्रमुख समस्यांपैकी एक मानत होते. त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिले की सख्तपणे नसबंदी मोहीम राबवली जावी. याचाच परिणाम असा झाला की ही योजना खूपच जबरदस्तीने राबवण्यात आली. संपूर्ण देशभर नसबंदीसाठी धरपकड मोहीम सुरू झाली. त्यावेळी संजय गांधींचा दबदबा इतका वाढला होता की, सर्व नेते मंत्री त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होते. असं बोललं जात की तेव्हा नसबंदी मोहिमेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वत:चा पगार मिळवण्यासाठी डॉक्टरांची शस्त्र साधन दाखवून किती शस्त्रक्रिया केल्या याचा दाखला द्यावा लागायचा. ट्रक ड्रायवर्संना तर license renew करण्यासाठी नसबंदीचं प्रमाणपत्र दाखवाव लागायचं. पुढे इंदिरा गांधींनी ही नसबंदी मोहीम बंद केली. नसबंदी या मोहिमेमध्ये जवळ जवळ १ कोटी लोकांची नसबंदी करण्यात आली, असं बोललं जातं. यामुळे जनतेचा रोष काँग्रेस विरुद्ध मोठ्या प्रमाणात वाढला होता.(Political News)

==============

हे देखील वाचा : Shriram प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वातील ‘हे’ गुण प्रत्येक व्यक्तीने अंगिकारलेच पाहिजे

==============

अखेर इंदिरा गांधींनी संजय गांधीच्या इच्छेविरुद्ध आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेतला. १९७७ मध्ये त्यांनी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. जनतेच्या रोषामुळे काँग्रेसचा या निवडणुकीत पराभव झाला. पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या संजय गांधींचा सुद्धा यात पराभव झाला. जनता पक्ष आणि अनेक वेगवेगळ्या पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली, आणि मोरोरजी देसाई पंतप्रधान झाले. काँग्रेसचा तो सर्वात वाईट काळ होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पराभूत झाला होता.(Political News)

पण तो काळ जास्त काळ टिकला नाही, आणीबाणीच्या अवघ्या तीन वर्षांनंतर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीची कमान संजय गांधीच्याच हाती होती. त्यांनीच तिकीटं वाटली, प्रचार केला. संजय गांधींचा दबदबा पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता. इंदिरा गांधींनंतर काँग्रेसमध्ये तेच सर्वात पॉवरफूल नेते आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी सुद्धा तेच आहेत, असं बोललं जायचं.

पण २३ जून १९८० साली तो विमान अपघात झाला आणि पंतप्रधान निवासस्थानापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर त्यांचं विमान कोसळलं. ज्यात संजय गांधींचा मृत्यू झाला.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.