Home » ShriRam तुम्हाला माहित आहे का भारतातील ‘ही’ प्रसिद्ध प्रभू रामाची मंदिरं

ShriRam तुम्हाला माहित आहे का भारतातील ‘ही’ प्रसिद्ध प्रभू रामाची मंदिरं

by Jyotsna Kulkarni
0 comment
ShriRam
Share

अयोध्यामध्ये राम मंदिर (Ayodha Ram Madir) बांधून त्यात रामलल्लाची स्थापना होऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. आजच्या दिवशी २०२४ साली संपूर्ण हिंदू धर्मीय लोकांचे सर्वात मोठे स्वप्न सत्यात उतरले. श्रीराम आपल्या सर्व हिंदू लोकांसाठी दैवत आहे. १०० वर्षांहून जास्त काळ झोपडीमध्ये काढलेल्या श्रीरामांना अखेर त्यांचे स्थान मिळाले. अतिशय जल्लोषात आणि उत्साहात प्रभू श्रीरामांची स्थापना करण्यात आली होती. संपूर्ण देशाने किंबहुना जगाने हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहिला. (ShriRam)

आपल्या संपूर्ण भारतामध्ये श्रीरामांची अनेक महत्वाची आणि मोठी मंदिरं आहेत. मात्र अयोध्येमधील राम मंदिराचे महत्व वेगळेच आहे. जिथे प्रभूंचा जन्म झाला अशा अयोध्येमध्ये राम मंदिर असावे हे स्वप्न सत्यात आले. आज या ऐतिहासिक घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना आपण देशातील महत्वाची आणि ऐतिहासिक राम मंदिरं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत.

काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र (KalaRam Mandir)
काळाराम हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी परिसरात आहे. मान्यतेनुसार हे मंदिर श्रीरामांनी त्यांच्या वनवास काळात जिथे सर्वात जास्त वास्तव्य केले त्याच ठिकाणी आहे. १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे काळ्या दगडातील अतिशय सुंदर आणि रेखीव मंदिर बांधले होते. या मंदिरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणापासून बनवलेल्या २ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे मोठे आकर्षण म्हणजे मुख्य मंदिरात हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसून येत नाही. ती समोर आलेल्या एका मंदिरात आहे. या मंदिराची रचना अशी आहे जिथून हनुमान समोरून श्रीरामांचे दर्शन घेत असल्याचा भास आपल्याला होतो.

ShriRam

रामराजा मंदिर, मध्य प्रदेश (ShriRamraja Mandir)
मध्य प्रदेशातील ओरछा येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही श्रीरामांची मोठी भक्त होती. असे म्हणतात की, तिने त्यांना अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. रामराजा मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे प्रभू रामाला दररोज चार वेळा बंदुकीची सलामी (गार्ड ऑफ ऑनर) दिली जाते.

ShriRam

रामास्वामी मंदिर, तामिळनाडू (RamaSwami Mandir)
हे मंदिर ४०० वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम, तामिळनाडू येथे बांधले होते. या मंदिरात रामायणाची झलकही पाहायला मिळते. गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या दिसतात. शत्रुघ्न आणि भरत यांच्यासह राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती मंदिरात आहेत. प्रभू रामाच्या डाव्या बाजूला शत्रुघ्न हातात पंखा धरलेला दिसतो, तर भरत शाही छत्र धरलेला दिसतो आणि उजव्या बाजूला हनुमान दिसतो.

ShriRam

 

सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा (Seeta Ramchandra Swami Mandir)
भारतात हे राम मंदिर खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे मंदिर भद्राचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मान्यता आहे की, वनवासाच्या काळात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण भद्राचलमपासून ३५ किमी दूर पर्णशाला येथे राहिले. सीतेला वाचवण्यासाठी श्रीलंकेला जात असताना भगवान रामाने गोदावरी नदी ओलांडली होती. त्याच ठिकाणी नदीच्या उत्तरेला भद्राचलम मंदिर आहे.

ShriRam

त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ (Thriprayar Sree Ramaswami Temple)
हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. तेथे भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत. भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा त्यांचा देह ठेवला तेव्हा या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. नंतर ही मूर्ती काही मच्छिमारांना सापडली आणि त्यांनी ती केरळच्या चेट्टुवा भागात स्थापित केली गोली. या मंदिरात रामाची मूर्ती चार हातांनी शंख, चक्र, धनुष्य आणि माला धारण केलेली दिसते.

ShriRam

राम मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा (Rammandir Bhuvneshwar)
हे मंदिर भुवनेश्वरच्या खारावेला नगरजवळ आहे. शहराच्या मध्यभागी स्थित मंदिर हे भगवान रामाच्या भक्तांसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत, या मंदिर परिसरात हनुमान, शंकर आणि इतर देवतांची मंदिरं देखील आहेत.

ShriRam

कोदंडराम मंदिर, कर्नाटक (Kodandram Mandir)
हे मंदिर कर्नाटकातील हिरेमागलूर येथे आहे, जे चिकमंगळूर जिल्ह्यात येते. या मंदिराला कोदंडराम असे नाव पडले आहे, कारण येथे भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या धनुष्य आणि बाणांसह दाखवले गेले आहेत आणि भगवान रामाचे धनुष्य कोदंड म्हणून ओळखले जाते. गर्भगृहात हनुमान चौकीवर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. सर्वत्र रामाच्या डाव्या बाजूला सीता दिसत असली तरी या मंदिरात सीता रामाच्या उजव्या बाजूला आहे. असे मानले जाते की, एका भक्त पुरुषोत्तमने भगवान राम आणि सीता यांचा विवाह पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. पारंपारिक हिंदू विवाहादरम्यान वधू वराच्या उजव्या बाजूला बसते.

ShriRam

श्री राम तीरथ मंदिर, अमृतसर( ShriRam Tirath)
हे मंदिर अमृतसरच्या पश्चिमेला १२ किलोमीटरवर चोगवान रोडवर आहे. याच ठिकाणी सीता मातेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता. आणि येथेच तिने लव आणि कुशला जन्म दिला. येथे पायऱ्या असलेली एक विहीर देखील आहे, जिथे देवी सीता स्नान करत असे.

ShriRam

==============

हे देखील वाचा : Shriram प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वातील ‘हे’ गुण प्रत्येक व्यक्तीने अंगिकारलेच पाहिजे

Ram Mandir स्वप्नपूर्तीची एकवर्ष : जाणून घ्या अयोध्या राममंदिराबद्दल खास माहिती

==============

रघुनाथ मंदिर, जम्मू (Raghunath Mandir)
जम्मूच्या या मंदिरात सात मंदिरे आहेत. हे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे. हे मंदिर महाराजा गुलाब सिंग आणि त्यांचे पुत्र महाराज रणबीर सिंग यांनी १८५३-१८६० या काळात बांधले होते. मंदिरात अनेक देवता आहेत, पण मुख्य देवता राम आहे, जो भगवान विष्णूचा अवतार आहे.

ShriRam


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.