Home » Shriram प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वातील ‘हे’ गुण प्रत्येक व्यक्तीने अंगिकारलेच पाहिजे

Shriram प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिमत्वातील ‘हे’ गुण प्रत्येक व्यक्तीने अंगिकारलेच पाहिजे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shriram
Share

अनेक दशकं सर्वच हिंदू धर्मीय लोकांनी एकच स्वप्न पाहिले होते आणि ते म्हणजे रामजन्म भूमी अर्थात अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे. अखेर ते स्वप्न मागच्या वर्षी पूर्ण झाले आणि २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येमधील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची मूर्ती स्थापित झाली. या दिवसामुळे अनेक वर्षांनी अयोध्येमध्ये तंबूमध्ये नाही तर मंदिरामध्ये श्रीराम यांची स्थापना करण्यात आली. उद्या या ऐतिहासिक दिवसाला एक वर्ष पूर्ण होत आहे. (Shriram)

आपल्या सर्व हिंदू धर्मीय लोकांसाठी श्रीराम म्हणजे आपले दैवत आहे. श्रीरामांनी आपल्या आचरणातून संपूर्ण समाजाला आपण कसे वागले पाहिजे याचे धडे दिले. त्यांचे संपूर्ण जीवनच एक शिकवण होती. नित्सिम मातृ आणि पितृ भक्तीचे उदाहरण म्हणजे श्रीराम, आदर्श राजा म्हणजे श्रीराम, आदर्श भाऊ म्हणजे श्रीराम. आपल्याकडे नेहमीच असे म्हटले जाते की, ‘मुलगा असेल तर रामसारखा’, चारित्र्य असावे तर ते रामासारखे’. असे म्हणण्यामागे देखील एक कारण आहे. ते म्हणजे प्रत्येकाचीच अपेक्षा आहे की, आपला मुलगा, नवरा, हा श्रीरामांसारखा आदर्श असावा. (Quality of Shriram)

श्रीराम हा महाविष्णूचा अवतार मानला जातो. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन आदर्श पुरुष आणि मर्यादा पुरुषोत्तम असे केले आहे. त्यांनी केवळ आपल्या वडिलांचे वचन राखण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता १४ वर्ष वनवासाला होकार दिला आणि संपूर्ण राज्यपाट त्यागून ते वैरागी झाले. एकूणच काय तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व नाती ही अतिशय प्रामाणिकपणे आणि आदर्श पद्धतीने निभावली. (Marathi Top News)

श्रीराम यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच आदर्श होते. त्यातच्यात असणारा एकही गुण चुकीचा किंवा वाईट नव्हता. त्यांचे सगळेच गुण आपण सर्वानी अंगिकारले पाहिजे. मात्र त्यातही आज आपण जाणून घेऊया श्रीराम यांच्या व्यक्तिमत्वामधील असे काही महत्वाचे आदर्श गुण जे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणात आणलेच पाहिजे. (Lord Rama)

Shriram

​सहनशीलता आणि संयम
भगवान श्रीरामांचा सर्वात महत्वाचा आणि अतिशय मोठा गुण म्हणजे त्यांची सहनशीलता आणि त्यांचा संयम. १४ वर्षांचा वनवास असो किंवा वनवसानंतर केलेला माता सीतेचा त्याग करून राजा असूनही संन्यासीसारखे जीवन जगणे असो श्रीरामांनी कायमच आपले जीवन आणि कर्तव्य संयमाने आणि संयमाने पूर्ण केले. अतिशय मोठा राजा असूनही त्यांनी कायम संयम बाळगला.

​आदर्श मुलगा
आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते की आपल्याला देखील रामसारखा मुलगा असावा. याचे कारण त्यांच्यातला गुणच आहे. त्यांनी कायम आपल्या आई आणि वडिलांना अग्रस्थानी ठेवले. आपल्या तिन्ही आयांमध्ये त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. वडिलांचे वचन खरे करण्यासाठी त्यांनी राजपाट सोडायचा निर्णय एका क्षणात घेतला. (God Ram)

त्यागाची भावना
श्रीमाणॆ वडिलांचे वचन राखण्यासाठी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला होता. एवढावता थाट, आलिशान आणि आरामदायी जीवन सोडून त्यांनी वनवास स्वीकारला. यासाठी त्यांनी कोणताही विचार केला नाही. किंवा त्यांना भीती देखील वाटली नाही. त्यांनी भरतसाठी राज्याचा आणि सोबतच सर्वच सुखांचा त्याग केला. (Ayodha Ram Mandir )

असत्याविरुद्ध लढा
श्रीरामांनी कायम आसुरी शक्तींचा नाश करून धर्माचे, समाजाचे आणि लोकांचे रक्षण केले. त्यांनी कायम असत्याला विरोध केला. अगदी बालपणापासूनच त्यांनी असत्य गोष्टींना आणि वाईट शक्तींना विरोध केला आणि त्यांचा नायनाट केला.

शांत आणि नम्रता
श्रीराम हे कायम शांत आणि नम्र होते. त्यांना १४ वर्षांचा वनवास सांगितला तेव्हा देखील ते शांत होते, त्यांनी शिवधनुष्य तोडले आणि सीता त्यांची धर्मपत्नी झाली तेव्हा देखील ते शांतच होते. जेव्हा त्यांनी रावणाचा वध केला तेव्हा सुद्धा ते शांतच होते. त्यांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये केवळ स्वतःला शांत ठेवले. रावणाचा वध केल्यानंतर ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला नमस्कार करत म्हटले होते की, जगातील सर्वात हुशार आणि ज्ञानी व्यक्तीला माझा नमस्कार.

==============

हे देखील वाचा : Mahakumbhmela महाकुंभमेळ्यासाठी जाताय मग ‘हे’ अ‍ॅप डाऊनलोड कराच

==============

करुणा आणि दयाळूपणा
श्रीराम हे कायमच एक दयाळू आणि करुणामयी व्यक्ती होते. ते प्रत्येकाशी आदर आणि सन्मानाने वागायचे. गरजूंना मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर असायचे आणि इतरांबद्दल खूप सहानुभूती त्यांच्या मनात असे. हे सगळेच गुण एक माणूस तुमच्याही आयुष्यात असणं गरजेचं आहे. ज्याला सुखी व्हायचं आहे, त्याने सर्वांत आधी करुणामयी होणं गरजेचं आहे.

महिलांचा आदर
श्रीराम हे महिलांच्या हक्कांबाबत फार जागरुक होते. त्यांनी नेहमीच सगळ्या महिलांना आदर आणि सन्मानाने वागवलं. राम आपल्या पत्नीवर म्हणजेच सीतेवर खूप प्रेम करायचे. ते तिच्याशी नेहमीच प्रेम आणि आदराने वागले. श्रीराम यांनी म्हणूनच एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी म्हटले जाते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.