Home » BMI म्हणजे काय? 23 पेक्षा अधिक असल्यास आरोग्यासाठी धोक्याची घंटा

BMI म्हणजे काय? 23 पेक्षा अधिक असल्यास आरोग्यासाठी धोक्याची घंटा

शरिरात 23 पेक्षा अधिक बीएमआय असल्यास लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. यामुळे काही गंभीर आजारही उद्भवू शकतात. अशातच संतुलित आहार आणि उत्तम लाइफस्टाइल फॉलो करून काही आजारांपासून दूर राहू शकता.

by Team Gajawaja
0 comment
what is BMI
Share

What is BMI  सध्या लठ्ठपणा एक सर्वसमान्य समस्या ठरली आहे. पुरुष आणि महिलांमध्ये हा आजार अधिक असतो. लठ्ठपणाच्या कारणास्तव आजार धोका वाढला जातो हे एका अभ्यासातून समोर आले आहे. यामध्ये लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांबद्दल विस्तारपणे सांगण्यात आले आहे. शरिरात लठ्ठपणासाठी बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्सचा वापर केला जातो. बीएमआय एखाद्या व्यक्तीच्या वजन आणि उंचीच्या आधारवर काढला जातो. असे सांगितले जाते की, एखाद्या व्यक्तीचे वजन त्याची उंचीच्या हिशोबाने योग्य आहे की नाही. जर व्यक्तीच्या शरिरातील बीएमआय 23 पेक्षा अधिक असल्यास तो लठ्ठपणाचा शिकार होतो.

मधुमेहाचा आजार
लठ्ठपणा आणि माधुमेहाचा सखोल संबंध आहे. मधुमेहासाठी लठ्ठपणा एक मोठे कारण ठरू शकते. खासकरुन टाइप-2 मधुमेह लठ्ठपणाचे कारण असते. लठ्ठपणाच्या कारणास्तव शरिरात इन्सुलिन व्यवस्थितीत तयार होऊ शकत नाही. यामुळे शरिरातील साखरचा स्तर वाढला जातो आणि पोटाच्या आसपासची चरबी जमा होते. शरिरात जमा फॅट्स मेटाबॉलिज्म आणि इन्सुलिनला काम करण्यास अडथळा आणते. यामुळे मधुमेहाचा आजार होते.

what is BMI

what is BMI

कोणत्या प्रकारचा लठ्ठपणा धोकादायक आहे?
पोट आणि कंबरच्या आसपास अधिक चरबी असल्यास मधुमेहाचा धोका वाढला जातो. ज्या व्यक्तीचा बीएमआय 25 च्या वरती असतो त्याला मधुमेह होण्याचा धोका वाढला जातो. (What is BMI)

=======================================================================================================

आणखी वाचा :

Women Health महिलांमध्ये सर्रास दिसणारी PCOS समस्या म्हणजे काय?

Thyroid ‘ही’ लक्षणे दिसताय सावधान ! कदाचित तुम्हाला थायरॉईड असू शकतो…

=======================================================================================================

हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका
लठ्ठपणापासून हृदयरोग आणि त्यासंबंधित अन्य आजार होण्याचा धोका वाढला जातो. पोटाच्या आसपास जमा झालेल्या चरबीमुळे उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवली जाते. लठ्ठपणाच्या कारणास्तव शरिरात बॅड कोलेस्ट्रॉल वेगाने वाढले जातात. यामुळे हृदयाला पंप अधिक मेहनत करावी लागते. लठ्ठपणाच्या कारणास्तव धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊ लागतात. यामुळे ब्लड फ्लोमध्ये अडथळा येत काम सुरू राहते. यामुळे हृदयाचे धोके वाढणे, हार्ट फेल्युयर आणि हार्ट अटॅकचा धोका वाढला जातो. लठ्ठ असणाऱ्या व्यक्तीमध्ये हृदयासंबंधित आजार वाढण्याची धोका अधिक वाढला जातो.

हाइपरटेंन्शन
लठ्ठपणामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका वाढला जातो. याशिवाय मेंदूपर्यंत रक्तही पुरवले जात नाही. अशातच स्ट्रोकचा धोका वाढला जातो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.