प्रयाग येथे सुरु असलेल्या महा कुंभमेळ्यात आतापर्यंत ८ ते १० कोटी भाविकांनी हजेरी लावली आहे. देशभरातले नागा साधू, इतर साधू-संत, महंत सगळेच कुंभमध्ये आले आहेत. त्यातच अनेक असे युनिक बाबा आलेत, जे मिडियामध्ये चर्चेत आहेत. असाच एक बाबा म्हणजे IITian बाबा, ज्याचं नाव आहे अभय सिंग… आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण या बाबाबद्दल जाणून घेतलच आहे. तुम्हालाही अशा बाबांबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा… आता येऊ IITian बाबाच्या विषयावर… तर या IITian बाबा म्हणजेच अभय सिंगची स्टोरी अनेक जणांनी कव्हर केली, त्याला फेम पण मिळाली. पण आता अचानक जुना अखाड्याने या बाबाची अखाड्यातून आणि कुंभ मेळ्यातून हकालपट्टी केली आहे. पण इतकी प्रसिद्धी मिळवणाऱ्या बाबाविरुद्ध जुना आखाड्याने हे पाऊल का उचललं जाणून घेऊ. (Abhay Singh)
अभय सिंग हा मुळचा हरयाणाच्या सासरौली गावचा… IIT बॉम्बेमधून ग्रेज्यूएट झालेला एरोस्पेस इंजिनिअर… अचानक अध्यात्माकडे वळला आणि आता बाबा झाला. सध्या IITian बाबा म्हणून देशभर प्रसिद्ध झाला आहे. आपली तीन लाखांची नोकरी सोडून तो आता वैरागी झाला आहे. कुटुंबापासून त्याने पूर्णपणे आपलं नात तोडल आहे. मिडिया कव्हरेज मिळाल्यानंतर तो बराच गाजला. अनेक channels ना त्याने बाईट्स दिले. आपले विचार मांडले. अनेकांना ते पटले, अनेकांना पटले नाहीत. एका मिडियावाल्याशी बोलताना अभय सिंग म्हणाला होता की, मी परदेशात नैराश्याशी लढा दिला. मला मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे जीवनाचा मूळ अर्थ शोधायचा होता. त्यामुळे मी आपली उच्च पगाराची नोकरी सोडली आणि आध्यात्म शिकण्यासाठी कॅनडामधून भारतात पुन्हा आलो.(Abhay Singh)
अभय सिंग सांगतो की, लहानपणापासूनच तो त्याच्या घरी होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचारामुळे त्रस्त होता. दिवसभर भांडण सुरु असायचं, त्यावेळी मी मध्यरात्री उठून अभ्यास करायचो. त्यामुळे एकंदरीत त्याच्यावर किती खोल परिणाम झाला होता, हे कळून येत. कॅनडामध्ये ३६ लाखांचं package घेत असतानाही त्याला या सर्व गोष्टी स्वस्त बसू देत नव्हत्या. त्यामुळे जॉब, मित्र-परिवार सगळ सगळ सोडून त्याने शेवटी बाबा बनण्याचा निर्णय घेतला. यंदाचा हा त्याचा पहिलाच कुंभमेळा… आणि याच कुंभ मेळ्यात तो प्रचंड प्रसिद्ध झाला. अनेक माध्यमांनी त्याची स्टोरी दाखवायला सुरुवात केली. IITian असतानाही त्याने हा निर्णय का घेतला, हाच प्रश्न अनेकांना स्वस्त बसू देत नव्हता. (Marathi News)
मात्र आता त्याच्या या प्रसिद्धीने नाट्यमय वळण घेतलं आहे. अभय सिंगवर दोन आरोप होते, एक म्हणजे शिस्तीच्या कठोर संहितेचा भंग करण आणि त्याचे गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरण ! गुरू-शिष्य परंपरेतला हा गंभीर गुन्हा असल्याचं सांगितलं जात. त्यामुळे त्याला जुना अखाड्याने बाहेर काढून टाकलं. याशिवाय अखाड्यातील महंतांनी अभय सिंगची मानसिक स्थिती ठीक नाही, असंही सांगितलं होत. अभय सिंगच्या सतत माध्यमांवरील देखाव्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतोय आणि यामुळे तो आणखी अयोग्य वर्तन करतोय, असं जुना अखाडा आश्रमातील साधूंचं म्हणण आहे.(Abhay Singh)
===============
हे देखील वाचा : Space Waste And Volcano : या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर !
Donald Trump : ट्रम्पचा धाक नोकरीतून कपात !
===============
तो ड्रग्स घेऊन विचित्र नृत्य करतो, असेही त्याच्यावर आरोप करण्यात आले होते. अभय सिंह जोपर्यंत अखाड्याच्या तत्त्वांचा आदर करत नाही आणि त्यांच्या शिस्तीचं पालन करत नाही तोपर्यंत त्याला आखाडा छावणी आणि परिसरात जाण्यासही बंदी असणार आहे, असे आश्रमाचे साधू म्हणाले. आणि याच कारणाने जुना आखाड्याच्या शिस्तपालन समितीने त्याची हकालपट्टी केली आहे. दरम्यान यावर स्वत अभय सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी प्रसिद्ध झालो आणि मी त्यांच्याबद्दल काहीतरी उघड करू शकतो, असं त्यांना वाटतंय. पण मी अजूनही धार्मिक मेळाव्यालाच उपस्थित आहे, मला कोणीही कुठेही हकललं नाही. हे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत, ज्यांना माझी मानसिक स्थिती माझ्यापेक्षा चांगली माहिती आहे? मला प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असली पाहिजे.” (Marathi News)
आता जुना अखाड्याच्या दाव्यांना आव्हान दिल्यामुळे अभय सिंगचा वाद वाढतच चालला आहे. तसच अखाड्याने हकालपट्टी केली तरीही महाकुंभमेळ्यात त्याची उपस्थिती कायम असल्यामुळे आता पुढे अभय सिंग म्हणजेच IITian बाबाबद्दल कुंभ मेळ्याचं हाय कमांड काय निर्णय घेणार, हे महत्त्वाच ठरणार आहे.