आपण कायम निरोगी, फिट राहावे अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच कमी जास्त प्रमाणात प्रयत्न देखील करत असतो. मात्र अनेकदा वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे आपण शरीराकडे योग्य तितके लक्ष देऊ शकत नाही. यासाठी आपण अनेकदा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपल्या आरोग्याला जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपल्या प्रत्येकाच्या घरात अनेकदा घरगुती उपचार करूनच छोटे आजार बरे केले जातात. किंवा आपले आरोग्य चांगले ठेवले जाते. (Health Care)
आपण जर पाहिले तर आपल्या घरात, किचनमध्येच आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपाय सापडतील. अतिशय समृद्ध अशा भारतीय किचनमधील एक सामान्य गोष्ट म्हणजे मनुका ज्याला बेदाणे देखील म्हटले जाते. खासकरून गोड पदार्थांची चव अधिक वाढवण्यासाठी या मनुका वापरल्या जातात. मात्र तुम्हाला माहित आहे का की…पदार्थांची चव वाढवण्यासोबतच या मनुका आपल्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात फायदेशीर ठरतात. त्यातही जर काळ्या मनुका (Black Raisins) असतील तर अधिकच उत्तम. (Black Raisins)
अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. जर आपण काळा मनुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास त्याचे अधिक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. असे तज्ज्ञ अनेकदा सांगतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊया काळया मनुकांच्या फायद्यांबद्दल.
– काळ्या मनुकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. मात्र यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील असते. ते शरीरातील खनिजांचे जलद शोषण करण्यास मदत करते आणि केसांचे उत्तमप्रकारे पोषण देखील करते. (Marathi Top News)
– वजन कमी करण्यासाठी भिजवलेले मनुका खाणे लाभदायक ठरू शकते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात, तसेच त्यात नैसर्गिक साखर असल्याने गोड असूनही शरीरातील चरबी वाढत नाही.
– रोज सकाळी भिजवलेल्या काळ्या मनुकांचे सेवन केल्यास पचनसंस्था चांगली राहते. यामध्ये असलेले फायबर आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त असतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि गॅसची समस्या उद्भवत नाही. (Latest Marathi NEws)
– काळ्या मनुकामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. काळ्या मनुका खाल्ल्याने हाडं आणि दात मजबूत होतात. रोज 8 ते 10 काळे मनुका खाल्ल्याने हाडे निरोगी आणि तंदुरुस्त राहते.
– काळ्या मनुक्यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यांना दिसण्यास काही समस्या येत असतील, ज्यांची दृष्टी कमकुवत असेल किंवा मोतीबिंदूची समस्या असेल त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर आहे. काळ्या मनुक्याच्या सेवनाने दृष्टी कमी होण्याची समस्या दूर होऊ शकते. (Health Care Tips)
– मनुकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्सचे प्रमाण जास्त असते, हे दोन्ही लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करतात. नियमितपणे मूठभर मनुके खाल्ल्याने अशक्तपणा टाळता येऊ शकतो.
– काळ्या मनुका खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. शरीरातील घाण कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. काळ्या मनुकामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय निरोगी होते.
===============
हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
– काळ्या मनुकामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात, जे रक्त शुद्ध करतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या जसे मुरुम, पिंपल्स, सुरकुत्या, डाग नाहीशा होतात. रक्त शुद्धीकरणामुळे त्वचाही निरोगी, तजेलदार आणि समस्यांपासून मुक्त होते.
– काळे मनुके किडनी स्टोन तयार होण्यास मज्जाव करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. भरपूर पाणी पिण्यासोबतच कमी कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास किडनी स्टोन दूर होऊ शकतो.
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)