आपण नेहमीच डॉक्टर, डायटिशियन, फिटनेस ट्रेनर, इतर तज्ज्ञ लोकांकडून ऐकत असतो की, आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने साखर अतिशय वाईट आहे. साखर खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अगदी लठ्ठपणापासून ते मधुमेह, हृदयरोग सर्वच गंभीर आजारांचे मूळ कारण साखर असल्याचे सांगितले जाते. (Health)
जेव्हा आपण आपला फिटनेस जपण्याची सुरुवात करतो तेव्हा सगळे आपल्याला सर्वात आधी साखर बंद कर असा सल्ला देतात. पण जर साखर बंद केली तर साखरेला दुसरा पर्याय कोणता? असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. गूळ तर नक्कीच साखरेला योग्य आणि उत्तम पर्याय आहे. मात्र यासोबतच अजून एक गोष्ट आपण साखरेला चांगला पर्याय म्हणून वापरू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे ‘खजूर’ (Dates).
सध्या अनेक जणं आपल्या आरोग्याच्या बाबतीत हळूहळू का होईना मात्र सजग होताना दिसत आहे. त्यामुळे ते सर्वात आधी साखर बंद करतात. मग साखरेला पर्याय म्हणून आपण कधीतरी खजूर नक्कीच वापरू शकतो. खजूर खाणे आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊया खजूर खाण्याचे फायदे. (Health Tips)
– हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर खाणे खूप फायदेशीर आहे. खजुरातील पोषक गुणधर्मांमध्ये हृदय मजबूत आणि निरोगी राहते. सोबतच खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
– खजूरमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आढळतात. जे शरीरातील सूज कमी करण्यास उपयुक्त ठरते. खजुराचे सेवन केल्यामुळे मेंदूशी संबंधित असलेल्या अल्झायमर आजाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते. स्मरणशक्ती सुधारण्यासही हे फळ फायद्याचे ठरते.
– कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दररोज खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन निरोगी कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. (Latest Marathi News)
– खजुरात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
– खजूरमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. गोड असूनही खजूर आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाही. यातील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाणात नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
– खजुरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते. खजुराचा मनावर ही चांगला परिणाम होतो.
– खजूर खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. खजूर हे पौष्टिक आणि उर्जेने भरलेले ड्रायफ्रूट आहे, जे नियमितपणे खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.
– खजुरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. आपल्या आहारात खजूर समाविष्ट केल्याने मजबूत आणि निरोगी हाडांसाठी आवश्यक ती पोषक तत्वे शरीराला मिळतात.
– खजूरमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोहार्मोन्स हे घटक आढळतात. जे त्वचेच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरतात. अकाली वृद्धत्वासारख्या समस्या दूर करण्यासाठी ते उपयुक्त ठरते.
– सर्दी-खोकल्याच्या त्रासात खजूर खूप प्रभावी आहेत. यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला टाळता येतो.
=====================
हे देखील वाचा : America : श्रीमंतांचा अमेरिकेला धोका !
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
– बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये देखील खजूर लाभदायक आहे. तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध खजूर खावे. रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा, यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.
– खजूरमध्ये आयर्नची मात्रा खूप असते. आयर्नची कमी मात्रा शरीरात त्रासाला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात. रक्त स्वच्छ करण्यात देखील हे तुम्हाला मदत करतात.
– हिवाळ्यात हवामान बदलले की, अनेकांना दम्याचा त्रास होतो. त्यामुळे जर तुम्हाला पण दम्याचा त्रास होत असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाऊ शकता.