महाकुंभ 2025 सुरु झाल्यापासून प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. दर दिवसाला करोडो भाविक येऊन त्रिवेणी संगम स्थानावर येऊन स्नान करत आहेत. यासोबत येणारे भाविक प्रयागराजमधील पवित्र मंदिरांना भेट देत आहेत. शिवाय महाकुंभ परिसरात असलेल्या आखाड्यांनाही भेट देत आहेत. महाकुंभच्या निमित्तानं अऩेक कथावाचकांनीही आपल्या शिष्यांसह या परिसरात भलामोठा तंबू उभारला आहे. अशा कथावाचकांना एकदा तरी बघण्यासाठी देशभरातील भाविकांची इच्छा असते. त्यामुळे अशा मंडपांमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. (Mahakhumbh)
सध्या महाकुंभमध्ये तुलसी पीठधीश्वर स्वामी रामभद्राचार्य यांचे शिबिर कुठे आहे, याची चौकशी सर्वाधिक प्रमाणात केली जात आहे. याशिवाय प्रसिद्ध कथाकार मोरारी बापूंची छावणी कुठे आहे, याचीही चौकशी भाविक करीत आहेत. या दोन्हीही ठिकाणी भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था कऱण्यात आली आहे. महाकुंभात अमृत स्नान करण्यासाठी देश-विदेशातील लाखो संत, ऋषी आणि करोडो भाविक संगमस्थानी पोहचले आहेत. पौष पौर्णिमेच्या स्नानाने सुरुवात झालेल्या या महाकुंभमध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. हे सर्व भाविक पवित्र स्नानासह आपल्या अराध्य देवतांचे दर्शन घेऊन पूजनीय संतांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं जात आहेत. (Social News)
यात तुलसी पीठाधीश्वर स्वामी रामभद्राचार्य यांच्या शिबिरात जाणा-या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. स्वामी रामभद्राचार्य यांचे शिबिर महाकुंभ नगरातील सेक्टर 6 मध्ये नागवासुकी मंदिराजवळ आहे. स्वामी रामभद्राचार्य यांच्या छावणीचे मुख्य प्रवेशद्वार श्री राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. या भव्य बांधकामासाठी कोलकाताहून कारागीर आले आहेत. या शिबिरामध्ये मान्यवर कलाकारही मोठ्या संख्येने जाऊन स्वामी रामभद्राचार्य यांचे दर्शन घेत आहेत. जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शक्ती पूजा हे नाट्य नृत्य सादर केले आहे. तर लोकगीत गायिका मालिनी अवस्थी, गायक जुबिन नौटियाल यांचाही कार्यक्रम येथे झाला आहे. 21 जानेवारी रोजी भोजपुरी गायक आणि खासदार मनोज तिवारी आणि भजन गायक कन्हैया मित्तल यांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. यानंतर, 23 जानेवारी रोजी कंगना राणौत यांचा कार्यक्रम असून 24 रोजी अक्षरा सिंह यांचा कार्यक्रम आहे. याशिवाय या शिबिरात मनोज मुंतशीर, नीती मोहन, उदित नारायण, सोनू निगम, मिका सिंग, कैलाश खेर यांचेही कार्यक्रम होणार आहेत. (Mahakhumbh)
मुख्य म्हणजे, स्वामी रामभद्राचार्य यांच्या छावणीत पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी होम सुरु आहे. शिबिरात 250 हवनकुंड बनवण्यात आले आहेत. हा होम बघण्यासाठी आणि त्यात आहुती टाकण्यासाठीही लाखो भाविक या मंडपात जात आहेत. याशिवाय महाकुंभात कथाकार मोरारजी बापूंच्या शिबिरालाही मोठ्या संख्येनं भाविक भेट देत आहेत. मोरारजी बापूंची छावणी छतनाग येथे गंगेच्या काठावर उभारण्यात आली आहे. त्याला कैलास कुटीर असे नाव देण्यात आले आहे. त्यांचा कॅम्प आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या इमारतीत तळमजल्यावर आणि वरच्या मजल्यावर एकूण चार खोल्या, दोन लॉबी आणि एक शौचालय बांधण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर मोरारजी बापूंसाठी एक खास खोली तयार करण्यात आली अशून तिथून गंगा नदिचे विहंगम दृश्य दिसते. (Social News)
=====================
हे देखील वाचा : Maha Kumbh : महाकुंभ पाहून भारावले परदेशी भाविक !
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
महाकुंभमेळ्यात, मोरारी बापू 18 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत रामकथेचे पारायण करणार आहेत. मोरारी बापूंच्या कैलास कुटीरमध्ये अनेक देशी आणि विदेशी भाविकांची रहाण्याचीही व्यवस्था केली आहे. या कुटीरमध्ये दररोज लाखो भाविक येऊन मोरारजी बापूंचे दर्शन घेत आहेत. त्यांच्या रामकथेच्या पारायणाला ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व भाविकांसाठी प्रसादभोजनाची व्यवस्था कऱण्यात आली आहे. याशिवाय महाकुंभमध्ये असलेल्या आखाड्यांच्या शिबीरालाही मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत आहेत. या सर्वंच आखाड्यांचे शिबीर हे भव्य असून त्याचे प्रवेशद्वार आणि आतील सजावट ही बघण्यासारखी आहे. अनेक ठिकाणी हिंदू देवदेवतांच्या भव्य प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. या सर्व आखाड्यांमध्येही अहोरात्र भाविकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी चपाती आणि पु-या लाटण्यासाठी मशिनची व्यवस्था आहे. या आखाड्यांमध्ये दररोज किमान लाखभर भाविकांच्या भोजनाची व्यवस्था आहे. (Mahakhumbh)
सई बने