भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजे कुंभमेळा. दर बारा वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या देशातल्या चार ठिकाणी हा कुंभमेळा भरतो. यंदा प्रयागराज (Prayagraj) इथे महाकुंभमेळा भरला आहे. २०२५ च्या सुरुवातीस महाकुंभमेळा आला आहे. या महाकुंभमेळाव्याचे एक वेगळेच महत्व आहे. (Mahakumbhmela)
सध्या प्रयागराजमध्ये संपन्न होत असलेला महाकुंभमेळा हा १४४ वर्षांनंतर होत आहे. दर १२ वर्षांनी एक सामान्य कुंभमेळा आयोजित केला जातो, परंतु १२ कुंभमेळ्यांनंतर (१२x१२=१४४ वर्षे) महाकुंभ आयोजित केला जातो. यंदा हाच महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. या कुंभमेळा विविध गोष्टींमुळे सतत चर्चेत येत आहे. (Marathi Top News)
या महाकुंभमेळ्यामधे अनेक प्रकारचे साधू, संत, महात्मे, नागा साधू या साधूंच्या नाना तऱ्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अशातच सध्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर एका महिला साध्वीची चांगलीच चर्चा रंगताना आणि तिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ही साध्वी म्हणजे हर्षा रिछारिया (Harsha Richharia).

हर्षा या महाकुंभमेळ्यामधे मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि तिला पाहून अनेकांनी तिच्याबद्दल चौकशी सुरु केली. दिसायला अतिशय सुंदर असलेली ही साध्वी नक्की कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या. तिच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा देखील होताना दिसत आहे. मग ही हर्षा नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया. (Who is Harsha Richaria)
मूळची भोपाळच्या मात्र आता उत्तराखंडमध्ये वास्तव असलेली हर्षा रिछारिया ही एक सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि अँकर होती. मात्र दोन वर्षापूर्वी ती साध्वी झाली आहे. हर्षा रिछारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरीजी महाराज असून, ते निरंजनी आखाड्यातून येतात.
मात्र हर्षा रिछारिया पूर्णपणे साध्वी झालेली नाही. तिने सांगितलं की, साध्वी होण्याच्या दृष्टीने ती सध्या तिचा प्रवास करत आहे. मात्र अजून तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही. हिंदू धर्मात नागा साधु संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरुंकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे. हर्षा रिछारियाला अजूनही दीक्षा मिळालेली नाही.
हर्षा ३० वर्षाची असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कपाळावर चंदनाचा टिळक आणि गळ्यात स्फटिकाची माळ भगवे कपडे अशा वेशात पेशवाईच्या रथावर बसलेल्या हर्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तिची माहिती समोर आली. हर्षा मध्यमवर्गीय कुटुंबातून येते.

हर्षाच्या वडिलांचा साधा जाब असल्याने त्यांना आर्थिक तंगी नेहमीच असायची. बीबीए झालेल्या हर्षाने घराला हातभार लावण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. तिने अँकरचा जॉब करण्यास सुरुवात केली तेव्हा तिला त्याचे १५० रुपये मिळायचे. मात्र या जॉबमुळे ती प्रसिद्ध झाली आणि हळूहळू सोशल मीडियावर देखील ती गाजू लागली.
आणखी वाचा :
Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !
Prayagraj : महाकुंभमध्ये मिळाले हाताला काम !
अशातच तिने काही भक्तिगीतांच्या व्हिडिओ अल्बममध्ये देखील काम केले आहे. हर्षाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिने साध्वीची कोणतीही दीक्षा घेतली नसून, तिने फक्त गुरुदीक्षा आणि मंत्रदीक्षा घेतली आहे. त्यामुळे ती अजून साध्वी झालेली नाही. पुढे हर्षाने सांगितले की, तिचा संन्यास घेण्याचा देखील कोणताही विचार नाही. मात्र तिचा अध्यात्माचा मार्ग अवलंबून तरुणांना आधुनिक जगाकडून अध्यात्माकडे आणायचे आहे.
