Home » Britain : राजाच्या देशात महागाईचा कळस !

Britain : राजाच्या देशात महागाईचा कळस !

by Team Gajawaja
0 comment
Britain
Share

ब्रिटन या देशानं एकेकाळी अवघ्या जगावर सत्ता केली होती. इंग्रजांच्या राज्याचा सूर्य कधीही मावळत नाही, असे अभिमानानं सांगितले जायचे. मात्र सध्याच्या काळात या देशात गरीबी अधिक वाढली आहे. एकेकाळी ज्या देशांवर इंग्लडची सत्ता होती, त्या देशांपेक्षा इंग्लडमध्ये बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या राजाच्या देशाचे आर्थिक गणित सध्या एवढे बिघडले आहे की, येथे महागाईमुळे काही नागरिक एकवेळेच्या जेवणालाही टाळत आहेत. वाढती महागाई आणि वाढत्या करांमुळे येथील व्यापा-यांवरही संक्रांत आल्यासारखी परिस्थिती आहे. विक्रेत्यांना त्यांच्याकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देणेही कठिण झाले आहे. मात्र हे कर्मचारीही कमी पगार असूनही ती नोकरी सोडण्याचे धाडस करत नाहीत. (Britain)

कारण संपूर्ण इंग्लडमध्येच बेरोजगारी आणि महागाईचे प्रमाण अधिक आहेत. पुढच्या काही काळात ब्रिटनमध्ये हजारो नोकऱ्या वाढत्या करांमुळे जाण्याचा धोका आहे. यासर्वांमुळेच महागाई वाढली आहे. महागाई वाढल्यामुळे नागरिक खरेदी करणे टाळत असल्याचे येथील आर्थिक समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. या सर्वांमुळे या राजाच्या देशातील सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ब्रिटनमधील महागाईच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून ब्रिटनमधील कर प्रणालीमुळे या देशावर महागाई आणि बेरोजगारीचे संकट येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमध्ये महागाई OECD देशांपेक्षा 8 टक्के जास्त आहे आणि ब्रिटनमध्ये घरांच्या किमती या देशांपेक्षा 44 टक्के जास्त आहेत. The Organization for Economic Co-operation and Development, म्हणजेच, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. (International News)

ही संस्था देशांना धोरणात्मक मानके विकसित करण्यास आणि आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास मदत करते. या देशांमध्ये अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, डेन्मार्क, कोरिया, नॉर्वे, स्विडन अशा देशांचा समावेश आहे. या देशांपेक्षा ब्रिटनमधील महागाईचा दर हा अधिक आहे. ब्रिटनमध्ये वाढत असलेल्या या महागाईमुळे मध्यमवर्गीय नागरिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. यातही ब्रिटनमधील मुलभूत सुविधांनाही या महागाईची झळ बसली आहे. येथील वैद्यकीय सेवा ही सर्वाधिक महाग असल्याची माहिती आहे. पण वाढत्या महागाईमुळे या मुलभूत सुविधांवरही येथील नागरिक खर्च करु शकत नसल्याचे अहवालातून आले आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या अहवालातून ब्रिटनमधील सद्यपरिस्थितीची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोग्य सेवांनंतर ब्रिटनच्या घरांच्या किंमतींमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. (Britain)

अन्य देशांपेक्षा या देशातील घरांच्या किंमती या तब्बल 44 टक्के अधिक वाढल्या आहेत. या घरांमधील सुविधांवरही कर असल्यामुळे अनेक नागरिक आपली रहाती घरे विकून भाड्याच्या घरात रहाणे पसंत करत आहेत. या अहवालातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, ब्रिटनमधील सहापैकी एक कामगार हा पैशांअभावी आपले एकवेळेचे जेवण वगळत आहे. यासाठी 2500 कामगारांची पाहणी करण्यात आली. त्यात हे कामगार नियमीत गरजा पूर्ण करण्यासाठी एकवेळेच्या जेवणाचे पैसे वाचवतांना आढळून आले. या पाहणीत 20 टक्क्यांहून अधिक नागरिक हे आपल्या घराचे मासिक बील, लाईट बील भरण्यासाठी सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून पगारही अनियमीत आणि कमी मिळत आहे. त्यामुळे दरमहा ठराविक रक्कम ते कर्ज रुपानं घेत असून अनेकांनी कर्जाचा बोजा मोठा झाल्याचे खेदानं सांगितले आहे. (International News)

=====================

हे देखील वाचा : Kinkrant संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या क्रिक्रांतबद्दलची माहिती

Israel : आता अखंड इस्रायल !

=====================

यातील 31 टक्के नागरिकांनी वीज बिल कमी करण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही घरात हिटर लावत नसल्याचे सांगितले आहे. ही परिस्थिती पुढच्या काळात अधिक कठिण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. कारण किरकोळ उद्योगावर मोठ्या प्रमाणात कर लादले गेले आहेत. यामुळे अशा व्यवसायिकांना उत्पादन खर्चच परवडत नाही. या सर्वात वस्तूंच्या किंमती वाढवाव्या लागल्या आहेत. मात्र वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम खरेदीवर झाला असून 2024 च्या ख्रिसमसच्या खरेदी हंगामात ब्रिटनमध्ये सर्वाधिक कमी खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. या सर्वांचाही कामगारांच्या पगारावर परिणाम झाला आहे. उद्योगात फायदाच मिळत नसल्यामुळे उद्योजक कामगारांना पूर्णपणे पगार देण्यास असमर्थता व्यक्त करत आहेत. तसेच काही उद्योग बंदच झाल्यामुळे या कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. (Britain)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.