पुनर्जन्म तसं तर अशक्य वाटणारी गोष्ट आहे. माणूस मेल्यानंतर तो दुसऱ्या माणसाच्या शरीरात जन्माला येऊ शकतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. काही धर्मांमध्ये पुनर्जन्मवार विश्वास ठेवला जातो. हिंदू धर्मात, जैन आणि बौद्ध धर्मात सुद्धा माणूस मरतो आणि पुन्हा जन्म घेतो, असं मानलं जातं. पण तो पुन्हा जन्मला आल्यावर त्याला त्याच्या मागच्या जन्माच्या गोष्टी स्मरणात नसतात. पण भारतात पुनर्जन्माची एक घटना अशी घडली होती, ज्याने गांधीजींच्या सुद्धा भुवया उंचावल्या होत्या. म्हणूनच गांधीजीनी या पुनर्जन्माच्या केसचं गूढ उकलण्यासाठी एक कमिटी सुद्धा स्थापन केली होती. भारतातील पहिल्या आणि सर्वात फेमस पुनर्जन्माच्या गोष्टीबद्दल जाणून घ्या … (Shanti Devi)
१९२६चा काळ होता, दिल्लीमध्ये बाबू रंग बाहदूरच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव त्यांनी शांती देवी ठवेलं. नावाप्रमाणेच शांती शांत होती. जिथे एक average लहान मुल १ वर्षानंतर बोलायला लागतं, तिथे शांती देवी चार वर्षांची झाली तरी तिने बोलणं सुरू केलं नव्हतं. यामुळे घरातले चिंतीत होते पण एवढे नाही. आणि तिने वयाच्या ४ थ्या वर्षी बोलायला सुरुवात केली. पण यामुळे तिच्या घरातले अजून चिंतेत पडले. कारण ती बोलताना खूप विचित्र गोष्टी सांगायला लागली होती. विचित्र प्रश्न विचारू लागली होती, ज्याच्यावर तिच्या घरच्यांचा विश्वासच बसत नव्हता. ती चार वर्षांची लहान मुलगी विचारायची, माझा नवरा कुठे आहे? माझ मुल कुठे आहे? मी इथे कशी आली? वगैरे वगैरे.. नंतर ती घरच्यांना सांगू लागली की तिचा नवरा मथुरा शहरात कपड्यांचं दुकान चालवतो. तिच्या घरचे चिंतेत होते, पण त्यांना समजत नव्हतं की,ती असं का बोलते आहे? (Social News)
तिच वय जसं वाढत गेलं, तसं ती आणखी गोष्टी सांगू लागली. ६ वर्षांच्या वयात तिने सांगितलं की तिचा मृत्यू एका ऑपरेशन नंतर झाला होता. आता मात्र घरच्यांनी तिला डॉक्टरांना दाखवलं, पण त्यांच्यासाठी सुद्धा अशाप्रकारची केस अनोळखीच होती. तिचं वय वाढत होतं, तसं तिचं नवरा आणि मथुरा बद्दलच बोलणं आणखी वाढत होतं. ती जेव्हा ९ वर्षांची होती, तेव्हा ती वडील बाबू रंग बाहदूर यांच्याकडे मथुराला जाण्याचा हट्ट करू लागली. तोपर्यंत तिने तिच्या गेल्या जन्मीच्या नवऱ्याचं नाव घरी सांगितलं नव्हतं. ती फक्त नवऱ्याचं आडनाव “चौबे” आहे असं सांगायची आणि स्वत:ला चौबेन म्हणायची. तिच्या घरच्यांना परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं वाटलं आणि त्यांनी त्यांचा एक नातेवाईक बाबू बिशन चंद यांना बोलावलं. ते शाळेत प्राध्यापक होते, त्यांनी शांती देवीशी बऱ्याच गप्पा मारल्या आणि तिच्या पतीचं नाव विचारलं. आणि म्हणाले, “जर तू नाव सांगितलस तर मी तुला मथुराला घेऊन जाईन.” त्यावर तिने लगेच त्यांच्या कानात मागच्या जन्मीच्या पतीचं नाव सांगितलं. ते होतं “पंडित केदारनाथ चौबे” (Shanti Devi)
आता गोष्ट थोडी मागे घेऊन जाऊया म्हणजे शांती देवी म्हणते तसं, तिच्या मागच्या जन्मात म्हणजेच पंडित केदारनाथ चौबेच्या बायकोबद्दल जाणून घेऊया.. १८ जानेवारी १९०२ मध्ये मथुरामध्ये चतुर्भुज या कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं लुग्दी. १० वर्षाच्या वयातच लुग्दीचं लग्न मथुराच्याच एका कपड्यांचं दुकान चालवणाऱ्या व्यापऱ्याशी झालं. त्या दुकानदाराचं नाव केदारनाथ चौबे. हेच नाव शांती देवीने प्राध्यापक बाबू बिशन चंद यांना सांगितलं होतं. केदारनाथ चौबेशी लग्न झाल्यानंतर लुग्दी लवकरच गरोदर राहिली, पण ऑपरेशननंतर तिने एका मृत बाळाला जन्म दिला. १९२५ साली, वयाच्या २२ व्या वर्षी जेव्हा ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली, तेव्हा तिने एका जीवंत बाळाला जन्म दिला, पण यावेळी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा दिवस होता ४ ऑक्टोबर १९२५. याच्या बरोबर १४ महिन्यांनी शांतीचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता. (Social News)
आता शांती देवीने तिच्या गेल्या जन्मीच्या नवऱ्याचं नाव बाबू बिशन चंद यांना सांगितलं होतं, आणि बाबू बिशन चंद यांनी केदारनाथ चौबेचा तपास सुरू सुद्धा केला होता. त्यांना केदारनाथच्या घराचा पत्ता सापडला आणि त्यांनी त्याला एक पत्र लिहिलं. ज्यामध्ये शांती देवीच्या पुनर्जन्माची संपूर्ण कथा लिहिली होती. हे वाचून केदारनाथ शॉक झाला होता. त्याने लगेचच दिल्लीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकाला शांती देवीला भेटण्यासाठी सांगितलं. जेव्हा ते नातेवाईक शांती देवीला भेटले, तेव्हा शांती देवीने त्यांना केदारनाथच्या मथुराच्या घराबद्दल काही डिटेल्स सांगितले. एवढंच नाही, तर शांती देवीने मागच्या जन्मात लपवलेल्या पैशांबद्दल सुद्धा त्यांना सांगितलं. (Shanti Devi)
ही गोष्ट केदारनाथ चौबेपर्यंत पोहचली. आश्चर्याने केदारनाथ शांतीला भेटण्यासाठी त्या नातेवाईकांसोबत गेला. नातेवाईकांनी केदारनाथची शांती देवीशी ओळख हा केदारनाथचा भाऊ अशी करून दिली. तरी सुद्धा शांती देवीने केदारनाथला ओळखलं. त्याशिवाय त्याने त्या मुलाला सुद्धा ओळखलं, ज्याला जन्म देताना तिचा, म्हणजेच लुग्दीचा मृत्यू झाला होता. तिने त्यांना त्यांच्या मथुराच्या घराबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ते हे ऐकून अवाक् होते. (Social News)
नंतर पुढे एका रात्री केदारनाथ शांती देवीला एकटाच भेटला. तेव्हा त्यांच्यात बोलणं झालं आणि केदारनाथला विश्वास बसला की शांती देवी ही लुग्दीच आहे. लुग्दीचा शांती देवीच्या शरीरात पुनर्जन्म झाला आहे. ही पुनर्जन्माची सत्य घटना तेव्हा संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली. ती महात्मा गांधींपर्यंत सुद्धा पोहचली. त्यांनी या केसची चौकशी करण्यासाठी १५ जणांची एक टीम तयार केली. ज्यांनी या केसबद्दल बराच तपास केला. (Social News)
ही टीम शांती देवीला घेऊन मथुराला गेली. तिने तिथे लुग्दी असतानाच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या.तिने केदारनाथच्या घरातील ती जागा दाखवली, जिथे लुग्दी पैसे लपवायची. असं सर्व तपास करून, या टीमने १९३६ साली एक अहवालात तयार केला. त्यांनी या अहवालात हे लिहिलं की शांती देवी हा लुग्दीचाच पुनर्जन्म आहे. (Shanti Devi)
यावेळी आणखी एक अहवाल सुद्धा लिहिला गेला होता, “पुनर्जन्म की परीलोचणा.” हा अहवाल बालचंद नाहाटा यांनी लिहिला होता. त्यांनी गांधीजींच्या टीमने बनवलेल्या अहवालाला मानन्यास नकार दिला. त्यांच्या अहवालात त्यांनी लिहिलं की, “आमच्याकडे आलेल्या सर्व प्रमाणांच्या आधारे, शांती देवीच्या पूर्वजन्माच्या आठवणी असणे किंवा हे प्रकरण पुनर्जन्म सिद्ध करत आहे, असे ठरवता येत नाही.” (Social News)
================
हे देखील वाचा : Indian Army Day आज साजरा होतोय ‘भारतीय सेना दिन’ जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्व
================
यानंतर, शांती देवीच्या पुनर्जन्माची गोष्ट जगभरात प्रसिद्ध झाली. देश-विदेशातून शांती देवीच्या केसवर संशोधन करण्यासाठी लोकं तिला भेटायला येऊ लागली. शांती देवी स्वत:च्या पुनर्जन्माची गोष्ट सांगत राहिली आणि त्यावर संशोधन होतं राहिलं. खरं खोटं कोणालाही कळालं नाही. तिच्या पुनर्जन्माबद्दल अनेक अहवाल लिहिले गेले. एक पुस्तक सुद्धा लिहिलं गेलं. इयान स्टीवनसन यांचं या विषयावरच लिहिलेलं ‘ट्वेंटी केसेस सजेस्टिव ऑफ रीइंकार्नेशन’ हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालं. शांती देवीने आयुष्यभर लग्न केलं नाही. शेवटी, वयाच्या ६१ व्या वर्षी तिचं निधन झालं आणि पुनर्जन्माची ही गोष्ट सर्वांसाठी गुढच राहिली. (Shanti Devi)